पाच राज्यांच्या निवडणुकांसोबतच कोल्हापुरात bypoll, दिवंगत काँग्रेस आमदाराच्या पत्नीला तिकीट?

10 फेब्रुवारीपासून उत्तर प्रदेश, गोवा, पंजाब, मणिपूर आणि उत्तराखंड या पाच राज्यांच्या निवडणुकांची रणधुमाळी (5 State Election) सुरु होणार आहे. यासोबतच कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणूक घेतली जाण्याचे संकेत आहेत.

पाच राज्यांच्या निवडणुकांसोबतच कोल्हापुरात bypoll, दिवंगत काँग्रेस आमदाराच्या पत्नीला तिकीट?
Chandrakant Jadhav
Follow us
| Updated on: Jan 11, 2022 | 1:06 PM

कोल्हापूर : कोल्हापूरमधील काँग्रेस आमदाराच्या निधनानंतर रिक्त झालेल्या विधानसभेच्या जागेवर लवकरच पोटनिवडणूक (Kolhapur North Vidhansabha Bypoll) होण्याची शक्यता आहे. पाच राज्यातील निवडणुकांच्या सोबतच कोल्हापूर उत्तर पोटनिवडणूकही घेतली जाण्याची चिन्हं आहेत. दिवंगत आमदार चंद्रकांत जाधव (Chandrakant Jadhav) यांच्या पत्नी जयश्री जाधव यांना काँग्रेसकडून संधी देण्यासाठी प्रयत्न सुरु असल्याची माहिती आहे. विशेष म्हणजे जयश्री जाधव या भाजपच्या नगरसेविका होत्या, त्यामुळे भाजप ही निवडणूक बिनविरोध करणार की उमेदवार रिंगणात उतरवणार, याकडे लक्ष लागलं आहे.

निवडणूक आयोगाकडून चाचपणी

10 फेब्रुवारीपासून उत्तर प्रदेश, गोवा, पंजाब, मणिपूर आणि उत्तराखंड या पाच राज्यांच्या निवडणुकांची रणधुमाळी (5 State Election) सुरु होणार आहे. यासोबतच कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणूक घेतली जाण्याचे संकेत आहेत. निवडणूक आयोगाकडून चाचपणी सुरु असून जिल्हा निवडणूक शाखेकडे विचारणा करण्यात आली आहे. येत्या दोन दिवसात पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होणार असल्याची माहिती आहे.

कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघाचे आमदार चंद्रकांत जाधव यांचं 2 डिसेंबर 2021 रोजी निधन झालं. हैदराबादमध्ये उपचार सुरु असताना हृदयविकाराच्या धक्क्याने चंद्रकांत जाधव यांची प्राणज्योत मालवली होती. वयाच्या अवघ्या 57 व्या वर्षी त्यांनी जगाचा निरोप घेतला.

कोण होते चंद्रकांत जाधव?

चंद्रकांत जाधव हे 2019 मध्ये काँग्रेसच्या तिकिटावर कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघातून निवडून आले होते. पहिल्याच निवडणुकीत त्यांनी शिवसेनेचे दोन वेळ आमदार राजेश क्षीरसागर यांचा पराभव करत विजय मिळवला होता.

नगरसेविका पत्नीला तिकीट मिळणार?

चंद्रकांत जाधव यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागेसाठी त्यांच्या पत्नी जयश्री जाधव यांना संधी देण्याची चर्चा आहे. त्या कोल्हापूर महानगर पालिकेत भाजपच्या नगरसेविका म्हणून कार्यरत होत्या. पती काँग्रेसचे आमदार झाल्यानंतरही त्या भाजपमध्येच राहिल्या.

हसन मुश्रीफ यांची मागणी

“पोटनिवडणुकीत कोणाला तिकीट द्यायचे आणि कोणाला नाही हा कॉंग्रेसचा अंतर्गत प्रश्न आहे. परंतु जाधव यांच्या अकाली निधनामुळे त्यांच्या कुटुंबीयांना मोठा धक्का बसला आहे. त्यातून त्यांना खर्‍या अर्थाने सावरायचे झाल्यास, त्यांच्या स्वप्नातील कोल्हापूरचा विकास करायचा झाल्यास त्यांच्या पत्नी जयश्री जाधव यांना तिकीट द्यावे. भाजपने अलीकडेच विधानपरिषदेतील काही जागा बिनविरोध केल्या आहेत. मनाचा मोठेपणाही भाजपने आताही दाखवावा” असं आवाहन राष्ट्रवादीचे नेते आणि ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी अलिकडेच केलं होतं.

आमदार-खासदाराच्या निधनानंतर होणाऱ्या पोटनिवडणुकीत त्यांच्या पत्नी, मुलं अथवा अन्य जवळच्या नातेवाईकांना तिकीट देण्याची परंपरा आहे. महाराष्ट्रात बहुतांश वेळा अशा निवडणुका बिनविरोध करण्यात आल्या आहेत.

चंद्रकांत जाधव यांचा अल्प परिचय

यशस्वी उद्योजक म्हणून चंद्रकांत जाधव यांची महाराष्ट्रभर ओळख

2019 मध्ये पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात उतरले, काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढवली

कोल्हापूर उत्तर मतदारसंघातून सलग दोन वेळा निवडून आलेले राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांचा चंद्रकांत जाधव यांच्याकडून पराभव

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्याशीही जाधव यांचे होते घनिष्ठ संबंध

चंद्रकांत जाधव यांच्या पत्नी कोल्हापूर महानगर पालिकेत भाजपच्या नगरसेविका म्हणून होत्या कार्यरत

शांत मितभाषी आणि प्रामाणिक लोकप्रतिनिधी अशी ओळख त्यांनी निर्माण केली

संबंधित बातम्या :

Chandrakant Jadhav | कोल्हापूरचे काँग्रेस आमदार चंद्रकांत जाधव यांचे निधन, हार्ट अटॅकनंतर अखेरचा श्वास

Non Stop LIVE Update
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.
शशिकांत शिंदेंचे घोटाळे दाबणार का?सवाल करत उदयनराजेंचा पवारांवर निशाणा
शशिकांत शिंदेंचे घोटाळे दाबणार का?सवाल करत उदयनराजेंचा पवारांवर निशाणा.
महायुतीत अद्याप 7 जागांचा पेच? पारंपारिक जागा भाजपला विरोधकांचा निशाणा
महायुतीत अद्याप 7 जागांचा पेच? पारंपारिक जागा भाजपला विरोधकांचा निशाणा.
मनामनातील सूनबाई, सुनेला पाठवा दिल्लीत अन् लेकीला...कुणी घेतला समाचार?
मनामनातील सूनबाई, सुनेला पाठवा दिल्लीत अन् लेकीला...कुणी घेतला समाचार?.
नवनीत राणांवर बोलताना संजय राऊत घसरले, बाई खुणावेल, डोळा मारेल पण...
नवनीत राणांवर बोलताना संजय राऊत घसरले, बाई खुणावेल, डोळा मारेल पण....
ईव्हीएम मशीनबद्दल कोर्टानं काय सांगितलं? याचिकाकर्त्यांना झापलं आणि...
ईव्हीएम मशीनबद्दल कोर्टानं काय सांगितलं? याचिकाकर्त्यांना झापलं आणि....
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?.
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण.
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं.