AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

काका, पडघा कुठे आहे? भर ट्राफिकमध्ये रस्ता विचारला अन् मानेवर… कल्याणमध्ये नेमकं काय घडलं?

कल्याणमध्ये ५८ वर्षीय व्यक्तीची सोनसाखळी चोरी झाल्याची घटना घडली आहे. दुचाकीस्वार चोरट्यांनी हेल्मेट आणि रेनकोट घालून ही चोरी केली. ही घटना डोंबिवलीतील महिलांना लुटणाऱ्या टोळीशी संबंधित असण्याची शक्यता आहे.

काका, पडघा कुठे आहे? भर ट्राफिकमध्ये रस्ता विचारला अन् मानेवर... कल्याणमध्ये नेमकं काय घडलं?
kalyan 1
| Updated on: Sep 06, 2025 | 9:46 AM
Share

गेल्या काही दिवसांपासून डोंबिवलीत महिलांना लुटणाऱ्या टोळीने हैदोस घातला होता. आता हीच टोळी कल्याणच्या दिशेने वळली आहे की काय, असा प्रश्न नागरिकांना पडला आहे. डोंबिवलीतील महिलांना लुटणाऱ्या टोळीचा थरार शांत होत नाही तोच कल्याणमध्येही चेन स्नॅचिंगची एक धक्कादायक घटना समोर आली आहे. कल्याणमध्ये दुचाकीवर हेल्मेट आणि रेनकोट घालून आलेल्या दोन चोरट्यांनी एका ५८ वर्षीय व्यक्तीच्या गळ्यातील सोनसाखळी चोरल्याचा प्रकार समोर आला आहे. अचानक झालेल्या हल्ल्यामुळे नागरिक घाबरले आहेत. यामुळे शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

नेमकं काय घडलं?

गुरुवारी ५ सप्टेंबर रोजी संध्याकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास कल्याण पूर्वेतील म्हात्रेनाका परिसरात ही घटना घडली. सुरेश नामदेव कारवे (५८) हे आपली दुचाकी घेऊन जात असताना वाहतूक कोंडीत अडकले. त्याचवेळी पाठीमागून पल्सर गाडीवर हेल्मेट आणि रेनकोट घालून दोन तरुण आले. त्यांनी सुरेश यांना अडवले. यावेळी पल्सर गाडीवर मागे बसलेल्या तरुणाने सुरेश यांना “काका, पडघा कुठे आहे?” अशी विचारणा केली. त्यावर सुरेश यांनी त्यांना दिशा दाखवत रस्ता सांगितला. यानंतर मात्र त्या चोरट्याने अचानक त्यांच्या मानेवर जोरदार थाप मारली.

सुरेश यांना आपल्या गळ्यातील सोन्याची चैन हिसकावली जात असल्याचे लक्षात येताच त्यांनी ती वाचवण्याचा आटोकाट प्रयत्न केला. मात्र, आक्रमक चोरट्यांनी जोर लावत ती हिसकावून घेतली. या झटापटीत सोन्याची साखळी तुटली. तिचा काही भाग सुरेश कारवे यांच्या हातात राहिला, तर उर्वरित भाग चोरट्यांनी हाती लागला. अवघ्या काही सेकंदात ४५ हजारांची सोन्याची साखळी चोरत चोरट्यांनी १०० फुटी रस्त्याने मलंगगडच्या दिशेने सुसाट वेगाने पळ काढला. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली. या प्रकरणी कोळसेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक पाटील पुढील तपास करत आहेत.

दरम्यान डोंबिवलीमध्ये अशाच प्रकारे दोन महिलांच्या गळ्यातील सुमारे दोन लाख रुपयांच्या साखळ्या चोरल्या गेल्या होत्या. त्यामुळे ही टोळी पुन्हा सक्रिय झाल्याचे स्पष्ट संकेत या घटनेने मिळत आहेत. सध्या कल्याण डोंबिवली परिसरात वाढत्या चेन स्नॅचिंगच्या घटना पाहता पोलिसांनी नागरिकांना सतर्क राहण्याचा सल्ला दिला आहे. खासकरून वाहतूक कोंडीत अडकल्यास किंवा अनोळखी व्यक्तीने जवळ येऊन बोलण्याचा प्रयत्न केल्यास सावध राहावे. तसेच मौल्यवान दागिने परिधान करून बाहेर पडताना विशेष काळजी घ्यावी, असे आवाहनही पोलिसांनी केले आहे.

Follow Us
ऑडिओ क्लिपचं मूळ डिव्हाइस रामदास कदमांकडे? मनोज जरांगेंचा खळबळजनक दावा
ऑडिओ क्लिपचं मूळ डिव्हाइस रामदास कदमांकडे? मनोज जरांगेंचा खळबळजनक दावा!
पायल झांबरे प्रकरणात नवी अपडेट! नेमकं काय घडतंय?
Payal Pawar Zhambre : पायल झांबरे प्रकरणात नवी अपडेट! नेमकं काय घडतंय?
दिवाळीत ना रांगोळी, ना पणत्या! बीडच्या पाटसरा गावावर दुष्काळाचं सावट,
दिवाळीत ना रांगोळी, ना पणत्या! बीडच्या पाटसरा गावावर दुष्काळाचं सावट, चिमुकल्यांची चटणी-भाकरीवर दिवाळी!
महायुतीत पुन्हा धुसफूस! भाजपकडून डावलले जात असल्याने शिंदे गट नाराज;
महायुतीत पुन्हा धुसफूस! भाजपकडून डावलले जात असल्याने शिंदे गट नाराज; एकनाथ शिंदेंकडे मांडली कैफियत
दोन्ही राष्ट्रवादी विलिनीकरणाबाबत CM देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
दोन्ही राष्ट्रवादी विलिनीकरणाबाबत CM देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले?
सयाजी शिंदे संतापले! 'झाडामध्ये देव आहे, त्याला विकणार का?' म्हणत...
सयाजी शिंदे संतापले! 'झाडामध्ये देव आहे, त्याला विकणार का?' म्हणत वृक्षतोडीला विरोध
गोकुळ दुध संघाबाबत मोठी अपडेट समोर! सरकारच्या 'त्या' निर्णयाला...
गोकुळ दुध संघाबाबत मोठी अपडेट समोर! सरकारच्या 'त्या' निर्णयाला राज्यपाल जिष्णू देव वर्मांची मंजुरी
सर, माझा जीव वाचवा' म्हणणाऱ्या वैभव चव्हाणच्या कुटुंबीयांची मनोज...
सर, माझा जीव वाचवा' म्हणणाऱ्या वैभव चव्हाणच्या कुटुंबीयांची मनोज जरांगेंनी घेतली भेट; प्रकरणाला नवे वळण!
संजय राऊतांनी आधी उबाठा गट काँग्रेसमध्ये विलीन करावा; नवनाथ बन यांचा..
संजय राऊतांनी आधी उबाठा गट काँग्रेसमध्ये विलीन करावा; नवनाथ बन यांचा खोचक टोला!
आनंदाचा शिधा घेण्यासाठी महिलांची तुफान गर्दी; खासदार संजय देशमुख....
Washim : आनंदाचा शिधा घेण्यासाठी महिलांची तुफान गर्दी; खासदार संजय देशमुख यांच्या कार्यालयाबाहेर मोठी झुंबड