AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

केडीएमसीच्या तिजोरीची चावी कोणाकडे? एकनाथ शिंदे करणार मोठी खेळी, लाडक्या बहिणीला मिळणार प्राधान्य

कल्याण-डोंबिवली महानगरपालिका स्थायी समिती सभापती पदासाठी शिवसेनेच्या बड्या नेत्यांमध्ये चुरस निर्माण झाली असून विजया पोटे यांचे नाव लाडकी बहीण म्हणून चर्चेत आहे.

केडीएमसीच्या तिजोरीची चावी कोणाकडे? एकनाथ शिंदे करणार मोठी खेळी, लाडक्या बहिणीला मिळणार प्राधान्य
KDMC
| Updated on: Mar 23, 2026 | 8:32 AM
Share

कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या (KDMC) राजकारणात सध्या प्रचंड हालचाली सुरू आहेत. कल्याण डोंबिवली महापालिकेतील सर्वात शक्तिशाली मानल्या जाणाऱ्या स्थायी समिती सभापती पदासाठी शिवसेनेच्या गोटात मोठी रस्सीखेच पाहायला मिळत आहे. मल्लेश शेट्टी, विकास म्हात्रे, जयवंत भोईर आणि महेश गायकवाड यांसारख्या मातब्बर नेत्यांनी या पदासाठी आपली प्रतिष्ठा पणाला लावली आहे. यासाठी आता थेट ठाणे, मुंबई आणि दिल्लीपर्यंत लॉबिंग सुरू झाले आहे. मात्र, या पुरुष नेत्यांच्या स्पर्धेत नाराजी टाळण्यासाठी पक्षाकडून लाडकी बहीण कार्ड खेळले जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे केडीएमसीच्या स्थायी समिती सभापतीपदासाठी विजया पोटे यांचे नाव सध्या आघाडीवर असल्याचे पाहायला मिळत आहे.

एकापेक्षा एक प्रबळ दावेदार

मिळालेल्या माहितीनुसार, सभापती पदासाठी शिवसेनेच्या गोटातून एकापेक्षा एक प्रबळ दावेदार समोर आले आहेत. यात जुन्या फळीतील निष्ठावान शिवसैनिक म्हणून मल्लेश शेट्टी यांची ओळख आहे. गेल्या वेळी हुकलेली संधी यंदा पदरात पाडून घेण्यासाठी त्यांनी जोरदार मोर्चेबांधणी केली आहे. तसेच विकास म्हात्रे हे भाजपमधून शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर त्यांनी पक्षासाठी घेतलेली आक्रमक भूमिका आणि संघर्षाची जमेची बाजू त्यांच्या दाव्याला बळ देत आहे.

त्यासोबतच आमदार विश्वनाथ भोईर यांचे बंधू असलेल्या जयवंत भोईर यांनी सर्वाधिक मताधिक्याने निवडून आल्याचा दावा करत आपली दावेदारी ठामपणे मांडली आहे. युवा चेहरा म्हणून महेश गायकवाड यांनीही वरिष्ठ पातळीवर हालचाली सुरू केल्या असून, तरुण नेतृत्वाला संधी मिळावी अशी त्यांची मागणी आहे.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा प्रभाव

पक्षातील बड्या नेत्यांमधील अंतर्गत स्पर्धा पाहता, कोणत्याही एका पुरुष नेत्याची निवड केल्यास इतरांची नाराजी ओढवून घेण्याची भीती पक्षश्रेष्ठींना वाटत आहे. अशा परिस्थितीत, राज्यात गाजत असलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा प्रभाव आणि महिला सक्षमीकरणाचा संदेश देण्यासाठी विजया पोटे यांना संधी देऊन सर्वांची समजूत काढली जाण्याची दाट शक्यता राजकीय वर्तुळात वर्तवली जात आहे.

या नाट्यमय घडामोडींवर भाष्य करताना खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. प्रत्येक नगरसेवकाला पद मिळावे असे वाटणे स्वाभाविक आहे. मात्र, अंतिम निर्णय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेच घेतील. या विधानामुळे इच्छुकांची धाकधूक वाढली असून सर्वांच्या नजरा आता येणाऱ्या निर्णयाकडे लागल्या आहेत. येत्या आठवड्यात या पदावर कोणाची वर्णी लागते, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. विकास म्हात्रे, मल्लेश शेट्टी की जयवंत भोईर यांच्यातील स्पर्धेत विजया पोटे बाजी मारणार का, हे लवकरच स्पष्ट होईल.

Follow Us
रत्नागिरीत धरणसाठ्यात घट; पाणीसाठा कमी; पाणीबाणीचा धोका कायम
रत्नागिरीत धरणसाठ्यात घट; पाणीसाठा कमी; पाणीबाणीचा धोका कायम
बीडमध्ये रोहित पवारांच्या नेतृत्वाखाली शेतकरी आक्रोश मोर्चा, हजारो...
बीडमध्ये रोहित पवारांच्या नेतृत्वाखाली शेतकरी आक्रोश मोर्चा, हजारो शेतकरी होणार सहभागी
मग आपल्याला स्वतःची...ओमराजेंचं ठाकरे गटातील नेत्याला सडेतोड उत्तर
मग आपल्याला स्वतःची... ओमराजे निंबाळकरांचं ठाकरे गटातील नेत्याला सडेतोड उत्तर, थेट लायकी...
कोथरूडमध्ये सिम्बाच्या स्मरणार्थ बाप्पाचा भावनिक देखावा...
कोथरूडमध्ये सिम्बाच्या स्मरणार्थ बाप्पाचा भावनिक देखावा... प्रेम, आठवण आणि निसर्गाचा संगम
दगडूशेठ गणपती विसर्जनासाठी वक्रतुंड रथ सज्ज
Video : पुण्याच्या गणेशोत्सवाचा मानबिंदू, दगडूशेठ गणपती विसर्जनासाठी वक्रतुंड रथ सज्ज
भाजपच्या विजयाचं मोठं कारण तर... निवडणूक आयोगाबाबत अभिजीत दीपाकेचा...
भाजपच्या विजयाचं मोठं कारण तर... निवडणूक आयोगाबाबत अभिजीत दीपाकेंचा धक्कादायक दावा
नागरिकांनो लक्ष द्या! तीन दिवस बँका बंद राहणार, वाचा नेमकं कारण काय?
नागरिकांनो लक्ष द्या! तीन दिवस बँका बंद राहणार, वाचा नेमकं कारण काय?
गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी वाहतूक व्यवस्थेत मोठे बदल; सविस्तर माहिती
गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी वाहतूक व्यवस्थेत मोठे बदल; जाणून घ्या सविस्तर माहिती
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी फडणवीसांची मोठी घोषणा; कर्जमुक्ती आणि...
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी फडणवीसांची मोठी घोषणा; कर्जमुक्ती आणि विम्याबाबत दिलासा
दुष्काळी दौरे काजू बदाम खाण्यासाठी आहेत का? ठाकरेंचा सरकारला चिमटा
Uddhav Thackeray : दुष्काळी दौरे काजू बदाम खाण्यासाठी आहेत का? ठाकरेंचा सरकारला चिमटा