कल्याणमध्ये गळ्याला फास लागून दोघांचा मृत्यू, दोषींवर कारवाई करा, आरपीआयची मागणी

नुकतंच रिपब्लिकन पक्षाच्या कार्यकर्त्यांनी रेल्वे अधिकाऱ्यांची भेट घेतली. (RPI Demand to Inquire) 

कल्याणमध्ये गळ्याला फास लागून दोघांचा मृत्यू, दोषींवर कारवाई करा, आरपीआयची मागणी

कल्याण : कल्याण स्टेशन परिसरात बॅरिकेट्सऐवजी नायलॉनची दोरीमुळे झालेल्या अपघातात दोन तरुणांचा दुर्देवी मृत्यू झाला. टीव्ही 9 मराठीने दाखवलेल्या या बातमीनंतर आरपीआय पक्षाने याची दखल घेतली आहे. या संबंधित कुटुंबाला न्याय मिळावा. तसेच दोषी व्यक्तींवर कारवाई व्हावी, अशी मागणी रिपब्लिकन पक्षाने केली आहे. याबाबात नुकतंच रिपब्लिकन पक्षाच्या कार्यकर्त्यांनी रेल्वे अधिकाऱ्यांची भेट घेतली. (Kalyan Two People Died Due to Nylon thread RPI Demand to Inquire)

नेमकं प्रकरणं काय?

कल्याण पूर्व भागातील कोळसेवाडी परिसरात राहणारे योगेश सांगळे आणि मुकेश राय हे दोघे चांगले मित्र होते. मुकेश राय हा कल्याण पूर्व भागातील जिम्मी बाग परिसरात राहत होता. योगेश सांगळे हा कल्याण पूर्व भागातील जगताप वाडीत राहत होता. गुरुवारी (11 फेब्रुवारी) योगेशला कामावर जायचं होतं म्हणून मुकेश रायने त्याला आपल्या दुचाकीवर बसवून कल्याण रेल्वे स्टेशनला निघाला.

लोकल 7 नंबर प्लेटफॉर्मवर उभी होती. 7 नंबर प्लॅटफॉर्मच्या बाजूला असलेल्या रस्त्यावर जात असताना याच दरम्यान समोर बॅरीकेट्स ऐवजी लावण्यात आलेली नायलॉन दोरी मुकेशच्या गळ्यात अडकली. त्याचा गळा कापला गेला. तो खाली पडला. यानंतर त्याच्या पाठीमागे बसलेला त्याचा मित्र योगेशही गाडीच्या खाली आपटला गेला. या अपघातात दोघांचाही दुदैवी मृत्यू झाला.

या घटनेनंतर मृतांच्या कुटुंबांनी जबाबदार दोषींवर लवकरच कारवाई करावी, अशी मागणी केली होती. यापाठोपाठ  कल्याण आरपीआय आठवले गटाचे कल्याण शहर कार्यकारी अध्यक्ष भरत सोनवणे यांनीही याबाबतची मागणी केली.

दोषींवर कारवाई करा, आरपीआयची मागणी 

भरत सोनवणे यांनी आपल्या कार्यकर्त्यांसोबत घटनास्थळी जाऊन पाहणी केली. त्यांनी रेल्वे अधिकाऱ्यांसोबत चर्चा केली. पार्किंग व्यवसायामुळे हा प्रकार घडला असावा,  असा आरोप भरत सोनवणे यांनी केला आहे. मृत व्यक्तीच्या कुटुंबियांनी याप्रकरणी लवकरात लवकर न्याय मिळावा, अशी मागणी केली आहे. यासाठी जे कोणी अधिकारी या घटनेस जबाबदार आहे. त्यांचे त्वरित निलंबन करून कारवाई करण्यात यावे, असेही ते म्हणाले आहेत. याप्रकरणी कल्याणच्या कोळसेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या पोलीस पुढील तपास करीत आहे. मात्र या घटनेमुळे कल्याणमध्ये एकच खळबळ उडाली आहे.  (Kalyan Two People Died Due to Nylon thread RPI Demand to Inquire)

संबंधित बातम्या : 

रेल्वे स्टेशनवर बॅरिकेट्स ऐवजी नायलॉन दोरीचा वापर, कल्याणमध्ये गळ्याला फास लागून दोघा मित्रांचा मृत्यू

…तर आम्ही थेट रस्त्यावर उतरु, उल्हास नदीच्या स्वच्छतेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक

Published On - 3:58 pm, Sat, 13 February 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI