AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ketan Agrawal Case : सियाच्या आई – वडिलांच्या वाढणार अडचणी, ‘या’ 9 प्रश्नांची पोलिसांना द्यावी लागणार उत्तरं?

Ketan Agrawal Case : सिया गोयल हिने केलेल्या कृत्यामुळे सर्वत्र खळबळ उडाली असून तिच्या आई - वडिलांनी देखील मोठ्या अडचणींचा सामना कराव लागत आहे. आता मिळालेल्या माहितीनुसार, सिया हिच्या आई - वडिलांची देखील चौकशी होणार आहे. सियाच्या आई - वडिलांनी या 9 प्रश्नाची उत्तरं द्यावी लागणार आहेत.

Ketan Agrawal Case : सियाच्या आई - वडिलांच्या वाढणार अडचणी, 'या' 9 प्रश्नांची  पोलिसांना द्यावी लागणार उत्तरं?
| Updated on: Jun 27, 2026 | 1:14 PM
Share

Ketan Agrawal Case : केतन अग्रवाल याच्या निधनानंतर सर्वत्र खळबळ माजली आहे. सिया गोयल आणि तिचा कथित बॉयफ्रेंड चेतन चौधरी यांनी मिळून केतन याचा काटा काढल्यामुळे, दोघांच्या कुटुंबियांना देखील टीकेचा सामना करावा लागत आहे. मुलीने केलेल्या गुन्ह्यानंतर सिया हिच्या वडिलांना मोठा धक्का बसला असून त्यांच्यावर उपचार सुरु आहे. पोलीस देखील याप्रकरणी कसून चौकशी करत आहे. याप्रकरणी सिया हिच्या  आई – वडिलांची प्रतिक्रिया देखील समोर आली  आहे.  आमच्या मुलीची चूक असेल  तर, तिला देखील लोहगड येथून ढकलून द्या… अशी प्रतिक्रिया सिया हिच्या आई – वडिलांनी  दिली आहे. दरम्यान मोठी माहिती समोर येत आहे. सिया हिच्या आई – वडिलांना चौकशीत काही महत्त्वाची प्रश्न विचारण्यात येणार आहे. तर जाणून घ्या  सिया हिच्या  आई-वडिलांना कोणते प्रश्न विचारले जाणार आहेत.

सियाच्या आई-वडिलांना चौकशीत कोणत्या प्रश्नांची उत्तरं द्यावी लागणार?

  1. सिया आणि चेतन मित्र होते, त्यांचे प्रेम संबंध होते. याची तुम्हाला कल्पना होती का?
  2. सियाने चेतनशी लग्न करण्याचा हट्ट धरला होता का?
  3.  सियाच्या संमतीने केतनशी लग्न जुळवलं होतं का?
  4. सियाला केतनचा स्वभाव पटत नव्हता का?
  5. सियावर केतनशी लग्न करण्यासाठी जबरदस्ती केली जात होती का?
  6. लग्न ठरल्यानंतर ही सिया नेहमी चेतनशी भेटत होती, याची तुम्हाला माहिती नव्हती का?
  7. साहिल आणि चेतन मित्र आहेत, हे पण तुम्हाला माहित नव्हतं का?
  8. लोहगडावर ते तीन वेळा गेले होते, त्यावेळी सियाने काय कारणं सांगितली होती?
  9. केतनच्या हत्येचा कट रचला जात होता? याबाबत तुम्हाला कल्पना होती का?

केतन अग्रवाल प्रकरणाबाबत सांगायचं झालं तर, प्रकरणाचा तपास सुरु झाल्यापासून अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत. चेतन चौधरी आणि सिया गोयलने मिळून केतनच्या हत्येचा प्लान केला होता. केतनला मारण्यासाठी सिया आणि चेतनने मे महिन्यापासूनच लोहगड किल्ल्याची रेकी सुरू केली होती.

फेब्रुवारीत सियाचा साखरपुडा झाला होता. नोव्हेंबरमध्ये सिया आणि केतनचं लग्न होणार होतं. पण केतन सोबत लग्न सिया हिला मान्य नव्हतं.  हे लग्न होऊ नये म्हणून चेतन आणि सियाचे प्रयत्न सुरू होते . त्यामुळेच साखरपुड्याच्या तिसऱ्या महिन्यातच म्हणजे मे महिन्यात लोहगड किल्ल्याची रेकी केली होती. दोघांनीही जागा निवडली आणि पुढचं प्लानिंग केल्याचंही सूत्रांनी सांगितलं. सध्या  याप्रकरणी पोलीस कसून चौकशी करत आहेत.

Follow Us
आम्ही मरावं की जगावं... दुष्काळी परिस्थितीबाबत सांगताना शेतकऱ्याला...
Jalna : आम्ही मरावं की जगावं... दुष्काळी परिस्थितीबाबत सांगताना शेतकऱ्याला अश्रू अनावर
बाप्पा विसर्जनाच्या प्रतीक्षेत ताटकळला; उपनगरचा राजा काल सकाळपासून...
Ganpati Visarjan 2026 : बाप्पा विसर्जनाच्या प्रतीक्षेत ताटकळला; उपनगरचा राजा काल सकाळपासून मढ जेटीवरच, प्रशासनाच्या नियोजनावर प्रश्नचिन्ह
राज्यात दुष्काळ जाहीर; दत्ता भरणे नेमकं काय म्हणाले?
Maharashtra Drought Issue : राज्यात दुष्काळ जाहीर; दत्ता भरणे नेमकं काय म्हणाले?
राऊत अचानक राज ठाकरेंच्या भेटीला दोघांमध्ये नेमकी काय चर्चा?
Sanjay Raut Meet Raj Thackeray : संजय राऊत अचानक राज ठाकरेंच्या भेटीला शिवतीर्थवर! दोघांमध्ये नेमकी काय चर्चा? राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
मोठी अपडेट समोर! ट्रिगर-1 म्हणजे काय? महाराष्ट्रातील दुष्काळ निवारण...
मोठी अपडेट समोर! ट्रिगर-1 म्हणजे काय? महाराष्ट्रातील दुष्काळ निवारणाचा पहिला टप्पा
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील यांची नवी रणनीती; नेमकं काय ठरवलं?
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील यांची नवी रणनीती; नेमकं काय ठरवलं?
मुख्यमंत्री फडणवीसांमुळे शेतकऱ्यांची दिवाळी गोड होणार; नेत्याचं...
मुख्यमंत्री फडणवीसांमुळे शेतकऱ्यांची दिवाळी गोड होणार... बड्या नेत्याचं विधान चर्चेत
राज्यातील 265 तालुक्यात दुष्काळ जाहीर विरोधक काय म्हणतात?
Maharashtra Drought Issue : राज्यातील 265 तालुक्यात दुष्काळ जाहीर विरोधक काय म्हणतात?
मोठी बातमी! महाराष्ट्रातील 75 टक्के भागात दुष्काळ जाहीर; म्हणजेच 265..
मोठी बातमी! महाराष्ट्रातील 75 टक्के भागात दुष्काळ जाहीर; म्हणजेच 265 तालुक्यांमध्ये...
अखेरचं मुख दर्शन; लालबागच्या राजाला कार्यकर्त्यांचा भावनिक निरोप
Lalbagcha Raja 2026 : अखेरचं मुख दर्शन; लालबागच्या राजाला कार्यकर्त्यांचा भावनिक निरोप