AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कोल्हापुरातील बडा नेता भाजपमध्ये प्रवेश करणार; अमित शाहांच्या उपस्थितीत कमळ हाती घेणार

Rahul Prakash Awade Will join BJP : कोल्हापुरात मोठ्या घडामोडी घडत आहेत. काँग्रेसला मोठा धक्का बसणार आहे. एक बडा नेता, आमदार भाजपमध्ये प्रवेश करणार आहे. काँग्रेसला रामराम करून अमित शाहांच्या उपस्थितीत कमळ हाती घेणार आहेत. कोण आहे हा अपक्ष आमदार? वाचा सविस्तर...

कोल्हापुरातील बडा नेता भाजपमध्ये प्रवेश करणार; अमित शाहांच्या उपस्थितीत कमळ हाती घेणार
अमित शाह
| Updated on: Sep 25, 2024 | 1:35 PM
Share

विधानसभा निवडणूक तोंडावर आहे. अशात राज्याच्या राजकीय वर्तुळात घडामोडींना वेग आला आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. या दौऱ्या दरम्यान कोल्हापुरातील बडा नेता भाजपमध्ये प्रवेश करणार आहे. इचलकरंजीचे अपक्ष आमदार प्रकाश आवाडे यांचा आज भाजप प्रवेश होणार आहे. प्रकाश आवाडे यांच्यासह चिरंजीव राहुल आवाडे देखील भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. काँग्रेसला रामराम करून अपक्ष निवडून आलेल्या आवाडे यांनी भाजपला पाठिंबा दिला आहे. 2019 साली भाजपच्या सुरेश हळवणकर यांचा पराभव करून प्रकाश आवाडे निवडून आले होते. आवडे कुटुंबियांच्या भाजप प्रवेशामुळे सुरेश हळवणकर यांच्या भूमिकेकडे लक्ष आहे. त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये भाजपची ताकद वाढणार आहे.

प्रकाश आवाडे भाजपमध्ये प्रवेश करणार

प्रकाश आवाडे आज भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. 2019 ला विधानसभा निवडणुकीआधी प्रकाश आवाडे यांनी काँग्रेसला रामराम केला. त्यांनी अपक्ष निवडणूक लढली. काँग्रेसशी कायम एकनिष्ठ असणाऱ्या प्रकाश आवाडे यांनी भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतला. मध्यंतरी ते शिंदे गटात प्रवेश करतील, अशीही चर्चा होती. पण आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ते भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत.

अमित शाह यांचा कोल्हापूर दौरा

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज कोल्हापूर दौऱ्यावर येणार आहेत. अमित शाह यांच्या उपस्थितीत पश्चिम महाराष्ट्रातील भाजप नेते आणि पदाधिकाऱ्यांची बैठक होणार आहे. या बैठकीत आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने अमित शाह मार्गदर्शन करणार आहेत. कोल्हापूरच्या महासैनिक दरबार हॉलमध्ये सायंकाळी चार वाजता बैठक पार पडणार आहे.

महासैनिक दरबार हॉल परिसरात बैठकीची जोरदार तयारी करण्यात आली आहे. पदाधिकाऱ्यांकडून अमित शहा यांच्या स्वागताचे फलक लागले आहेत. बैठकी आधी अमित शाह आज अंबाबाई देवीचं दर्शनही घेणार आहेत. अमित शाह यांच्या या कोल्हापूर दौऱ्यादरम्यान प्रकाश आवाडे आणि चिरंजीव राहुल आवाडे भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. आज त्यांचा पक्ष प्रवेश होणार आहे. यावेळी आवाडे यांचे समर्थकही भाजपमध्ये प्रवेश करतील.

कांद्याची आवक घटली; दरात मोठी वाढ झाल्याने शेतकऱ्यांना दिलासा
कांद्याची आवक घटली; दरात मोठी वाढ झाल्याने शेतकऱ्यांना दिलासा.
मुंबईची हवा झाली खराब! श्वास घेणेही कठीण, आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर
मुंबईची हवा झाली खराब! श्वास घेणेही कठीण, आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर.
प्रश्नचिन्ह निर्माण होईल असं...; वडेट्टीवारांचं मोठं विधान
प्रश्नचिन्ह निर्माण होईल असं...; वडेट्टीवारांचं मोठं विधान.
शिवसेना-संघाची विचारसरणी मिळतीजुळती! शिंदेंच्या विधानाची चर्चा
शिवसेना-संघाची विचारसरणी मिळतीजुळती! शिंदेंच्या विधानाची चर्चा.
आज 'या' मार्गावर असणार मेगाब्लॉक
आज 'या' मार्गावर असणार मेगाब्लॉक.
साताऱ्यातील ड्रग्स फॅक्टरी प्रकरणावरून राजकीय वर्तुळात खळबळ:
साताऱ्यातील ड्रग्स फॅक्टरी प्रकरणावरून राजकीय वर्तुळात खळबळ:.
लिओनल मेस्सीच्या दौऱ्यात गोंधळ अन् लाठीचार्ज
लिओनल मेस्सीच्या दौऱ्यात गोंधळ अन् लाठीचार्ज.
19 डिसेंबरला राजकारणात मोठी घडामोड! पृथ्वीराज चव्हाणांचा खळबळजनक दावा
19 डिसेंबरला राजकारणात मोठी घडामोड! पृथ्वीराज चव्हाणांचा खळबळजनक दावा.
मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई
मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई.
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल.