…तेव्हा मी भाजपमध्ये गेले असतो, केंद्रात कॅबिनेट मंत्री असतो; दीपक केसरकर यांचं मोठं वक्तव्य

Shivsena Leader Deepak Kesarkar on BJP :...तेव्हा मी भाजपमध्ये गेले असतो, केंद्रात कॅबिनेट मंत्री असलो असतो. माझ्यावर कोकणाची जबाबदारी असली असती; दीपक केसरकर काय म्हणाले? पाहा काय म्हणाले दीपक केसरकर...

...तेव्हा मी भाजपमध्ये गेले असतो, केंद्रात कॅबिनेट मंत्री असतो; दीपक केसरकर यांचं मोठं वक्तव्य
Deepak Kesarkar
Follow us
| Updated on: Sep 13, 2023 | 4:13 PM

कोल्हापूर | 13 सप्टेंबर 2023 : शिवसेनेचे नेते आणि राज्याचे शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी कोल्हापुरात बोलताना केलेलं एक वक्तव्य चर्चेत आलं आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारामुळे शिवसेनेत आलो. नाहीतर त्याचवेळी मी भाजपमध्ये गेले असतो. केंद्रात कॅबिनेट मंत्री झालो असतो. कोकणची जबाबदारी माझ्यावर आली असती, असं दीपक केसरकर म्हणालेत. कोल्हापुरात त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. तेव्हा त्यांनी केलेल्या या वक्तव्याची सध्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा होतेय. कोल्हापुरात युतीत धुसफूस असल्याचं बोललं जात आहे. त्यावरही दीपक केसरकरांनी प्रतिक्रिया दिली आहे.

वापरा आणि सोडून द्या हे बाळासाहेबांनी कधी केलं नाही. मोदी जगभरातील नेत्यांना महात्मा गांधींच्या समाधी स्थळी नेऊ शकतात. मग उद्धव ठाकरे यांनी इंडिया आघाडीतील नेत्यांना बाळासाहेबांच्या समाधीस्थळी का नेऊ शकले नाहीत, असं म्हणत केसरकरांनी उद्धव ठाकरेंवरही निशाणा साधला आहे.

कोल्हापुरात शिवसेना आणि राष्ट्रावादीत धुसफूस पाहायला मिळतेय. यावरही केसरकरांनी प्रतिक्रिया दिली आहे. प्रत्येक घरात थोडीशी धुसपुस असते.विशेषतः नवा घरोबा झाला की अशी धुसपुस असते. ही धुसपुस लवकरच संपेल. मी हसन मुश्रीफ यांच्याशी बोलणार आहे, असं दीपक केसरकर म्हणालेत.

पर्यटनाला चालना मिळावी म्हणून राधानगरी धरणात बोटिंगला परवानगी दिली जाणार आहे. गोव्यामध्ये इंटरनॅशनल एअरपोर्ट होत आहे. गोव्याला आलेलं पर्यटक कोल्हापूरपर्यंत यावेत यासाठी सरकार प्रयत्न करणार आहे. अंबाबाई विकास आराखड्याला गती देवून काम तातडीने पूर्ण करण्याचा प्रयत्न करणार आहोत, असंही दीपक केसरकरांनी म्हटलं आहे.

रडीचा डाव खेळण्यात ते माहीर आहेत. हाऊसच्या बाहेर जे घडत अशा तरतुदी लागू होत नाही हे माहीत असताना त्यांनी 14 आमदारांना अपात्र करण्याचा त्यांनी प्रयत्न केला. सत्याचा नेहमी विजय होतो. प्रत्येक मोठ्या माणसाने आपला इगो बाजूला ठेवला पाहिजे. म्हाला भाजपने फोडलेलं नाही. कशाही बळकट होणारा हा निर्णय होईल. अध्यक्षाच्या पातळीवर हा विषय संपणार नाही, हा विषय कोर्टात जाईल, असं म्हणत केसरकरांनी आमदार अपात्रतेच्या मुद्द्यावर प्रतिक्रिया दिली.

मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचा पत्रकार परिषदेआधीचा एक व्हीडिओ व्हायरल होत आहे. या व्हीडिओवरून सरकारला ट्रोल केलं जात आहे. त्यावर बोलताना बोलून मोकळं व्हायचं म्हणजे. आपण निर्णय घ्यायचे. दुसरीकडे फडणवीस यांनी दिलेलं आरक्षण 14 महिने टिकलं. पण ठाकरे सरकार आरक्षणाची बाजू कोर्टात मांडू शकलेले नाहीत. त्यामुळे आरक्षण टिकले नाही. हा त्यांच्यामुळे झालेला पराभव आहे, असं दीपक केसरकर म्हणालेत.

Non Stop LIVE Update
शाह ठाकरेंच्या विरोधात तर मोदी बाजूने? मोदींच्या मनात ठाकरेंबद्दल काय?
शाह ठाकरेंच्या विरोधात तर मोदी बाजूने? मोदींच्या मनात ठाकरेंबद्दल काय?.
अनुज थापनच्या कुटुंबाची उच्च न्यायालयात धाव, सलमानवर कारवाईची मागणी
अनुज थापनच्या कुटुंबाची उच्च न्यायालयात धाव, सलमानवर कारवाईची मागणी.
पुढील 36 तास महत्वाचे, समुद्रात मोठ्या लाटा उसळणार, काय दिलाय इशारा?
पुढील 36 तास महत्वाचे, समुद्रात मोठ्या लाटा उसळणार, काय दिलाय इशारा?.
अविनाश जाधव यांची सराफाच्या मुलाला मारहाण, CCTV व्हिडीओ व्हायरल
अविनाश जाधव यांची सराफाच्या मुलाला मारहाण, CCTV व्हिडीओ व्हायरल.
अजित पवारांचं कौतुक करताना महादेव जानकर चुकले, व्हिडीओ तुफान व्हायरल
अजित पवारांचं कौतुक करताना महादेव जानकर चुकले, व्हिडीओ तुफान व्हायरल.
राणेंच्या आव्हानाला ठाकरेंचं प्रत्युत्तर, म्हणाले तू आडवा येच तुला...
राणेंच्या आव्हानाला ठाकरेंचं प्रत्युत्तर, म्हणाले तू आडवा येच तुला....
लोकांनी ठरवलं तर काही चमत्कार होऊ शकतो, पंकजा मुंडेंचं भाषण चर्चेत
लोकांनी ठरवलं तर काही चमत्कार होऊ शकतो, पंकजा मुंडेंचं भाषण चर्चेत.
'शरद पवार पक्ष एकत्र ठेवू शकले ना कुटुंब, मोदी म्हणाले ते अगदी बरोबर'
'शरद पवार पक्ष एकत्र ठेवू शकले ना कुटुंब, मोदी म्हणाले ते अगदी बरोबर'.
आमदार सरनाईकांच्या कुटुंबातील वाहनाचा भीषण अपघात, पाच जण जागीच ठार
आमदार सरनाईकांच्या कुटुंबातील वाहनाचा भीषण अपघात, पाच जण जागीच ठार.
बहिणीने भावाला फोन केला असता...अंधारेंच्या अपघातावर कुणाची प्रतिक्रिया
बहिणीने भावाला फोन केला असता...अंधारेंच्या अपघातावर कुणाची प्रतिक्रिया.