AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Khavdya Dongar Case : मृत्युआधी संगीता चांदगुडे यांचे हादरवणारे आरोप, नणंद नेहमी…तो व्हिडीओ समोर आल्याने खळबळ!

म्ही तुमच्या बहिणींच्या सर्व चुका माफ केल्या. मी काहीही चुक केलेली नसता मला शिक्षा कशी मिळू शकते. मला समाजात वाईट कसं दाखवलं जाऊ शकता. एक वेळेला स्वत:च्या मनाला विचारा. वाईट तुम्ही वागले, असा आरोप संगीता चांदगुडे यांनी केला.

Khavdya Dongar Case : मृत्युआधी संगीता चांदगुडे यांचे हादरवणारे आरोप, नणंद नेहमी...तो व्हिडीओ समोर आल्याने खळबळ!
kunal chandgude and sangita chandgudeImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Aug 23, 2026 | 6:40 PM
Share

Khavdya Dongar Case : छत्रपती संभाजीनगरात खवड्या डोंगरावरून उडी मारल्याने संपूर्ण चांदगुडे कुटुंब संपून गेले. वडील आणि मुलामध्ये वाद असल्याने या वादाचा शेवट मृत्यूवर झाला. या घटनेचे अनेक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. आयफोनच्या हप्त्यांमुळे कुणाल त्याच्या वडिलांसोबत वाद घालत होता, असे सांगितले जात होते. परंतु नंतर मात्र या घटनेला कौटुंबिक वादाची किनार आहे, असा दावा आता केला जातोय. या घटनेत मृत्युमुखी पडलेल्या संगीता चांदगुडे या यूट्यूबर होत्या. त्यांच्या त्यांच्या यूट्यूब चॅनेलवर अनेक व्हिडीओ अपलोड केलेले आहेत. यातील काही व्हिडीओंमध्ये त्या कौटुंबिक वादावर बोलताना दिसत आहेत. याच व्हिडीओंमुळे चांदगुडे कुटुंब आणि संगीता चांदगुडे यांची नणंद यांच्यात काही वाद होते का? असा सवाल उपस्थित केला जात आहे.

भावाच्या मुलांना सतत शिव्या द्यायच्या

संगीता चांदगुडे या एका व्हिडीओमध्ये त्यांच्या नणंदेबद्दल बोलताना दिसत आहेत. त्यांनी कोणाचेही नाव घेतलेले नाही. परंतु व्हिडीओमध्ये त्यांनी केलेले दावे हे हादरवणारे आहेत. “आजकालच्या ज्या बहिणी आहेत त्यांना त्यांच्या भावजयांना कधीच समजून घ्यायचं नाही. भावाच्या मुलांना सतत शिव्या द्यायच्या. भावाच्या संसारात आग लावायची. भांडण घडवून आणायची. भावाचा संसार कसा मोडेल यासाठी प्रयत्न करायचा. संसार मोडता न आल्यास तर मग प्रॉपर्टीमध्ये हिस्सा मागायचा. प्रॉपर्टी घ्यायची,” असं संगीता चांदगुडे या व्हिडीओत बोलताना दिसत आहेत.

तुम्हाला तुमच्या कर्माची फळं भेटली

तसेच पुढे बोलताना, भावाच्या दु:खात त्याला साथ द्यायची नाही. भावजयीला समजून घ्यायचं नाही. भावाचा मुलगा जेव्हा जग सोडतो त्या वेळीही भावजयीला, भावाला शिवीगाळ करायची. त्रास द्यायचा. वाट्टेल ते बोलायचं. प्रॉपर्टी स्वत:च्या नावावर करून घ्यायची. कालांतराने तुम्हाला तुमच्या कर्माची फळं भेटली की मग भावजयकडून सगळं विसरून जाण्याची अपेक्षा करायची. आज तुम्हाला तुमच्या बहिणीसाठी वाईट वाटतंय. तुम्हाला तुमच्या मुलासाठी, बायकोसाठी का वाईट वाटलं नाही,” असे सवाल संगीता चांदगुडे यांनी केले आहेत.

माझा मुलगा गेल्यानंतर त्यांनी सण करून खाल्ले

पुढे संगीता चांदगुडे आपल्या पतीलाही उद्देशून बोलताना दिसत आहेत. “तुम्ही तुमच्या बहिणींच्या सर्व चुका माफ केल्या. मी काहीही चुक केलेली नसता मला शिक्षा कशी मिळू शकते. मला समाजात वाईट कसं दाखवलं जाऊ शकता. एक वेळेला स्वत:च्या मनाला विचारा. वाईट तुम्ही वागले. मी वाईट वागले नाही,” असं त्यांनी या व्हिडीओत सांगितले आहे. तसेच माझा मुलगा गेल्यानंतर त्यांनी सण करून खाल्ले, पार्टी केल्या. मी तर तसं काहीच केलं नाही. तुम्ही जर मला साथ दिलेली नसेल तर तुम्ही माझ्याकडूनही मदतीची अपेक्षा करू नका, अशी भूमिकाही त्यांनी या व्हिडीओत घेतली आहे. दरम्यान, पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

Follow Us
नाना पाटेकर यांच्या निधनाने उद्धव ठाकरे भावुक; म्हणाले, 'विश्वासच...
नाना पाटेकर यांच्या निधनाने उद्धव ठाकरे भावुक; म्हणाले, 'विश्वासच बसत नाही की...
नाना पाटेकरांच्या निधनाने सिनेसृष्टीवर शोककळा; CM फडणवीसांची भावनिक...
नाना पाटेकरांच्या निधनाने सिनेसृष्टीवर शोककळा; CM फडणवीसांची भावनिक प्रतिक्रिया, म्हणाले...
नाना पाटेकरांच्या निधनाने सुनेत्रा पवार भावुक; म्हणाल्या...
नाना पाटेकरांच्या निधनाने सुनेत्रा पवार भावुक; म्हणाल्या, ‘सिनेसृष्टीतल ही पोकळी भरून निघणार नाही’
डॉक्टरांचं पथक घरी पोहोचलं तेव्हा नाना पाटेकर बेशुद्ध अवस्थेत होते...
डॉक्टरांचं पथक घरी पोहोचलं तेव्हा नाना पाटेकर बेशुद्ध अवस्थेत होते; 45 सीपीआर दिला मात्र...  काय घडलं?
नाना पाटेकरांच्या निधनाची बातमी ऐकून मोठा धक्का बसला- सुप्रिया सुळे
नाना पाटेकरांच्या निधनाची बातमी ऐकून मोठा धक्का बसला, मी... सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
नाना पाटेकरांच्या निधनाची बातमी ऐकताच... मराठी सिनेसृष्टीतील...
नाना पाटेकरांच्या निधनाची बातमी ऐकताच... मराठी सिनेसृष्टीतील अभिनेत्याची भावनिक प्रतिक्रिया
ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकरांचं निधन; वयाच्या 75 व्या वर्षी घेतला अखेर
Nana Patekar | ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकरांचं निधन; वयाच्या 75 व्या वर्षी घेतला अखेर
MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर आज तोडगा? दोन मंत्री पुण्यात येणार...
MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर आज तोडगा? दोन मंत्री पुण्यात येणार, रोहित पवारांची मोठी माहिती
विद्यार्थी अँटी-सोशल नाहीत; MPSC आंदोलनावर हायकोर्टाचा सरकारला दणका...
MPSC Student Protest : विद्यार्थी अँटी-सोशल नाहीत; MPSC आंदोलनावर हायकोर्टाचा सरकारला दणका, नेमकं काय म्हणालं कोर्ट?
आंदोलन आता विद्यार्थ्यांचं राहिलेलं नाही, ते...; फडणवीसांचा थेट निशाणा
Devendra Fadnavis on MPSC : आंदोलन आता विद्यार्थ्यांचं राहिलेलं नाही, ते...; MPSC आंदोलनावर फडणवीसांचा थेट निशाणा