शिवराज दिवटे मारहाण प्रकरणात करुणा मुंडे यांचा धनंजय मुंडेंवर खळबळजनक आरोप, नाव घेत थेट म्हणाल्या…
बीड जिल्ह्यात शिवराज दिवटे या तरुणाला दहा ते बारा जणांच्या टोळक्यांनी बेदम मारहाण केली होती. या प्रकरणानंतर बीडमधील गुन्हेगारी पुन्हा चर्चेत आली आहे. त्यावेळी करुणा मुंडे यांनी धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.

Dhananjay Munde, Shivraj Divate : बीडमधील परळी पुन्हा गुन्हेगारीमुळे चर्चेत आले आहे. शिवराज दिवटे या तरुणाला दहा ते बारा जणांच्या टोळक्यांनी अपहरण करून बेदम मारहाण केली होती. ‘तुझा संतोष देशमुख पार्ट टू करू,’ अशी धमकीही आरोपींनी दिली होती. त्यानंतर करुणा मुंडे यांनी धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांच्यावर खळबळजनक आरोप केले आहेत. शिवराज दिवटे यांना झालेल्या मारहाणीमागे धनंजय मुंडे यांच्याच गुंडांचा हात आहे, असा आरोप करुणा मुंडे यांनी केला आहे.
करणा मुंडे यांनी पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांच्यावर थेट आरोप केले. त्या म्हणाल्या की, बीडमधील सगळ्या गुंडांना धनंजय मुंडे पोसत आहेत. त्यामुळे धनंजय मुंडे यांच्यावरच कारवाई करण्याची गरज आहे. देशांमध्ये दहशतवाद्यांविरोधात ऑपरेशन सिंदूर राबवले तसेच ऑपरेशन हे बीडमध्ये सुद्धा राबवा. कारण या ठिकाणी अनेक गुन्हेगारी टोळ्या आहेत. जवळपास आठ ते दहा हजार गुन्हेगार आहेत. या सगळ्यांचा एन्काऊंटर करून टाका, अशी माझी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपच्या नेत्यांना विनंती आहे.
धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे हे दोघेही गुन्हेगारांच्या टोळ्या बीडमध्ये पोसत आहे. धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे हे दोन्ही एका माळेचे मणी आहेत. दोघांमध्ये कुठलाही फरक नाही, असा आरोप करुणा मुंडे यांनी केला. त्या पुढे म्हणाल्या, अजित पवार पुण्याचे पालकमंत्री आहे. त्या ठिकाणी गुन्हेगारी वाढली आहे. मग ते बीडला जाऊन काय गुन्हेगारी कमी करणार? उलट बीडला ते आले तर आणखी जास्त गुन्हेगारी वाढेल, असा आरोप करुणा मुंडे यांनी केला.
एनकाउंटर एकच उपाय
एनकाउंटरचा प्रयोगानंतरच बीडमधील गुन्हेगारी कमी होईल. बीडमध्ये जर गुंडाराज कमी करायचा असेल तर एकच उपाय आहे. तो म्हणजे एनकाउंटर, असे करुणा मुंडे यांनी म्हटले. मंत्रीपदाबाबत बोलताना करुणा मुंडे यांनी सांगितले की, धनजय मुंढे यांचे मंत्रिपद बीडमधील इतर आमदाराला द्यावे. त्यांच्याकडे हे पद गेल्यास मी पुन्हा लढा देईल. पंकजा मुंढे मंत्री असल्यामुळे अजूनही धनजय मुंढे गुन्हेगारांच्या पाठीशी आहेत, असे करुणा मुंडे यांनी सांगितले.