Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘माझा बाप जगातील सर्वोत्कृष्ट बाप, पण…’; पोटगीच्या निर्णयानंतर करुणा शर्मा यांच्या मुलाची भावनिक पोस्ट

न्यायालयानं दिलेल्या पोटगीच्या आदेशानंतर करुणा शर्मा आणि धनंजय मुंडे यांचा 18 वर्षांचा मुलगा शिशीव धनंजय मुंडे याने सोशल मीडियावर भावनिक पोस्ट शेअर करत मोठा खुलासा केला आहे.

'माझा बाप जगातील सर्वोत्कृष्ट बाप, पण...'; पोटगीच्या निर्णयानंतर करुणा शर्मा यांच्या मुलाची भावनिक पोस्ट
Follow us
| Updated on: Feb 06, 2025 | 5:16 PM

मंत्री धनंजय मुंडे यांच्या अडचणीत वाढच होताना दिसत आहे.  आता  वांद्रे कौटुंबिक न्यायालयाने धनंजय मुंडे यांना करुणा शर्मा यांना दर महिन्याला दोन लाख रुपये पोटगी देण्याचे आदेश दिले आहेत. न्यायालयानं दिलेल्या या आदेशानंतर करुणा शर्मा आणि धनंजय मुंडे यांचा 18 वर्षांचा मुलगा शिशीव धनंजय मुंडे याने सोशल मीडियावर भावनिक पोस्ट शेअर करत मोठा खुलासा केला आहे. त्याने आपली आई करुणा शर्मा यांच्यावरच आरोप केल्यामुळे खळबळ उडाली आहे.

नेमकी काय आहे पोस्ट?   

‘मी शीशिव धनंजय मुंडे, मला आता बोलणे भाग आहे कारण माध्यमांनी आमच्या कुटुंबाला मनोरंजनाचा विषय बनवून टाकले आहे. माझा बाप जगातला सर्वोत्कृष्ट बाप नसला तरी तो आम्हा भावंडांना कधीही हानिकारक नव्हता. माझी आई कायम तिच्या अनेक विविध कारणांमुळे बाधित असायची आणि त्याचा वचपा ती आम्हाला वेदना देऊन काढायची. जो घरेलू हिंसाचार तिच्यासोबत झाला असा ती दावा करते तो घरेलु हिंसाचार खरे तर मी, माझी बहीण व माझे वडील यांच्यासोबत तिच्याकडून व्हायचा.

माझ्या वडिलांना तिच्याकडून होणारा शारीरिक व मानसिक जाच असह्य झाल्यानंतर ते तिला सोडून गेल्यावर तिने मला व माझ्या बहिणीला सुद्धा घर सोडून जायला सांगितले कारण तिच्या मते तिचा व आमचा ( जन्मदाती आई असुनही) काहीही संबंध राहिला नव्हता. 2020 या वर्षापासून आमचे वडीलच आमची सर्वस्वी काळजी घेत आहेत. माझ्या आईला कोणत्याही आर्थिक विवंचना नाहीत तरीसुद्धा तिने घराचे कर्जाचे हप्ते भरायचे नाही असे जाणीवपूर्वक ठरवले आणि माझ्या वडिलांचा बदला घेण्यासाठी कायम खोट्यानाट्या गोष्टी पसरवत असते.

शिशिव धनंजय मुंडे, अशी पोस्ट शिशिव मुंडे याने केली आहे.

View this post on Instagram

A post shared by seeshiv munde (@see.shiv)

नेमकं काय आहे प्रकरण? 

आपण धनंजय मुंडे यांच्या पत्नी आहोत असा दावा करुणा शर्मा यांनी केला होता. यासाठी गेल्या काही दिवसांपासून त्या कायदेशीर लढाई लढत आहेत. या प्रकरणात करुणा शर्मा यांना मोठा दिलासा मिळाला असून न्यायालयानं धनंजय मुंडे यांनी दर महिन्याला करुणा शर्मा यांना दोन लाख रुपये द्यावेत असे आदेश दिले आहेत.

खोक्याच्या बायकोने केला मोठा खुलासा, म्हणाली..
खोक्याच्या बायकोने केला मोठा खुलासा, म्हणाली...
'हा विषय आता संपवा'; औरंगजेबाच्या कबरीवर चंद्रकांत खैरे काय म्हणाले?
'हा विषय आता संपवा'; औरंगजेबाच्या कबरीवर चंद्रकांत खैरे काय म्हणाले?.
युवक कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांची पोलिसांकडून धरपकड; कार्यकर्ते आक्रमक
युवक कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांची पोलिसांकडून धरपकड; कार्यकर्ते आक्रमक.
धनंजय मुंडेंची आमदारकी 100 टक्के जाणारच; करुणा शर्मा यांचा दावा
धनंजय मुंडेंची आमदारकी 100 टक्के जाणारच; करुणा शर्मा यांचा दावा.
वाढत्या उष्णतेने सोलापूरकरांचे हाल बेहाल
वाढत्या उष्णतेने सोलापूरकरांचे हाल बेहाल.
'होळी खेळताना त्यांना माझ्या भावाचे..' - धनंजय देशमुख
'होळी खेळताना त्यांना माझ्या भावाचे..' - धनंजय देशमुख.
खोक्याला बावी गावात आणलं; घटनास्थळावर कसून चौकशी सुरू
खोक्याला बावी गावात आणलं; घटनास्थळावर कसून चौकशी सुरू.
आता घरकुलांना पाच ब्रास मोफत वाळू मिळणार; बावनकुळेंनी दिली माहिती
आता घरकुलांना पाच ब्रास मोफत वाळू मिळणार; बावनकुळेंनी दिली माहिती.
करुणा शर्मा खोक्याला कसं ओळखता? सांगितली 'ती' घटना
करुणा शर्मा खोक्याला कसं ओळखता? सांगितली 'ती' घटना.
राणेंचे जुने व्हिडिओ काढा, हलालचं मटण खाताना दिसतील; वडेट्टीवारा टोला
राणेंचे जुने व्हिडिओ काढा, हलालचं मटण खाताना दिसतील; वडेट्टीवारा टोला.