AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

KDMC News : अडीच वर्षांच्या मुलाला दिलं रेबीजचं इंजेक्शन, पण एक्स-रे पाहताच आई हादरली..

कल्याणमधील रुक्मिणीबाई रुग्णालयात अडीच वर्षांच्या बालकाला रेबीज लस देताना सुई तुटून शरीरातच अडकली. रुग्णालयाच्या हलगर्जीपणामुळे हा प्रकार घडला, जो नंतर एक्स-रे तपासणीत उघड झाला. तातडीने शस्त्रक्रिया करून ती सुई काढण्यात आली. संतप्त पालकांनी दोषींवर कारवाईची मागणी केली असून, केडीएमसी प्रशासनाने चौकशीचे आदेश दिले आहेत.

KDMC News : अडीच वर्षांच्या मुलाला दिलं रेबीजचं इंजेक्शन, पण एक्स-रे पाहताच आई हादरली..
रेबीजचं इंजेक्शन देताना अडीच वर्षांच्या मुलाच्या कमरेत तुटली सुई
| Updated on: Aug 05, 2026 | 9:01 AM
Share

कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या (केडीएमसी) रुक्मिणीबाई रुग्णालयातील गंभीर हलगर्जीपणाचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. अवघ्या अडीच वर्षांच्या मुलाला भटक्या कुत्र्याने चावा घेतला. त्यानंतर त्याला उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. तिथे त्याला रेबीज प्रतिबंधक इंजेक्शन दिलं खरं, पण त्यानंतर जे घडलं ते पाहून सगळेच हादरले. त्या मुलाला रेबीजचे इंजेक्शन देताना सुई तुटून त्याच्या शरीरातच अडकली. ही गंभीर चूक रुग्णालयाच्या निदर्शनासही आली नाही. मात्र, मुलाला घरी गेल्यानंतर सतत त्रास होऊ लागल्याने तपासणी केली. त्यानंतर एक्स-रे काढल्यावर जे दिसलं ते पाहून त्या मुलाच्या आईच्या पायाखलची जमीनच सरकली. कारण अवघ्या अडीच वर्षांच्या मुलाच्या शरीरात इंजेक्शनची सुई अडकली होती. अखेर ऑपरेश केल्यानंतर ती सुई यशस्वीरित्या बाहेर काढण्यात आली. मात्र यामुळे त्या मुलाच्या नातेवाईकांमध्ये रोष असून दोषींवर कारवाई करा अशी मागणी केली जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कल्याण पूर्व येथे राहणारे सूर्यभान आणि काजल पांडे यांना कावेश हा अडीच वर्षांचा मुलगा आहे. त्याला भटका कुत्रा चावल्याने, पांडे कुटुंबियांनी त्याला उपचारांसाठी क्मिणीबाई रुग्णालयात दाखल केलं होतं. तेथे त्याला रेबीज प्रतिबंधक इंजेक्शन देण्यात आले. उपचारानंतर डॉक्टरांनी मुलाला घरी सोडले. मात्र, घरी गेल्यानंतर मुलाच्या कमरेच्या भागात वेदना सुरू झाल्या.

पाठीत दुखत असल्याने काढला एक्स – रे, समोरचं दृश्य पाहून..

त्यानंतर पालकांनी खासगी रुग्णालयात नेऊन तपासणी केली. त्या रुग्णालयात एक्स-रे काढण्यात आला आणि त्यामध्ये मुलाच्या कमरेत इंजेक्शनची सुई तुटून शरीरातच राहिल्याचे दिसून आलं. यामुळे सगळेच हादरले.त्यानंतर डॉक्टरांनी तातडीने शस्त्रक्रिया करून सुई बाहेर काढली. वेळेत हा प्रकार लक्षात आला नसता तर मुलाच्या आरोग्यावर गंभीर परिणाम झाला असता, असं डॉक्टरांनी सांगितलं.

मात्र, या निष्काळजीपणामुळे पांडे कुटुंबीय संतप्त झाले असून कावेशच्या नातेवाईकांनी संबंधित डॉक्टर आणि जबाबदार कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. एका निष्पाप चिमुकल्याच्या जीवाशी खेळ करणाऱ्या दोषींना पाठीशी घालू नये, अस म्हणत शिक्षेची मागणी त्यांनी केली.

केडीएमसी प्रशासनाने घेतली दखल

दरम्यान, या संपूर्ण प्रकरणाची केडीएमसी प्रशासनाने गंभीर दखल घेतली आहे. मुख्य आरोग्य अधिकारी डॉ. दीपा शुक्ला यांनी या घटनेची चौकशी करण्याचे आदेश दिले असून, इंजेक्शन देताना इंटर्न डॉक्टरांचा सहभाग होता का, तसेच नेमका निष्काळजीपणा कुणाकडून झाला, याची सखोल चौकशी केली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. चौकशी अहवालानंतर दोषी आढळणाऱ्यांवर योग्य ती शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

या घटनेमुळे रुग्णालयांतील उपचार पद्धती, रुग्ण सुरक्षेचे निकष आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या निष्काळजीपणाबाबत पुन्हा एकदा गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

Follow Us
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट, व्हिडीओ आले समोर
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले...
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले, शुगर असलेल्यांनीच...
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ व्हायरल
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा..
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा मोठा दावा
ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त
Disha Salian Case : ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त
मातोश्री निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावरच आदित्य ठाकरेंच्या वकिलांनी...
मातोश्री निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावरच आदित्य ठाकरे यांच्या वकिलांनी... सतीश सालियान यांनी दिला 7 दिवसांचा अल्टिमेटम
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील बड्या नेत्याची प्रतिक्रिया, नेमकं...
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील बड्या नेत्याची प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
पाऊस गायब, पाण्याची चिंता वाढली; विक्रम पाचपुतेंनी सुचवला कृत्रिम...
पाऊस गायब, पाण्याची चिंता वाढली; विक्रम पाचपुतेंनी सुचवला कृत्रिम पावसाचा पर्याय
UPI शुल्कावर राज ठाकरेंचा संताप; म्हणाले, ‘डिजिटल सापळ्यात...
UPI शुल्कावर राज ठाकरेंचा संताप; म्हणाले, 'डिजिटल सापळ्यात’ नागरिकांना अडकवले
नांदेडमध्ये कृषिमंत्र्यांच्या ताफ्यासमोर शेतकऱ्यांची घोषणाबाजी
Nanded | नांदेडमध्ये कृषिमंत्र्यांच्या ताफ्यासमोर शेतकऱ्यांची घोषणाबाजी