AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ketan Agarwal Murder : सर्वात मोठी बातमी… केतन मर्डर प्रकरणात पहिली मोठी कारवाई, थेट डॉक्टरच… मोठी अपडेट काय?

केतन अग्रवाल हत्या प्रकरणात सोशल मीडियावर केलेल्या असंवेदनशील टिप्पणीमुळे डॉ. मुस्कान सोनीला 'ऑल इंडिया डेंटल स्टुडंट्स अँड सर्जन्स असोसिएशन'ने (AIDSA) ५ वर्षांसाठी निलंबित केले आहे. केतनच्या दुःखद मृत्यूची थट्टा केल्याने समाजात संताप व्यक्त झाला. संस्थेने हे नैतिक मूल्यांचा भंग मानत कठोर कारवाई केली. जबाबदार व्यक्तींनी अशा क्रूर टिप्पण्या टाळाव्यात, हा संदेश यातून दिला.

Ketan Agarwal Murder : सर्वात मोठी बातमी... केतन मर्डर प्रकरणात पहिली मोठी कारवाई, थेट डॉक्टरच... मोठी अपडेट काय?
केतन अग्रवाल हत्या प्रकरण
| Updated on: Jul 01, 2026 | 12:38 PM
Share

फक्त महाराष्ट्रातच नव्हे तर अख्ख्या देशभरात चर्चेत असलेल्या केतन अग्रवाल हत्याकांडप्रकरणातील (Ketan Agarwal Murder) कट उलगडण्यात पोलीस व्यस्त आहेत. मात्र या अत्यंत संवेदनशील प्रकरणावर दुसरीकडे सोशल मीडियावर अत्यंत असंवेदनशील आणि आक्षेपार्ह टिप्पण्या होत असून, असे करणाऱ्यांवर आता कारवाईची कुऱ्हाड चालवली जात आहे. केतनच्या दुःखद मृत्यूची सोशल मीडियावर जाहीरपणे थट्टा करणाऱी डेंटिस्ट, डॉ. मुस्कान सोनी हिला तिच्या चुकीचे चांगलेच परिणाम भोगावे लागत आहेत. कारण ‘ऑल इंडिया डेंटल स्टुडंट्स अँड सर्जन्स असोसिएशन’ने (AIDSA) त्वरित कारवाई करत डॉ. मुस्कान सोनी हिला संघटनेतून पाच वर्षांसाठी निलंबित केलं आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मध्य प्रदेशातील डेंटिस्ट आणि असोसिएशनची खजिनदार असलेली डॉ. मुस्कान सोनी हिने, केतन अग्रवाल याच्या हत्येनंतर, तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर अत्यंत आक्षेपार्ह ‘स्टोरी’ पोस्ट केली होती. या स्टोरीमध्ये तिने केतनच्या भीषण मृत्यूबाबत असंवेदनशील टिप्पणी केली आणि हसण्याचे ‘इमोजी’ वापरून या घटनेची थट्टादेखील केली. एवढंच नव्हे तर, “तुम्ही जर असं खोटं बोलाल, तर मरालच ना,” असंही तिने म्हटलं होतं. यामुळे मोठी खळबळ माजली होती.

पाहता पाहता ही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली आणि अनेकांनी डॉ. मुस्कान हिच्याबद्दल नाराजी दर्शवत संताप व्यक्त केला. वैद्यकीय क्षेत्रासारख्या संवेदनशील व्यवसायातील व्यक्तीने, एखाद्या व्यक्तीच्या हत्येबाबत इतका क्रूर विनोद केल्याची ही घटना ‘ऑल इंडिया डेंटल स्टुडंट्स अँड सर्जन्स असोसिएशन’ने अत्यंत गांभीर्याने घेतली आहे. ही पोस्ट किंवा हे कृत्य म्हणजे केवळ घोर बेशिस्ती नव्हे तर संस्थेची नैतिक मूल्ये व प्रतिष्ठा यांचा भंग करणारे आणि डॉक्टरांकडून समाजाप्रती अपेक्षित असलेल्या संवेदनशीलतेचा अभाव दर्शवणारे कृत्य असल्याचे मत असोसिएशनने व्यक्त केलं.

AIDSA चा कठोर हुकूम : सर्व हक्क रद्द

यानंतर संस्थेने तिच्यावर निलंबनाची कारवाई केली. संस्थेने जारी केलेल्या अधिकृत निलंबन आदेशानुसार, या लज्जास्पद कृत्यामुळे डॉ. मुस्कान सोनी हिला पुढील पाच वर्षांसाठी पूर्णपणे ‘ब्लॅकलिस्ट’ करण्यात आलं आहे. या कालावधीत ती संस्थेतील कोणतेही अधिकृत पद भूषवण्यासाठी, कोअर कमिटीत काम करण्यासाठी किंवा संस्थेचे सामान्य सदस्यत्व राखण्यास पात् नसेल. निलंबनाच्या काळात तिला, संस्थेच्या कोणत्याही अधिकृत उपक्रमांमध्ये, परिसंवादांमध्ये किंवा बैठकांमध्ये सहभागी होण्याची परवानगी मिळणार नाही. तसेच पुढली 5 वर्ष तिला संस्थेअंतर्गत होणाऱ्या कोणत्याही निवडणुकीत उमेदवार म्हणून उभही राहता येणार नाही.

एखाद्.या जबाबदार पदावर असलेली कोणतीही व्यक्ती पीडित व्यक्ती आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या वेदनांची अशा प्रकारे सोशल मीडियावर थट्टा करणार नाही. असा संदेश समाजात पसरावा यासाठी ही कारवाई आवश्यक होती, असं संघटनेच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी नमूद केलं.

