AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Raj Thackeray Thane: राज ठाकरेंची सभा म्हणजे ‘उत्तर’ पूजा, आधी भैय्यांसोबत काटाकुटी आता गुलु गुलु; किशोरी पेडणेकरांनी डिवचले

मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांची उत्तर सभा अवघ्या काही वेळातच ठाण्यात होणार आहे. त्यापूर्वीच शिवसेनेच्या (shivsena) प्रवक्त्या किशोरी पेडणेकर (kishori pednekar) यांनी मनसेला डिवचले आहे.

Raj Thackeray Thane: राज ठाकरेंची सभा म्हणजे 'उत्तर' पूजा, आधी भैय्यांसोबत काटाकुटी आता गुलु गुलु; किशोरी पेडणेकरांनी डिवचले
किशोरी पेडणेकरImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Apr 12, 2022 | 6:56 PM
Share

मुंबई: मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांची उत्तर सभा अवघ्या काही वेळातच ठाण्यात होणार आहे. त्यापूर्वीच शिवसेनेच्या (shivsena) प्रवक्त्या किशोरी पेडणेकर (kishori pednekar) यांनी मनसेला डिवचले आहे. ही कसली उत्तर सभा? ही तर उत्तर पूजा आहे. आम्हाला त्यात रस नाही. आमच्या कडे ही मुस्लिम पदाधिकारी आहेत. आधी भैय्यांसोबत कुटाकुटी केली आणि आता गुलु गुलु करत आहात. मनसेच्या या बदलत्या धोरणांमुळे त्यांचे कार्यकर्ते देखील चिडले आहेत. अशा शब्दात किशोरी पेडणेकर यांनी मनसेला डिवचले आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंना जिवंतपणी त्रास दिला. मनसे जेव्हा स्थापन झाली तेव्हा शिवसेना भावनावर दगडफेक केली. ही शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंना वेदना देणारी मनसे आहे, अशी घणाघाती टीकाही किशोरी पेडणेकर यांनी केली. त्या मीडियाशी संवाद साधत होत्या.

मनसे आता स्टंटबाजी करत आहे. प्रत्येक वेळेला भूमिका बदलत आहे. ज्या सेनाभावनात तुम्ही आरती करण्यासाठी पत्र लिहिताय, त्याचा भावनावर तुम्ही दगफेक केली होती. शिवतीर्थ उभं केलं आहे ना. त्यात मंदिर नाही आहे का? तुम्ही भेदभाव का करत आहात? एकीकडे भैय्यांबद्दल बोलतात पण तुम्ही तुमच्या झेंड्यात सगळ्यांना आणलं, मात्र भगवा मात्र अगदी छोटा होता. परवानग्या कसल्या मागता आमच्याकडे. ही शिवसेना प्रमुखाने पावन केलेली जमीन आहे. त्यावर तुम्ही दगडफेक केली. हिंदुत्व मिरवण्याची गोष्ट नाही. हनुमान चालीसा रस्त्यावर कशाला आणला?, असा सवाल किशोरी पेडणेकर यांनी केला.

आम्हाला भोंग्याची भीती नाही

यावेळी त्यांनी चित्रा वाघ यांच्यावरही टीका केली. मला वाईट वाटतं की आपण स्त्रिया असून त्यांची मदत केली पाहिजे. पण बनाव करून एका पीडित महिलेचा आणि कुठल्या नेत्याला बदनाम करण्यासाठी भाजपच्या पदावर असलेल्या व्यक्तीने अश्या पद्धतीने वर्तन करावे ही गोष्टच निषेधार्ह आहे. त्या नेहमी बोलतात की भोंग्याने जागं केलं. पण याचं भोंग्यामुळे तुम्हालाही झोप नाही आली म्हणून तुम्ही भाजप पक्षात गेलात. आम्हाला भोंग्याची भीती नाही वाटत. आम्ही धर्माच्या विरोधात नाही तर प्रवृत्तीचा विरोधात आहोत, असं किशोरी पेडणेकर म्हणाल्या.

संबंधित बातम्या:

Raj Thackeray Speech LIVE : राज ठाकरेंचं वादळी भाषण Live, आज इतर पक्षांचे “भोंगे” बंद होतील-मनसे

Maharashtra News Live Update : किरीट सोमय्यांच्या अडचणी वाढल्या, आजही कोर्टात पदरी निराशा

INS Vikrant Case : भाजपाच्या तत्कालीन प्रदेशाध्यक्ष आणि खजिनदाराची चौकशी करा; नाना पटोले यांची मागणी

मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला
मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला.
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली.
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग.
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट.
लाल किल्ल्या स्फोट प्रकरणात महाराष्ट्र कनेक्शन उघड, आरोपीनं...
लाल किल्ल्या स्फोट प्रकरणात महाराष्ट्र कनेक्शन उघड, आरोपीनं....
प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये येताच म्हणाले, माझी लढाई भाजप विरोधात....
प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये येताच म्हणाले, माझी लढाई भाजप विरोधात.....
प्रशांत जगतापांचा हर्षवर्धन सपकाळांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश
प्रशांत जगतापांचा हर्षवर्धन सपकाळांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश.
पुण्यात शिंदे सेनेत नाराजीनाट्य, नीलम गोऱ्हेंच्या घराबाहेर ठिय्या
पुण्यात शिंदे सेनेत नाराजीनाट्य, नीलम गोऱ्हेंच्या घराबाहेर ठिय्या.
...तर त्यांच्यासोबत नसू, दोन्ही NCP एकत्र येण्यावर दानवे काय म्हणाले?
...तर त्यांच्यासोबत नसू, दोन्ही NCP एकत्र येण्यावर दानवे काय म्हणाले?.
फडणवीसांकडून ठाकरे बंधूंना पुतीन-झेलेन्स्की उपमा अन् जागावाटपावर भाष्य
फडणवीसांकडून ठाकरे बंधूंना पुतीन-झेलेन्स्की उपमा अन् जागावाटपावर भाष्य.