डोंबिवलीतील बेकायदा इमारतीवर KDMCचा हातोडा, आधी अधिकारी झोपले होते का? स्थानिकांचा सवाल

डोंबिवलीतील बेकायदा इमारतीवर KDMCचा हातोडा, आधी अधिकारी झोपले होते का? स्थानिकांचा सवाल

ज्यावेळी ही इमारत बांधली जात होती. त्यावेळी महापालिकेचे अधिकारी काय झोपले होते का? असा संतप्त सवाल बेघर होणाऱ्या नागरीकांनी उपस्थित केला आहे.

अमजद खान

| Edited By: दादासाहेब कारंडे

Dec 28, 2021 | 9:59 PM

डोंबिवली : डोंबिवलीतील दत्तनगर परिसरातील बेकायदा पाच मजली इमारतीवर केडीएमसीने अखेर पाडकामाची कारवाई सुरु केली. या इमारतीत राहण्यास आलेले 40 कुटुंबीय बेघर झाल्याने केडीएमसी प्रशासनाच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित होणे स्वाभाविक आहे. ज्यावेळी ही इमारत बांधली जात होती. त्यावेळी महापालिकेचे अधिकारी काय झोपले होते का? असा संतप्त सवाल बेघर होणाऱ्या नागरीकांनी उपस्थित केला आहे.

आधी कारवाई थांबवली, आता पाडकाम

डोंबिवली पूर्व भागातील श्री दत्त कृपा ही पाच मजली इमारत ही वादग्रस्त ठरली होती. बेकायदा बांधकाम असल्याचा ठपका ठेवत महापालिकेने या इमारतीला बेकायदा घोषित केले. इमारतीचे काम सुरु होताच काही महिन्यानंतर या इमारतीवर कारवाई झाली. मात्र ती कारवाई थांबवित ही इमारत पुन्हा बांधण्यास सुरुवात झाली आत्ता ही इमारत तयार झाल्यावर 40 कुटुंबे त्याठीकाणी राहण्यासाठी आले असता केडीएमसीने कारवाई सुरु केली.

स्थानिक आणि पोलिसांमध्ये वाद

चार तास पोलीस आणि इमारतीत राहणाऱ्या रहिवाशांमध्ये गोंधळ सुरु होता. पोलिसांनी बळजबरीने इमारत रिकामी केली. त्यानंतर तोडण्याची कारवाई सुरु झाली. रहिवाशांनी यावेळी प्रचंड संताप व्यक्त केला. स्थानिक आमदार आणि नगरसेवकामुळे आम्ही रस्त्यावर आलो आहोत, बेघर झालो असा आरोप करण्यात आला. महिला रहिवासी रेखा कांबळे यांनी सांगितले की, 1970 सालापासून या जागेवर आमची इमारत होती. इमारत धोकादायक झाल्याने ती पाडण्यात आली. आम्ही चाळीस कुटुंबिय मिळून ही इमारत बांधली आहे. आम्हाला जबरदस्तीने बाहेर काढले. कोणतीही नोटीस आणि पूर्वसूचना न देता ही कारवाई केली आहे. असा आरोपही स्थानिकांनी केला आहे. अचानक डोक्यावरचे छत्र हरवलेल्या नागरिकांनी आधी अधिकारी झोपले होते का? असा सवाल प्रशासनाला केला आहे. यासंदर्भात प्रभाग अधिकारी रत्नप्रभा कांबळे यांनी सांगितले, सध्या कारवाई सुरु आहे. संपूर्ण कारवाई झाल्यावर आम्ही याविषयीची माहिती देऊ. मात्र इमारतीचे काम सुरु होते तेव्हा अधिकारी कुठे होते? याचे उत्तर देणे टाळले.

‘लोकशाहीतला सर्वात काळा दिवस’ फडणवीसांचा हल्लाबोल, सरकारला पळपुटं का म्हणाले फडणवीस?

IND VS SA: ऋषभ पंतची कमाल, धोनीचा विक्रम मोडला

Pune | सॉक्टवेअर इंजिनिअरींगच्या तब्बल 28 मुलींना विषबाधा, 6 जणींची तब्बेत खालवली, ससूनमध्ये आणलं!

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें