AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Pune | सॉक्टवेअर इंजिनिअरींगच्या तब्बल 28 मुलींना विषबाधा, 6 जणींची तब्बेत खालवली, ससूनमध्ये आणलं!

खोपी गावातील सॉफ्टवेअरचं प्रशिक्षण घेणाऱ्या या मुलींनी रविवारी रात्री घरीच बनवून खाल्लं होतं. दरम्यान, सुरुवातील पाच मुलींना प्रकृतीचा त्रास जाणवू लागला.

Pune | सॉक्टवेअर इंजिनिअरींगच्या तब्बल 28 मुलींना विषबाधा, 6 जणींची तब्बेत खालवली, ससूनमध्ये आणलं!
विद्यार्थिनींना विषबाधा
| Edited By: | Updated on: Dec 28, 2021 | 8:20 PM
Share

पुणे : पुणे जिल्ह्यातील (Pune) भोर (Bhor) तालुक्यात तब्बल 28 मुलींना विषबाधा (Poison) झाल्याची माहिती समोर आली आहे. या मुलींवर उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत. जेवणातून या मुलींना विषबाधा झाल्याची माहिती मिळते आहे. या सर्व मुली सॉफ्टवेअर इंजिनिअरींग (Software Engineering) शिक्षण घेणाऱ्या असून त्या शिक्षणासाठी पुण्यातील भोर तालुक्यातल्या खोपी इथं राहात होत्या.

सॉफ्टवेअरच्या विद्यार्थिनींना विषबाधा

भोर तालुक्यातील खोपी गावात असलेल्या एकूण 28 विद्यार्थिनींना विषबाधा झाली आहे. यातील एकूण 16 मुलींना उपचारासाठी स्थानिक उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. सध्या त्यांच्यावर उपचार सुरु असून त्यांच्या काही चाचण्याही करण्यात आल्या आहेत. दरम्यान, या 28 मुलींपैकी सात मुलींची प्रकृती अधिक खालावल्यानं त्यांना ससून रुग्णालयात पुढील उपचारासाठी पाठवण्यात आलं आहे. या सर्व मुली खोपी गावातील फ्लोरा इन्स्टिट्यूटमधील इंजिनिअरींगच्या विद्यार्थिनी आहेत.

कधीपासून सुरु झाला त्रास?

खोपी गावातील सॉफ्टवेअरचं प्रशिक्षण घेणाऱ्या या मुलींनी रविवारी रात्री घरीच बनवून खाल्लं होतं. दरम्यान, सुरुवातील पाच मुलींना प्रकृतीचा त्रास जाणवू लागला. त्यामुळे त्यांना उपसाराठी उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आलं. मात्र नंतर आणखी काही मुलींची प्रकृती बिघडून हा आकडा 28 पर्यंत पोहोचला. या विद्यार्थिनींना जेवणातून विषबाधा झाली असावी, असा अंदाज रुग्णालायतील तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.

दरम्यान, सध्या विषबाधा झालेल्या सर्व विद्यार्थिनींवर उपचार सुरु असून त्यांच्या प्रकृतीवर डॉक्टर लक्ष ठेवून आहेत. तर प्रकृती खालावलेल्या विद्यार्थिनींनी तत्काळ ससून रुग्णालयात पुढील उपचारासाठी पाठवण्यात आलं असून त्यांच्यावरही उपचार सुरु आहेत.

इतर बातम्या –

Ankita patil nihar thackeray wedding : अंकिता पाटील आणि निहार ठाकरेंच्या लग्नाचे फोटो पाहा एका क्लिकवर

Nitesh Rane | अंतरीम जामिनास नकार, अटक अटळ? उद्या ठरणार, कुणाचे वकील ठरले सरस?

Assembly speaker election : विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक फेब्रुवारीत होणार, नाना पटोलेंची माहिती

वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार.
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन.
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा.
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान.
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?.
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास.
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा.
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा.