AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ketan Agarwal Murder : चेतनसोबत असते तेव्हा मला… सियाने भाऊ साहिलला सांगितले होते ते 5 शब्द; त्यानंतरही…

Sahil Goyal revealed what Siya told Him : केतन अग्रवाल हत्या प्रकरणात रोज नवे खुलासे होत आहेत. नुकतेच आरोपी सिया गोयलचा भाऊ साहिल गोयलने पोलिसांना जबाब दिला असून, सिया केतनसोबतच्या नात्याबद्दल संभ्रमात असल्याचे म्हटले. त्याने सियाने प्रेमसंबंधात असल्याची कबुली कधीच दिली नसल्याचे सांगितले.

Ketan Agarwal Murder : चेतनसोबत असते तेव्हा मला... सियाने भाऊ साहिलला सांगितले होते ते 5 शब्द; त्यानंतरही...
सियाने काय सांगितलं, साहिलचा गौप्यस्फोट
| Updated on: Jun 30, 2026 | 12:05 PM
Share

लोहगडावरून दरीत ढकलल्यामुळे मृत्यू झालेल्या कतेतन अग्रवालबद्दल सगळीकडे चर्चा सुरू आहे. जसजसे दिवस उलटत आहेत तसतशी या हत्याकांडाप्रकरणी रोज नवी माहिती, नवे खुलासे समोर येत आहेत. या केसच्या तपासादरम्यान पोलिसांनी आत्तापर्यंत अनेकांचे जबाब नोंदवून घेतले असून केतनच्या हत्येचा आरोप असलेली सिया गोयल, हिचा भाऊ आणि तिच्या आई-वडिलांचीही चौकशी करण्यात आली आहे. गेल्या आठवड्यातच सिया हिचा भाऊ साहिल गोयल याला पोलिसांनी चौकशीसाठछी बोलावलं, 10-12 तास त्याला प्रश्न विचारण्यात आले, तसेच त्याचा जबाबही नोंदवण्यात आला. आता याच सियाचा भावने, साहिल गोयल याने मोठं वक्तव्य केलं असून या प्रकरणाा नवं वळण मिळू शकतं.

सियाने चेतनशी असलेल्या नात्याबद्दल तुला काही सांगितलं होतं का , तुमचं काही बोलणं झालं होतं का, याबद्दल साहिलला विचारण्यात आलं होतं. एका वृत्तवाहिनीशी संवाद साधताना त्याने सियाशी काय बोलणं झालं त्याचा खुलासा केला. मी आणि चेतन मित्र आहोत. मला माहीत नाहीये हे काय आहे, मी कन्फ्युज्ड आहे. आम्ही रिलेशनशिपमध्ये आहोत असं सियाने मला कधीच सांगितलं नाही. आम्ही दोघं एकत्र असतो, मला चांगलं वाटतं. We are Happy when we are Together, it is very early to say anything असं सियाने आपल्याला सांगितल्याचं साहिलने नमूद केलं. तिला कन्फ्युजन होतं असंही तो म्हणाला.

मात्र भावाशी झालेल्या या संभाषणानंतरही सियाने चेतनसोबत केतनचा काटा काढण्याचा प्लान रचला. याप्रकरणी पोलिसांकडून अधिक तपास सुरू असून 28 तारखेला सियाला लोहगडावर नेऊन सीन- रिक्रिएशन करण्यात आलं होतं.

लोकं मैत्रीला प्रेम समजतात

त्याचं काय होतं याबद्दल ती कन्फ्युज होती. त्यावर मी तिला म्हणालो ठीक आहे, असं होत असतं. तू खूप लहान आहेस, वय लहान आहे तुझं. इट्स ओके. बऱ्याचदा असं होतं की लोकं मैत्रीला प्रेम समजतात कधीकधी. तु जर म तर ला म्हणाली आहेस की तुला केतनसोबत नात्यात पुढे जायचं आहे, तर ठीक आहे. हे आपलं सीक्रेट राहील. मी कोणालाच काही सांगणार नाही, असं मी सियाला सांगितल्याचं साहिलने नमूद केलं.

तर मी आई-वडिलांना सांगितलं असतं..

पण तिने जर म्हटलं असतं की मला चेतनसोबत जायचं आहे, तर आम्ही ही गोष्ट नक्कीच आमच्या पालकांना सांगितली असती, आम्ही त्यांच्याशी बोललो असतो. आम्ही हा ( केतन- सियाचा) साखरपुडा मोडला असता, असं साहिल म्हणाला. पण मी याबाबत कोणालाच सांगितलं नाही. माझ्या आई-वडिलांनाही नाही, असंही तो पुढे बोलताना म्हणाला.

चेतनचं होणार गेट ॲनॅलिसिस

दरम्यान केतन अग्रवाल हत्या प्रकरणी अटकेत असलेल्या सिया गोयल आणि केतन चौधरी यांची पोलीस कोठडीची मुदत काल संपली. त्यानंतर न्यायालयासमोर हजर करण्यात आल्यावर न्यायालयाने त्यांना 3 जुलैपर्यंत पोलीस कोठडी ठोठावली. आता पोलीसांकडून चेतन याचे गेट ॲनॅलिसिस केलं जाणार आहे. एआयच्या माध्यमातून केतन चौधरीचा वॉकिंग पॅटर्न तपासण्यात येणार आहे. लोणावळ्यातील लोहगड किल्ल्यावरील सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसणाऱ्या व्यक्तीची चालण्याची पद्धत आणि विशेषतः या उद्देशासाठी रेकॉर्ड केलेला चेतनच्या चालण्याचा व्हिडिओ यांची तुलना केली जाईल.

Follow Us
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसूणही २०० रुपये किलोपर्यंत पोहोचला
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसूणही २०० रुपये किलोपर्यंत पोहोचला
साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार...
आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब
Chandrashekhar Bawankule : आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब, बावनकुळेंनी दिली महायुती बैठकीची माहिती
विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट
'विद्यार्थी भीक नाही हक्क मागतायत', पुण्यातील आदिवासी विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट
धाराशिवमध्ये ठाकरेंना धक्का; 4 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार
Dharashiv | धाराशिवमध्ये ठाकरेंना धक्का; 4 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार
निधीवरुन मतभेद झाल्यास आयुक्तांमार्फत तोडगा काढला जाणार
महायुतीच्या समन्वय समितीची बैठक: निधीवरून मतभेद झाल्यास आयुक्तांमार्फत तोडगा, फडणवीस-शिंदेंकडे अंतिम निर्णय
पुण्यात राहुल गांधींसमोर विद्यार्थिनीने मांडले आदिवासींचे प्रश्न
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोर विद्यार्थीनीनं आदिवासींच्या समस्यांचा पाढा वाचला
नवी इलेक्ट्रिक बुलेटप्रूफ कार ताफ्यात दाखल
देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी नवी इलेक्ट्रिक बुलेटप्रूफ कार ताफ्यात दाखल
खान्देशात कानबाई विसर्जन २०२४; उत्साही सोहळा
खान्देशात कानबाई मातेचं विसर्जन: लोकसंस्कृतीचा उत्साही सोहळा