ग्रामपंचायत निवडणुकीत अजब प्रकार, उमेदवाराचं स्वत:लाच मतदान नाही!

ग्रामपंचायत निवडणुकीत अजब प्रकार, उमेदवाराचं स्वत:लाच मतदान नाही!
4. ज्या मतदारांचा फोन नंबर लिंक नाही, त्यांना डिजिटल ओळखपत्रासाठी नंबर लिंक करणं आवश्यक आहे.

राज्यातील 14 हजार 234 ग्रामपंचायत निवडणुकीचं मतदान मोठ्या उत्साहात पार पडलं. (Kolhapur Gram Panchayat Election 2021)

Namrata Patil

| Edited By: सचिन पाटील

Jan 15, 2021 | 8:22 PM

कोल्हापूर : ग्रामपंचायत निवडणुकांच्या निमित्ताने गेल्या महिनाभरापासून सुरु असलेली गावागावातील लगबग, उमेदवारांची धावपळ, कार्यकर्त्यांची चढाओढ अखेर आज संपली. राज्यातील 14 हजार 234 ग्रामपंचायत निवडणुकीचं मतदान मोठ्या उत्साहात पार पडलं. नुकतंच ग्रामपंचायत निवडणुकीत अजब प्रकार समोर आला आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील शाहूवाडी तालुक्यात पेरीडमध्ये एकाही मतदाराने मतदान केलं नाही. विशेष म्हणजे उमेदवारानेही स्वत:ला मतदान केलेलं नाही. (Kolhapur Gram Panchayat Election 2021 Candidate Didn’t vote for himself)

कोल्हापूर जिल्ह्यातील पेरीड ग्रामपंचायत निवडणुकीत आश्चर्यकारक प्रकार समोर आला आहे. या गावात उमेदवारासह एकाही व्यक्तीने मतदान केलेलं नाही. या गावातील 9 पैकी 8 जागांवर बिनविरोध निवडणूक झाली आहे. तर एका वॉर्डात 2 उमेदवार रिंगणात होते. मात्र या दोन्ही उमेदवारांनी एकालाही मतदान केलेलं नाही. विशेष म्हणजे स्वतः उमेदवाराने  स्वतःला मतदान केलं नाही.

शाहूवाडी तालुक्यातील पेरीड गाव आहे. या गावात कधीच निवडणूक झाली नव्हती. या गावात बिनविरोध निवडीची परंपरा आहे. या ठिकाणी 9 सदस्यांची ग्रामपंचायत असून 8 सदस्य बिनविरोध ठरले आहेत. मात्र एका उमेदवारावर एकमत न झाल्याने केवळ एका जागेसाठी दोन उमेदवार रिंगणात उतरले होते. पण उमेदवारासह एकाही व्यक्तीने मतदान केलेलं नाही.

निवडणूक होणाऱ्या ग्रामपंचायतींची जिल्हानिहाय संख्या

ठाणे- 158, पालघर- 3, रायगड- 88, रत्नागिरी- 479, सिंधुदुर्ग- 70, नाशिक- 621, धुळे- 218, जळगाव- 783, अहमनगर- 767, नंदुरबार- 87, पुणे- 748, सोलापूर- 658, सातारा- 879, सांगली- 152, कोल्हापूर- 433, औरंगाबाद- 618, बीड- 129, नांदेड- 1015, उस्मानाबाद- 428, परभणी- 566, जालना- 475, लातूर- 408, हिंगोली- 495, अमरावती- 553, अकोला- 225, यवतमाळ- 980, वाशीम- 163, बुलडाणा- 527, नागपूर- 130, वर्धा- 50, चंद्रपूर- 629, भंडारा- 148, गोंदिया- 189 आणि गडचिरोली- 362. एकूण- 14,234.

प्रभाग – 46,923

जागा – 1,24,819

उमेदवार : अडीच लाखांहून अधिक

(Kolhapur Gram Panchayat Election 2021 Candidate Didn’t vote for himself)

संबंधित बातम्या : 

मतदान पार पडलं, आता निकालाची प्रतिक्षा; उमेदवारांमध्ये धाकधूक, कार्यकर्त्यांचे जीव टांगणीला!

धक्कादायक! मतदानाच्या दिवशीच उमेदवाराचा मृत्यू, हृदयविकाराच्या झटक्याने गेला जीव

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें