kolhapur Rain: पंचगंगा नदीची धोक्याच्या पातळीकडे वाटचाल; जिल्हा प्रशासनाकडून चिखली ग्रामस्थांना स्थलांतराच्या सूचना

| Updated on: Aug 09, 2022 | 11:17 PM

पंचगंगा नदीकाठच्या गावांबरोबर इतर नदीकाठी असणाऱ्या गावांनाही सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. काही नदीकाठाजवळील गावांनाही सूचना देण्यात आल्या आहेत. राधानगरी धरणात 225.58 दलघमीपाणीसाठा असून राधानगरी धरणातून दुपारपर्यंत 1600 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू होता

kolhapur Rain: पंचगंगा नदीची धोक्याच्या पातळीकडे वाटचाल; जिल्हा प्रशासनाकडून चिखली ग्रामस्थांना स्थलांतराच्या सूचना
Follow us on

कोल्हापूरः गेल्या काही तासांपासून कोल्हापूरसह जिल्ह्यात प्रचंड पाऊस (Kolhapurn Heavy Rain) कोसळत आहे, कोल्हापुरात जोरदार पाऊस सुरू असल्याने पंचगंगेच्या (Panchganga River) पाणीपातळीत प्रचंड वेगाने वाढ होत आहे. कोल्हापूरात आणि परिसरात जोरदार पाऊस होत असल्याने आज दुपारीच राजाराम बंधाऱ्याची पाणी पातळीत वाढ होऊन 37 फूट 7 इंच इतकी वाढ झाली होती. पंचगंगेची इशारा पातळी 39 फूट व धोका पातळी 43 फूट इतकी असून पंचगंगा नदीवरील 71 बंधारे पाण्याखाली गेल्याचे सांगण्यात येत आहे. आता सायंकाळ पंचगंगा नंदीने इशारा पातळी गाठली असून नदीची पाणीपातळी आता 39 फुटांवर पोचली आहे. त्यामुळे नदीपरिसरातील गावांना इशारा देण्यात आला असून चिखली ग्रामस्थांना जिल्हा प्रशासनाकडून स्थलांतराचा सूचना (Notification of Migration) देण्यात आल्या आहेत.

 

राधानगरी धरणही जवळपास पूर्ण क्षमतेने भरले असून पहाटेपर्यंत राधानगरी धरणाचे स्वयंचलित दरवाजे उघडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

चिखली गावाला सतर्कतेचा इशारा

पंचगंगा नदीकाठच्या गावांबरोबर इतर नदीकाठी असणाऱ्या गावांनाही सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. काही नदीकाठाजवळील गावांनाही सूचना देण्यात आल्या आहेत. राधानगरी धरणात 225.58 दलघमीपाणीसाठा असून राधानगरी धरणातून दुपारपर्यंत 1600 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू होता, तर पावसाची संततधार अशीच चालू राहिल्यास आज रात्रीपर्यंत धरण पूर्ण क्षमतेने भरण्याची शक्यताही वर्तवण्यात आली आहे.

धरणातील पाणीसाठा

कोल्हापूर जिल्ह्यातील धरणांमधून पुढीलप्रमाणे पाणीसाठा असल्याचे सांगण्यात आले आहे. राधानगरी 225.58 दलघमी, तुळशी 84.96 दलघमी, वारणा 851.88 दलघमी, दूधगंगा 584.51 दलघमी, कासारी 66.46 दलघमी, कडवी 70.30 दलघमी, कुंभी 66.62 दलघमी, पाटगाव 92.46 दलघमी, चिकोत्रा 38.71 दलघमी, घटप्रभा 44.17 दलघमी, आंबेआहोळ 30.98 जंगमहट्टी, जांबरे मध्यम प्रकल्प व कोदे लघु प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरले असून चित्री मध्यम प्रकल्प आज पहाटे पाच वाजता पूर्ण क्षमतेने भरला.

राधानगरी धरण भरणार

गेल्या काही तासांपासून कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक तालुक्यांतून जोरदार पाऊस सुरु आहे. त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक बंधारे आता पुन्हा एकदा पाण्याखाली गेेले आहेत. आज रात्री राधानगर धरण भरण्याची शक्यता वर्तवण्यात येत असून धरणाखालील गावांनाही सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. त्याबाबत जिल्हा प्रशासनाकडून कोल्हापूर जवळील चिखली गावातील नागरिकांन स्थलांतर होण्यास सांगण्यात आले आहे.