AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सोशल डिस्टन्सिंग राखून भोजन व्यवस्था, कणकवलीत ‘कमळ’ थाळी सुरु

कणकवलीचे आमदार नितेश राणे यांनी 'कमळ' थाळी वाटपाचे फोटो ट्विटरवर शेअर केले आहेत. (Kankavali Nitesh Rane Kamal Thali)

सोशल डिस्टन्सिंग राखून भोजन व्यवस्था, कणकवलीत 'कमळ' थाळी सुरु
| Updated on: Apr 15, 2020 | 2:11 PM
Share

सिंधुदुर्ग : ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनमुळे हातावर पोट असलेल्या गरीब मजुरांचे दोन वेळच्या जेवणाचेही हाल होत आहेत. हीच गरज ओळखून कणकवली नगरपंचायतीच्या मदतीने ‘कमळ’ थाळी सुरु करण्यात आली आहे. (Kankavali Nitesh Rane Kamal Thali)

कणकवली शहरात आम्ही कणकवली नगरपंचायतीच्या सहकार्याने दररोज 150 व्यक्तींसाठी ‘कमळ’ थाळी सुरु करत आहोत. ही थाळी विनामूल्य असणार आहे, अशी घोषणा कणकवलीचे आमदार नितेश राणे यांनी काल केली होती. ‘या संकटाच्या काळात गरिबांना “कमळ” थाळीमुळे नक्कीच मदत होईल!’ असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला होता.

पुण्यात ‘शरद भोजन’ सुरु, ‘कोरोना विषाणू’ संसर्ग काळात योजना

नितेश राणे यांनीच ‘कमळ’ थाळी वाटपाचे फोटो ट्विटरवर शेअर केले आहेत. पहिल्या दिवशी दोनशे जणांना थाळी दिल्याचं त्यांनी सांगितलं.

‘कमळ’ थाळीमध्ये नेमकं काय? -दोन मूद भात, दोन चपात्या, एक वरण/डाळ (आमटी), एक भाजी स्थळ : लक्ष्मी विष्णू हॉल, विद्यानगर (संजीवन हॉस्पिटलजवळ), कणकवली वेळ : – दुपारी 12 ते 2 वाजेपर्यंत

शरदथाळी आणि शिवथाळी

‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी ‘शिवभोजन थाळी’ योजनेचा विस्तार करण्यात येणार आहे. पुढच्या तीन महिन्यांसाठी ‘शिवभोजन थाळी’ 10 रुपयांऐवजी 5 रुपयांमध्ये देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

दुसरीकडे,कोरोना विषाणू’मुळे निर्माण झालेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर पुणे जिल्हा परिषद निराधार दिव्यांग व्यक्तींच्या मदतीला धावून आली आहे. विषाणू संसर्गाच्या काळात पुणे जिल्ह्यात ‘शरद भोजन योजना’ सुरु करण्यात आली आहे.

निराधार दिव्यांग व्यक्ती, गरोदर माता, दुर्धर आजार असणारे निराधार व्यक्ती आणि ज्येष्ठ नागरिक यांना दोन वेळचे अन्न पुरवण्यासाठी ‘शरद भोजन योजना’ सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. ज्या दिव्यांग, आजारी किंवा वयोवृद्ध व्यक्तींच्या घरी जेवण तयार करणारं कोणी नाही, त्यांना या योजनेचा लाभ होईल.

(Kankavali Nitesh Rane Kamal Thali)

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.