Chandrakant Jadhav | कोल्हापूरचे काँग्रेस आमदार चंद्रकांत जाधव यांचे निधन, हार्ट अटॅकनंतर अखेरचा श्वास

Chandrakant Jadhav Kolhapur MLA Death News - चंद्रकांत जाधव हे 2019 मध्ये काँग्रेसच्या तिकिटावर कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघातून निवडून आले होते. पहिल्याच निवडणुकीत त्यांनी शिवसेनेचे दोन वेळ आमदार राजेश क्षीरसागर यांचा पराभव करत विजय मिळवला होता.

Chandrakant Jadhav | कोल्हापूरचे काँग्रेस आमदार चंद्रकांत जाधव यांचे निधन, हार्ट अटॅकनंतर अखेरचा श्वास
Chandrakant Jadhav

कोल्हापूर : कोल्हापूरमधील काँग्रेस आमदाराचं निधन झाल्याची दुःखद बातमी आहे. कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघाचे आमदार चंद्रकांत जाधव (Chandrakant Jadhav) यांचं निधन झालं. हैदराबाद येथे हृदयविकाराच्या धक्क्याने चंद्रकांत जाधव यांची प्राणज्योत मालवली. वयाच्या अवघ्या 57 व्या वर्षी त्यांनी जगाचा निरोप घेतला.

कोण होते चंद्रकांत जाधव?

चंद्रकांत जाधव हे 2019 मध्ये काँग्रेसच्या तिकिटावर कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघातून निवडून आले होते. पहिल्याच निवडणुकीत त्यांनी शिवसेनेचे दोन वेळ आमदार राजेश क्षीरसागर यांचा पराभव करत विजय मिळवला होता.

राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात ठसा

कोल्हापूर शहरातील अनेक तालीम मंडळांशी फुटबॉलच्या माध्यमातून त्यांचा थेट संपर्क होता. राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील भरीव कामान त्यांनी दांडगा जनसंपर्क निर्माण केला होता.

चंद्रकांत जाधव यांचा अल्प परिचय

यशस्वी उद्योजक म्हणून चंद्रकांत जाधव यांची महाराष्ट्रभर ओळख

2019 मध्ये पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात उतरले, काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढवली

कोल्हापूर उत्तर मतदारसंघातून सलग दोन वेळा निवडून आलेले राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांचा चंद्रकांत जाधव यांच्याकडून पराभव

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्याशीही जाधव यांचे होते घनिष्ठ संबंध

चंद्रकांत जाधव यांच्या पत्नी कोल्हापूर महानगर पालिकेत भाजपच्या नगरसेविका म्हणून होत्या कार्यरत

शांत मितभाषी आणि प्रामाणिक लोकप्रतिनिधी अशी ओळख त्यांनी निर्माण केली

उपचारादरम्यान हार्ट अटॅक

गेल्या काही दिवसांपासून हैदराबादमध्ये चंद्रकांत जाधव यांच्यावर उपचार सुरु होते. उपचारादरम्यान हार्ट अटॅकमुळे त्यांचे निधन झाले. दुपारी एक वाजताच्या सुमारास त्यांचे पार्थिव कोल्हापुरात आणले जाणार असल्याची माहिती जाधव यांच्या निकटवर्तीयांनी दिली. चंद्रकांत जाधव यांच्या अचानक एक्झिटने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.


Published On - 8:14 am, Thu, 2 December 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI