हसन मुश्रीफ आणि भाजप आता एकाच सरकारमध्ये आहेत, आता ते…काय म्हणाल्या सुप्रिया सुळे

भाजपाचे नेते नितेश राणे यांच्या बाबत गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खरी प्रतिक्रीया द्यायला हवी असे राष्ट्रवादीच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे.

हसन मुश्रीफ आणि भाजप आता एकाच सरकारमध्ये आहेत, आता ते...काय म्हणाल्या सुप्रिया सुळे
Follow us
| Updated on: Sep 04, 2024 | 6:43 PM

हसन मुश्रीफ यांनी शरद पवार यांच्यावर टिका केली आहे. शरद पवार मी मुसलमान असल्याने आपल्या मागे लागले आहेत असे मुश्रीफ यांनी म्हटले आहे. शरद पवार यांनी कागद विधानसभेतून राज घराण्याशी संबंधीत समरजीत घाडगे यांनी तिकीट देण्याचा निर्णय घेतल्याने हसन मुश्रीफ यांनी शरद पवार यांना बोल लावले आहेत. यावर राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी हसन मुश्रीफ यांच्यावर जोरदार टिका केली असताना आता खासदार सुप्रिया सुळे यांनी देखील हसन मुश्रीफ यांच्यावर तोंडसुख घेतले आहे.

सुप्रिया सुळे यांना हसन मुश्रीफ यांच्या संदर्भात मिडीयाने विचारले त्यावर त्या म्हणाल्या की मुश्रीफसाहेब आमच्या कुटुंबातले होते. अनेक वर्षे त्यांचं आणि पवार साहेबाचं नातं होतं. पवार साहेबांनी त्यांच्यावर प्रचंड प्रेम केलं. त्यांच्या घरावर जेव्हा ईडीने जेव्हार छापा टाकला तेव्हाही त्यांच्या पत्नी याबाहेर येऊन लढल्या होत्या. भ्रष्टाचाराचे आरोप मुश्रीफ कुटुंबावर भारतीय जनता पक्षाने केला होता. त्यानंतर त्याच भारतीय जनता पक्षाने डर्टी डझनवर जो आरोप होता त्यांच्यातही त्यांचं नाव होतं असं मला वाटतं. परंतू जेव्हा जेव्हा भ्रष्टाचाराचे आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर केले गेले. त्याच्यावेळी भारतीय जनता पक्षाने हसन मुश्रीफांवरच भ्रष्टाचाराचे आरोप केले आहेत..नंतर त्याचं काय झालं मला माहिती नाही. वॉशिंग मशीन झालं, की काय झालं मला याच्यातलं काही माहिती नाही असा टोमणा सुप्रिया सुळे यांनी लगावला आहे. त्या पुढे म्हणाल्या की पण हसन मुश्रीफ आणि भारतीय जनता पक्ष एकाच सरकारमध्ये आहेत. आता ते भ्रष्ट आहेत का नाही ? मला काहीही माहिती नाही असेही त्या म्हणाल्या !

कोण आमदार नाचले हा माझा मुद्दा नाही

भाजपाचे आमदार आमदार संदीप धुर्वे यांनी गौतमी पाटील यांच्या सोबत स्टेजवर नृत्य केले होते. त्यासंदर्भात त्यांना विचारले असता सुळे म्हणाल्या की मी लोककलांच्या विरोधात नाही. माझ्या मतदारसंघात असे अनेक कलाकार आहेत. त्यांची कला ते सादर करतात. कोण आमदार नाचले मला माहिती नाही, हा माझा मुद्दा नाही. मला महागाई, बेरोजगारी, कायदा सुव्यवस्था हे मुद्दे महत्त्वाचे आहेत असे वाटते असे सुप्रिया सुळे यांनी सांगितले.

नितेश राणे प्रकरणी गृहमंत्र्यांनी उत्तर द्यावे

भाजपाचे नेते आमदार नितेश राणे यांनी मशीदीच्या मिनारच्या दिशेने बंदुकीचा इशारा करून दाखवणं किंवा मशीदीत घुसून मारू अशी भाषा करणं या भाषेचं उत्तर खर तर देवेंद्र फडणवीस यांनी दिलं पाहिजे. होम मिनिस्ट्रीला तुम्ही पत्रकारांनी विचारलं पाहिजे असेही सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे.

समय सबसे बलवान है

समय सबसे बलवान है. आधी आमच्या महाविकास आघाडी सरकारच्या काळात एसटीच्या कामगारांना कामबंद आंदोलन केलं. तेव्हा विलिनिकरणाची भाषा होती, आता काय परिस्थिती आहे ? माझ्या घरावर एसटी कामगारांनी हल्ला केला होता. म्हणजेच ‘सत्यमेव जयते’ हे खरंय.समय सबसे बलवान है.जे तुम्ही पेराल तेच उगवते असे सुप्रिया सुळे यांनी सुचविले.

आनंद आश्रमातील प्रकाराबाबत राऊतांचा हल्लाबोल तर काय म्हणाले शिंदे?
आनंद आश्रमातील प्रकाराबाबत राऊतांचा हल्लाबोल तर काय म्हणाले शिंदे?.
तो निर्णय आम्हाला मान्य, खडसेंच्या प्रवेशावर काय म्हणाले फडणवीस?
तो निर्णय आम्हाला मान्य, खडसेंच्या प्रवेशावर काय म्हणाले फडणवीस?.
देवेंद्र फडणवीसांनी नागपुरात दणक्यात वाजवला ढोल, बघा व्हिडीओ
देवेंद्र फडणवीसांनी नागपुरात दणक्यात वाजवला ढोल, बघा व्हिडीओ.
आता मराठी विषय सक्तीचा... सरकारी-खासगी शाळांना शासनाचा निर्देश काय?
आता मराठी विषय सक्तीचा... सरकारी-खासगी शाळांना शासनाचा निर्देश काय?.
दिघे असते तर... आनंद आश्रममधील घडलेल्या प्रकाराबाबत राऊतांचा हल्लाबोल
दिघे असते तर... आनंद आश्रममधील घडलेल्या प्रकाराबाबत राऊतांचा हल्लाबोल.
'तो लिंबू कापणारा चमत्कारी बाबा, त्यानं म्हातारपणात..', जरांगेंची टीका
'तो लिंबू कापणारा चमत्कारी बाबा, त्यानं म्हातारपणात..', जरांगेंची टीका.
मोदींच्या घरात खास पाहुण्याचं आगमन; नाव ऐकून तुम्हीही म्हणाल वाह!
मोदींच्या घरात खास पाहुण्याचं आगमन; नाव ऐकून तुम्हीही म्हणाल वाह!.
मुख्यमंत्र्यांनी मराठ्यांसोबत दगाफटका केला तर..., जरांगेंचा इशारा काय?
मुख्यमंत्र्यांनी मराठ्यांसोबत दगाफटका केला तर..., जरांगेंचा इशारा काय?.
'ते दिघेंच्या विचाराचे नाही तर बारमधील',ठाकरे गटातील नेत्याचा हल्लाबोल
'ते दिघेंच्या विचाराचे नाही तर बारमधील',ठाकरे गटातील नेत्याचा हल्लाबोल.
हा सर्व धर्मराव आत्राम अन् त्यांच्या मुलीचा गेम, भाजप नेता काय म्हणाला
हा सर्व धर्मराव आत्राम अन् त्यांच्या मुलीचा गेम, भाजप नेता काय म्हणाला.