AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Eknath shinde: कोल्हापूरच्या दोन खासदारांनी बाळासाहेबांचे स्वप्न धुळीस मिळवलं; मंडलिक-माने शिंदे गटात सामील; भविष्यात काय होणार…

काँग्रेसचे आमदारा सतेज पाटील यांनी आमचं ठरलय म्हणत त्यांनी शिवसेनेचे उमेदवारी मिळालेल्या संजय मंडलिकांना साथ देत त्यांनी आपलं सगळं पाठबळ संजय मंडलिकांच्या मागं उभा करून त्यांना निवडून आणलं,त्यानंतर आमचं ठरलंय म्हणत शिवसेना आणि काँग्रेस, राष्ट्रवादीनं अडीच वर्षे राज्यात सुरळीत सरकार देण्याचा प्रयत्न करण्यात आला मात्र

Eknath shinde: कोल्हापूरच्या दोन खासदारांनी बाळासाहेबांचे स्वप्न धुळीस मिळवलं; मंडलिक-माने शिंदे गटात सामील; भविष्यात काय होणार...
| Updated on: Jul 19, 2022 | 6:17 PM
Share

कोल्हापूरः मागील लोकसभा निवडणुकीच्यावेळी खासदार धनंजय उर्फ मुन्ना महाडिक (MP Dhananjay alias Munna Mahadik) आणि खासदार संजय मंडलिक (MP Sanjay Mandalik) यांच्यात जोरदार चुरस निवडणूक झाली होती. त्यावेळी काँग्रेसचे आमदारा सतेज पाटील यांनी आमचं ठरलय म्हणत त्यांनी शिवसेनेचे उमेदवारी मिळालेल्या संजय मंडलिकांना साथ देत त्यांनी आपलं सगळं पाठबळ संजय मंडलिकांच्या मागं उभा करून त्यांना निवडून आणलं,त्यानंतर आमचं ठरलंय म्हणत शिवसेना आणि काँग्रेस, राष्ट्रवादीनं अडीच वर्षे राज्यात सुरळीत सरकार देण्याचा प्रयत्न करण्यात आला मात्र विधान परिषदेत्या निकालानंतर मात्र एकनाथ शिंदे यांनी मुंबई-सूरत-गुवाहाटी-गोवा आणि पुन्हा मुंबई असा प्रवास ठाकरे सरकारला पायउतार केलं.

त्या राजकीय नाट्यानंतर आता कोल्हापूरचे संजय मंडलिक आणि धैर्यशील माने (Dhairyasheel Mane) हे दोन्ही खासदार आता शिंदे गटात सामील झाले आहे.

दुसरा राजकीय धक्का

महाविकास आघाडीचे सरकार गेल्यानंतर आता दुसरा राजकीय धक्का देण्यात आला तो म्हणजे शिवसेनेचे बारा खासदार शिंदे गटात सामील झाल्याच्या वृत्ताने. हा धक्का जसा शिवसेनेला आहे तसाच तो धक्का कोल्हापूरच्या राजकारणात आहे. त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील शिवसैनिकांना दोन खासदार शिंदे गटात सामील झाल्याने मोठा धक्का बसला आहे.

बाळासाहेब ठाकरेंचं स्वप्न

हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्न होते की, करवीरनगरीतील दोन्ही खासदार हे हे शिवसेनेचे असावेत. बाळासाहेब ठाकरे हयात असताना त्यावेळी जोरदार प्रयत्न झाले पण ते शक्य झालं नाही. त्यामुळेच रमेश देव आणि विक्रमसिंह घाटगे यांना शिवसेनेकडून उमेदवारी देऊन लोकसभा लढवण्यात आली मात्र त्यावेळी यश आलं नाही. बाळासाहेबांच्या निधनानंतर मात्र त्यांचे स्वप्न 2019 साली साकार झाले पण अवघ्या 3 वर्षात बाळासाहेबांचं हे पूर्ण झालेलं स्वप्न धुळीस मिळवण्याचं काम खासदार संजय मंडलिक आणि धैर्यशील माने यांनी केले.

 कट्टर शिवसैनिकांचं खासदारांनाच आव्हान

खासदार संजय मंडलिक यांच्या माध्यमातून रेल्वे बोर्डावरचे सदस्य म्हणून नियुक्ती झालेल्या शिवसेनेचे शहरप्रमुख सुनील मोदी यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. तर दुसरीकडे जिल्ह्यातील शिवसैनिकांनी या खासदारांना थेट आव्हान देत सांगितले आहे की, घरासमोर कितीही बंदोबस्त लावा, शिवसैनिक राजकीय वचपा काढणार म्हणजे काढणारच हे लक्षात ठेवा असंही शिवसेनेचे जिल्हा समन्वयक हर्षल सुर्वे सुनावलं आहे.

तोच पैसा, तेच आकडे अन् तशीच मशीन सेट...राऊतांचा महायुतीवर थेट निशाणा
तोच पैसा, तेच आकडे अन् तशीच मशीन सेट...राऊतांचा महायुतीवर थेट निशाणा.
कोकणात राणे बंधूंच्या लढतीत निलेश राणेंची सरशी तर चव्हाणांना धक्का
कोकणात राणे बंधूंच्या लढतीत निलेश राणेंची सरशी तर चव्हाणांना धक्का.
जिल्हा कोणाच्या मागे ते...दादांची नगर परिषदांच्या निकालावर प्रतिक्रिया
जिल्हा कोणाच्या मागे ते...दादांची नगर परिषदांच्या निकालावर प्रतिक्रिया.
BJP ची सेंच्युरी, सेनेची हाफ सेंच्युरी...शिंदेंची निकालावर प्रतिक्रिया
BJP ची सेंच्युरी, सेनेची हाफ सेंच्युरी...शिंदेंची निकालावर प्रतिक्रिया.
मोहळमध्ये शिंदे सेनेचा सर्वात कमी वयाचा उमेदवारानं फडकवला झेंडा
मोहळमध्ये शिंदे सेनेचा सर्वात कमी वयाचा उमेदवारानं फडकवला झेंडा.
देवाभाऊंची जादू कायम, स्थानिक निवडणुकीत भाजपचा विजय, महायुती 200 पार
देवाभाऊंची जादू कायम, स्थानिक निवडणुकीत भाजपचा विजय, महायुती 200 पार.
थोरात मामा-भाचे जोडीनं विजय खेचून आणला, संगमनेरमध्ये काँग्रेसची हवा
थोरात मामा-भाचे जोडीनं विजय खेचून आणला, संगमनेरमध्ये काँग्रेसची हवा.
महाडमध्ये गोगावलेंनी गड राखला, दादांच्या राष्ट्रवादीच्या तटकरेना धक्का
महाडमध्ये गोगावलेंनी गड राखला, दादांच्या राष्ट्रवादीच्या तटकरेना धक्का.
परळीच्या विजयावर धनंजय मुंडे म्हणाले, बदनाम करणाऱ्यांना जनतेने धडा...
परळीच्या विजयावर धनंजय मुंडे म्हणाले, बदनाम करणाऱ्यांना जनतेने धडा....
नितेश राणेंना धक्का, निलेश राणेंच्या पाठिंब्यानं स्थानिक आघाडीचा विजयी
नितेश राणेंना धक्का, निलेश राणेंच्या पाठिंब्यानं स्थानिक आघाडीचा विजयी.