केतन अग्रवाल हत्या प्रकरण

पुण्यातील नामांकित बिझनेसमन विशाल अग्रवाल यांचा मुलगा केतन अग्रवाल याचा गेल्या महिन्या, 18 जून रोजी लोहगडावरून खाली कोसळून मृत्यू झाला. आधी सर्वांना हा अपघात वाटत होता,मात् केतनची होणारी पत्नी सिया गोयल आणि तिचा मित्र चेतन चौधरी यांनीच कट रचून त्याला खाली ढकलून त्याची हत्या केली अशी माहिती समोर आल्यावर सर्वांनाच धक्का बसला. दोन्ही आरोपींनी केतनला किल्ल्यातील एका उंच ठिकाणी नेऊन, तिथून त्याला खोल दरीत ढकलले.

घटनेनंतर, आरोपींनी मोठ्या चलाखीने केतन घसरून झालेला अपघात असल्याचे भासवण्याचा पुरेपूर प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी तांत्रिक पुरावे आणि कॉल डिटेल्स तपासल्यावर आणि कसून चौकशी केल्यावर सत्य उघडकीस येऊ लागलं. केतनचा अपघात नसून, एक पूर्वनियोजित, खुनी कट असल्याचे निष्पन्न झाले.

केतन आणि सिया यांचा या वर्षी फेब्रुवारीमध्ये साखरपुडा झाला होता. सोशल मीडियावरील त्यांचे फोटो आणि व्हिडिओ पाहून त्यांच्यात नक्की काय चालले आहे, याचा कोणालाच अंदाज आला नाही; ऑनलाइन ते एक ‘आदर्श कपल’ वाटत होते. मात्र, पडद्यामागे सिया ही तिचा प्रियकर चेतन याच्यासोबत केतनचा काटा काढण्याचा कट रचत होती. लोहागड किल्ल्यावरील 18 जूनच्या घटनेच्या अवघ्या चार दिवस आधी, सियाने केतनला त्याच किल्ल्यावरून खाली ढकलून जीवे मारण्याचा प्रयत्न केला होता, असंही पोलिसांच्या तपासातून समोर आलं होतं, मात्र त्यावेळी ती अयशस्वी ठरली होती. सध्या, या प्रकरणातील मुख्य आरोपी—केतनची होणारी पत्नी सिया गोयल आणि तिचा प्रियकर चेतन चौधरी—हे 3 जुलैपर्यंत पोलीस कोठडीत आहेत. पोलीस त्यांच्या राजस्थानमधील संपर्कांचा सखोल तपास करत असून, या हत्याकांडाशी संबंधित इतर कोणी साथीदर आहेत का, याचाही पोलिसांकडून शोध घेतला जात आहे.

Follow Us
ठाकरे बंधूंच्या गर्जाना मोर्चात तुफान गर्दी, ड्रोनदृश्य पहाच
Thackeray Garjana Morcha : ठाकरे बंधूंच्या गर्जाना मोर्चात तुफान गर्दी, ड्रोनदृश्य पहाच
राजा- उद्धव ठाकरे आणि बाळासाहेब थोरात एकाच गाडीतून मोर्चास्थळी दाखल,
राजा- उद्धव ठाकरे आणि बाळासाहेब थोरात एकाच गाडीतून मोर्चास्थळी दाखल, मोर्चाला सुरुवात
ज्ञानेश कुमारला हटवण्यासाठीचा हा मोर्चा आता... संजय राऊत काय म्हणाले?
Sanjay Raut At Mumbai : ज्ञानेश कुमारला हटवण्यासाठीचा हा मोर्चा आता... संजय राऊत काय म्हणाले?
लोकांच्या मॉर्निंग वॉकचं अंतर तुमच्या मोर्च्याच्या मार्गापेक्षा लांब..
लोकांच्या मॉर्निंग वॉकचं अंतर तुमच्या मोर्च्याच्या मार्गापेक्षा लांब आहे, भाजप नेत्याची जिव्हारी लागणारी टीका
ज्ञानेश कुमारांविरोधात ठाकरे बंधूंचा मुंबईत मोर्चा, अनिल परब यांचा...
ज्ञानेश कुमारांविरोधात ठाकरे बंधूंचा मुंबईत मोर्चा, अनिल परब यांचा भाजपवर निशाणा
ठाकरे बंधूंच्या नेतृत्वात आज गर्जना मोर्चा, बडा नेता होणार सहभागी
ठाकरे बंधूंच्या नेतृत्वात आज गर्जना मोर्चा, बडा नेता होणार सहभागी
शिवसैनिकांच्या अनोख्या बॅनरची तुफान चर्चा; उद्धव ठाकरे भावी पंतप्रधान
शिवसैनिकांच्या अनोख्या बॅनरची तुफान चर्चा; उद्धव ठाकरे भावी पंतप्रधान अन् राज ठाकरे तर थेट...
ठाकरे बंधूंचा ज्ञानेश कुमारांविरोधात एल्गार, मतदार यादीच्या मुद्द्यावर
ठाकरे बंधूंचा ज्ञानेश कुमारांविरोधात एल्गार, मतदार यादीच्या मुद्द्यावर मुंबईत मोठं आंदोलन
अभिजीत दिपकेंना मोठा धक्का! दादरमधील आंदोलन भोवलं? रहिवाशांची थेट...
अभिजीत दिपकेंना मोठा धक्का! दादरमधील आंदोलन भोवलं? रहिवाशांची थेट गुन्हा...
विक्रम शिंगाडेंवर विनयभंगाचा गुन्हा; अभयसिंह जगतापांचे पोलीसांसमोरच...
विक्रम शिंगाडेंवर विनयभंगाचा गुन्हा; अभयसिंह जगतापांचे पोलीस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन!