India vs South Africa, 5th T20I Score And Update : टीम इंडियाने मालिका 3-1 ने जिंकली, शेवटच्या सामन्यात 30 धावांनी विजय
India vs South Africa, 5th T20I Cricket Score Highlights and Updates : हार्दिक पंड्या, तिलक वर्मा आणि वरुण चक्रवर्ती या तिघांनी केलेल्या अप्रतिम कामगिरीच्या जोरावर भारताने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पाचव्या आणि अंतिम सामन्यात 30 धावांनी विजय मिळवला. भारताने यासह ही मालिका 3-1 अशा फरकाने जिंकली.

टीम इंडिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील पाचवा आणि अंतिम टी 20i सामन्याचं आयोजन हे अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये करण्यात आलं होतं. हा पाचवा सामना मालिकेच्या दृष्टीने दोन्ही संघांसाठी महत्त्वाचा होता. टीम इंडिया या मालिकेत 2-1 ने आघाडीवर होती. मात्र या मालिकेचा काय निकाल लागणार? याची उत्सूकता क्रिकेट चाहत्यांना होती. टीम इंडियाला हा सामना जिंकून मालिका नावावर करण्याची संधी होती. तर दक्षिण आफ्रिकेसमोर भारताला पराभूत करुन मालिका 2-2 ने बरोबरीत सोडवण्याचं आव्हान होतं. त्यामुळे पाचवा सामना फार निर्णायक असा होता. मात्र टीम इंडियाने या सामन्यात दक्षिण आफ्रिकेवर 30 धावांनी मात करत सामन्यासह मालिका आपल्या नावावर केली. टीम इंडियाने तिलक वर्मा आणि हार्दिक पंड्या या दोघांनी अर्धशतकी खेळी करुन भारताला 231 धावांपर्यंत पोहचवलं. तर प्रत्युत्तरात दक्षिण आफ्रिकेला वरुण चक्रवर्ती याच्या फिरकीसमोर 20 ओव्हरमध्ये 8 विकेट्स गमावून 201 धावांपर्यंतच पोहचता आलं. भारताने यासह ही मालिका 3-1 अशा फरकाने जिंकली.
LIVE Cricket Score & Updates
-
IND vs SA, 5th T20I LIVE Updates : वरुण चक्रवर्ती मॅन ऑफ द सीरिज
टीम इंडियाने पाचव्या सामन्यनासह मालिकाही आपल्या नावावर केली. भारताने ही मालिका 3-1 अशा फरकाने जिंकली. वरुण चक्रवर्ती याने अंतिम सामन्यात 4 तर मालिकेत एकूण 10 विकेट्स घेतल्या. वरुणला त्याच्या या कामगिरीसाठी मॅन ऑफ द सीरिज पुरस्काराने गौरवण्यात आलं.
वरुण चक्रवर्ती मालिकावीर
🔟 Wickets 7⃣.4⃣6⃣ Economy 4⃣/5⃣3⃣ Best bowling figures
For his match-defining spells, Varun Chakaravarthy is named the Player of the Series 👏👌
Scorecard ▶️ https://t.co/kw4LKLNSl3#TeamIndia | #INDvSA | @chakaravarthy29 | @IDFCFIRSTBank pic.twitter.com/fL5Wzx5xfZ
— BCCI (@BCCI) December 19, 2025
-
IND vs SA, 5th T20I LIVE Score : टीम इंडियाने मालिका 3-1 ने जिंकली, शेवटच्या सामन्यात 30 धावांनी विजय
भारताने पाच सामन्यांची टी20 मालिका 3-1 ने जिंकली. या मालिकेतील चौथा सामना होऊ शकला नाही. भारताने या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 231 धावा केल्या आणि विजयासाठी 232 धावांचं आव्हान दिलं होतं. पण दक्षिण अफ्रिकेचा संघ 201 धावा करू शकला. भारताने हा सामना 30 धावांनी जिंकला आणि मालिका खिशात घातली.
-
-
IND vs SA, 5th T20I LIVE Score : दक्षिण अफ्रिकेला आठवा धक्का, यानसेन बाद
दक्षिण अफ्रिकेला मार्को यानसेनच्या रुपाने आठवा धक्का बसला आहे. मार्को यानसेनने या आधीच्या षटकात षटकार मारत टेन्शन वाढवलं होतं. पण जसप्रीतच्या गोलंदाजीवर बाद होत तंबूत परतला.
-
IND vs SA, 5th T20I LIVE Score : जॉर्ज लिंडे आऊट, दक्षिण आफ्रिकेला सातवा झटका, टीम इंडिया विजयाच्या दिशेने
वरुण चक्रवर्ती याने जॉर्ज लिंडे याला आऊट केलं आहे. वरुणनेन लिंडेला 16 रन्सवर बोल्ड केलं. भारताने अशाप्रकारे दक्षिण आफ्रिकेला सातवा झटका दिला. टीम इंडियाने यासह विजयाच्या दिशेने आणखी एक पाऊल पुढे टाकलं आहे.
-
IND vs SA, 5th T20I LIVE Score : अर्शदीपकडून मोठी शिकार, डेव्हीड मिलर आऊट, दक्षिण आफ्रिकेला सहावा झटका
अर्शदीप सिंह याने मोठी शिकार केली आहे. अर्शदीप सिंह याने डेव्हीड मिलर याला संजू सॅमसन याच्या हाती कॅच आऊट केलं. भारताने यासह दक्षिण आफ्रिकेला सहावा झटका दिला. तर अर्शदीपची ही पहिली विकेट ठरली.
-
-
IND vs SA, 5th T20I LIVE Score : वरुणची कमाल, दक्षिण आफ्रिकेला सलग 2 झटके, टीम इंडिया मजबूत स्थितीत
वरुण चक्रवर्ती याने कमाल केली आहे. वरुण चक्रवर्ती याने 13 व्या ओव्हरमध्ये सलग 2 बॉलमध्ये दक्षिण आफ्रिकेला 2 झटके दिले. वरुणने दक्षिण आफ्रिकेचा कॅप्टन एडन मार्रक्रम याला एलबीडब्ल्यू आऊट केलं आहे. त्यानंतर वरुणने डोनेवेन फरेरा याला बोल्ड केलं.
-
IND vs SA, 5th T20I LIVE Score : दक्षिण आफ्रिकेला तिसरा झटका, डेवाल्ड ब्रेव्हीस आऊट
हार्दिक पंड्या याने विस्फोटक फलंदाज डेवाल्ड ब्रेव्हीस याला स्वस्तात आऊट केलं आहे. हार्दिकने डेवाल्डला वॉशिंग्टन सुंदर याच्या हाती कॅच आऊट करत या सामन्यातील पहिली विकेट मिळवली. डेवाल्डने 17 बॉलमध्ये 31 रन्स केल्या.
-
IND vs SA, 5th T20I LIVE Score : जसप्रीत बुमराहचा आपल्याच बॉलिंगवर क्विंटन डी कॉकचा कॅच, दक्षिण आफ्रिकेला दुसरा झटका
जसप्रीत बुमराह याने टीम इंडियाच्या दुसऱ्या विकेटची प्रतिक्षा संपवली आहे. जसप्रीतने सामन्यातील 11 व्या तर त्याच्या कोट्यातील दुसऱ्या ओव्हरमध्ये सेट क्विंटन डी कॉक याला आऊट केलं आहे. बुमराहने क्विंटन डी कॉक याला आपल्याच बॉलिंगवर कॅच आऊट केलं आहे. क्विंटनने 65 धावा केल्या.
-
IND vs SA, 5th T20I LIVE Score : क्विंटन डी कॉक याचं अर्धशतक, टीम इंडिया दुसऱ्या विकेटच्या शोधात
क्विंटन डी कॉक याने टीम इंडिया विरुद्ध अर्धशतक झळकावलं आहे. डी कॉक याने 20i कारकीर्दीतील 19 वं अर्धशतक हे अवघ्या 30 बॉलमध्ये पूर्ण केलं आहे. यासह दक्षिण आफ्रिकेच्या 8 ओव्हरमध्ये 76 धावा झाल्या आहेत. तर दुसऱ्या बाजूला टीम इंडिया विकेटच्या शोधात आहे.
-
IND vs SA, 5th T20I LIVE Score : हुश्श, अखेर जोडी फुटली, दक्षिण आफ्रिकेला पहिला झटका, रीझा हेंड्रीक्स आऊट
वरुण चक्रवर्ती याने पहिली विकेट घेत दक्षिण आफ्रिकेची सेट जोडी फोडली आहे. वरुण चक्रवर्ती आणि रीझा हेंड्रीक्स या सलामी जोडीने 6.2 ओव्हरमध्ये 69 रन्सची पार्टनरशीप केली. मात्र वरुणने तिसऱ्या बॉलवर रीझाला आऊट केलं. शिवम दुबे याने रिझाचा अप्रतिम कॅच घेतला. रिझाने 13 धावा केल्या.
-
IND vs SA, 5th T20I LIVE Score : दक्षिण आफ्रिकेच्या सलामी जोडीची वादळी सुरुवात, 21 बॉलमध्ये अर्धशतकी भागीदारी
दक्षिण आफ्रिकेने 232 धावांचा पाठलाग करताना चाबूक सुरुवात केली आहे. रिझा हेंड्रीक्स आणि क्विंटन डी कॉक या सलामी जोडीने अवघ्या 21 बॉलमध्ये अर्थात 3.3 ओव्हरमध्ये नाबाद अर्धशतकी भागीदारी केली आहे.
-
IND vs SA, 5th T20I LIVE Score : दक्षिण आफ्रिकेची सलामी जोडी मैदानात, विजयासाठी 232 धावांचं आव्हान
दक्षिण आफ्रिेकेच्या बॅटिंगला सुरुवात झाली आहे. टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेसमोर विजयासाठी 232 धावांचं आव्हान ठेवलं आहे. या धावांचा पाठलाग करण्यासाठी दक्षिण आफ्रिकेकडून क्विंटन डी कॉक आणि रीझा हेंड्रिक्स ही सलामी जोडी मैदानात आली आहे.
-
IND vs SA, 5th T20I LIVE Score : तिलक-हार्दिकची फटकेबाजी, दक्षिण आफ्रिकेसमोर 232 धावांचं आव्हान
तिलक वर्मा आणि हार्दिक पंड्या या जोडीने केलेल्या चाबूक अर्धशतकी खेळीच्या जोरावर भारताने दक्षिण आफ्रिकेसमोर 232 धावांचं आव्हान ठेवलं आहे. टीम इंडियाने 20 ओव्हरमध्ये 5 विकेट्स गमावून 231 धावा केल्या. भारतासाठी तिलकने सर्वाधिक 73 तर हार्दिकने 63 धावा केल्या. तर इतर फलंदाजांनीही चांगलं योगदान दिलं. त्यामुळे टीम इंडियाला 231 धावांपर्यंत पोहचता आलं. आता भारतीय गोलंदाज या धावांचा यशस्वी बचाव करतात का? याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असणार आहे.
-
IND vs SA, 5th T20I LIVE Score : तिलक-हार्दिकची चाबूक बॅटिंग, टीम इंजिया 200 पार
तिलक वर्मा आणि हार्दिक पंड्या या जोडीने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध जोरदार फटकेबाजी करुन टीम इंडियाला 200 पार पोहचवलं आहे. तिलक वर्मा याच्यानंतर हार्दिक पंड्या याने अर्धशतक झळकावलं आहे. भारताने यासह 200 पार मजल मारली आहे.
-
IND vs SA, 5th T20I LIVE Score : तिलक वर्माची फटकेबाजी, 30 बॉलमध्ये अर्धशतक पूर्ण
टीम इंडियाचा युवा फलंदाज तिलक वर्मा याने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध जोरदार फटकेबाजी करत अर्धशतक पूर्ण केलं आहे. तिलकने मैदानात चौफेर फटकेबाजी करत अवघ्या 30 बॉलमध्ये अर्धशतक पूर्ण केलं आहे.
-
IND vs SA, 5th T20I LIVE Score : हार्दिक पंड्याने गिअर बदलला, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध जोरदार फटकेबाजी
हार्दिक पंड्या याने जॉर्ज लिंडे याच्या बॉलिगवर दे दणादण फटकेबाजी केली आहे. टीम इंडियाने 14 व्या ओव्हरमध्ये 27 धावा मिळवल्या आहेत. टीम इंडियाने या ओव्हरमध्ये 3 सिक्स, 2 फोर आणि 1 सिंगलसह या 27 धावा मिळवल्या.
-
IND vs SA, 5th T20I LIVE Score : टीम इंडियाला तिसरा झटका, कॅप्टन सूर्यकुमार यादव आऊट
टीम इंडियाचा कॅप्टन सूर्यकुमार यादव याची निराशाजनक कामगिरी कायम आहे. सूर्या दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पाचव्या आणि अंतिम सामन्यातही अपयशी ठरला. सूर्या 5 धावा करुन आऊट झाला.
-
IND vs SA, 5th T20I LIVE Score : संजूच्या शानदार खेळीचा शेवट, टीम इंडियाला दुसरा झटका
जॉर्ज लिंडे याने टीम इंडियाचा सेट बॅट्समन संजू सॅमसन याला आऊट केलं आहे. टीम इंडियाने यासह दुसरी विकेट गमावली आहे. क्विंटन डी कॉक याने जॉर्ज लिंडे याच्या बॉलिंगवर संजूला स्टंपिंग केलं. संजूने 22 बॉलमध्ये 37 रन्स केल्या.
-
IND vs SA, 5th T20I LIVE Score : टीम इंडियाला पहिला झटका, अभिषेक शर्मा आऊट
कॉर्बिन बॉश याने टीम इंडियाची सेट जोडी फोडली आहे. बॉशने अभिषेक शर्मा याला विकेटकीपर क्विंटन डी कॉक याच्या हाती कॅच आऊट केलं. संजू आणि अभिषेक या जोडीने 63 धावांची सलामी भागीदारी केली. तर अभिषेकने 21 बॉलमध्ये 34 रन्स केल्या आणि आऊट झाला.
-
IND vs SA, 5th T20I LIVE Score : संजू-अभिषेकची फटकेबाजी, टीम इंडियाची कडक सुरुवात
टीम इंडियाच्या अभिषेक शर्मा आणि संजू सॅमसन या सलामी जोडीने अप्रतिम सुरुवात केली आहे. टीम इंडियाने पहिल्या 4 ओव्हरमध्ये बिनबाद 41 धावा केल्या आहेत. संजू 22 तर अभिषेक 19 धावांवर नाबाद खेळत आहेत.
-
IND vs SA, 5th T20I LIVE Updates : सामन्याला सुरुवात, टीम इंडियाची बॅटिंग, संजू-अभिषेक मैदानात
टीम इंडिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका पाचव्या आणि अंतिम टी 20i सामन्याला सुरुवात झाली आहे. दक्षिण आफ्रिकेने भारताला टॉस जिंकून बॅटिंगसाठी भाग पाडलं आहे. टीम इंडियाकडून संजू सॅमसन आणि अभिषेक शर्मा ही सलामी जोडी मैदानात आली आहे.
-
IND vs SA, 5th T20I LIVE Updates : दक्षिण आफ्रिका प्लेइंग इलेव्हन
क्विंटन डी कॉक (विकेटकीपर), रीझा हेंड्रिक्स, एडन मार्रक्रम (कॅप्टन), डेवाल्ड ब्रेव्हिस, डेव्हिड मिलर, डोनोव्हन फरेरा, जॉर्ज लिंडे, मार्को यान्सेन, कॉर्बिन बॉश, लुंगी एनगिडी आणि ओटनील बार्टमन.
-
IND vs SA, 5th T20I LIVE Updates : टीम इंडिया प्लेइंग ईलेव्हन
अभिषेक शर्मा, संजू सॅमसन, तिलक वर्मा, सूर्यकुमार यादव (कर्णधार), हार्दिक पंड्या, शिवम दुबे, जितेश शर्मा (विकेटकीपर), वॉशिंग्टन सुंदर, वरुण चक्रवर्ती, जसप्रीत बुमराह आणि अर्शदीप सिंग.
-
IND vs SA, 5th T20I LIVE Updates : दक्षिण आफ्रिकेने टॉस जिंकला, टीम इंडिया विरुद्ध निर्णय काय?
दक्षिण आफ्रिकेने पाचव्या आणि अंतिम टी 2oi सामन्यात टॉस जिंकला आहे. कॅप्टन एडन मार्रक्रम याने फिल्डिंगचा निर्णय घेतला आहे. तसेच भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादव याने आम्हाला बॅटिंगच हवी होती असं म्हटलं. त्यामुळे आता टीम इंडिया दक्षिण आफ्रिकेसमोर किती धावांचं आव्हान ठेवणार? याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असणार आहे.
-
IND vs SA, 5th T20I LIVE Updates : टीम इंडिया-दक्षिण आफ्रिका पाचव्या टी 20I सामन्याला किती वाजता सुरुवात होणार?
टीम इंडिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील पाचव्या आणि अंतिम टी 20I सामन्याला संध्याकाळी 7 वाजता सुरुवात होणार आहे. तर 6 वाजून 30 मिनिटांनी टॉस होणार आहे.
-
IND vs SA, 5th T20I LIVE Updates : टी 20I सीरिजसाठी दक्षिण आफ्रिका टीम
एडन मार्रक्रम (कॅप्टन), ओटनील बार्टमॅन, कॉर्बिन बॉश, डेवाल्ड ब्रेव्हीस, क्विंटन डी कॉक, डोनोवन फरेरा, रीजा हेंड्रिक्स, मार्को यान्सेन, जॉर्ज लिंडे, लुथो सिपामला, डेविड मिलर, लुंगी एन्गिडी, एनरिक नॉर्खिया, ट्रिस्टन स्टब्स आणि केशव महाराज.
-
IND vs SA, 5th T20I LIVE Updates : टी 20I सीरिजसाठी टीम इंडिया
सूर्यकुमार यादव (कर्णधार), शुबमन गिल (उपकर्णधार), अभिषेक शर्मा, तिलक वर्मा, हार्दिक पंड्या, शिवम दुबे, अक्षर पटेल, जितेश शर्मा (विकेटकीपर), संजू सॅमसन (विकेटकीपर), जसप्रीत बुमराह, वरुण चक्रवर्ती, अर्शदीप सिंह, कुलदीप यादव, हर्षित राणा आणि वॉशिंगटन सुंदर.
-
IND vs SA, 5th T20I LIVE Updates : पाचवा आणि अंतिम टी 20I सामना, कोण जिंकणार?
अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये टीम इंडिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यात पाचवा आणि अंतिम टी 20I सामना होणार आहे. टीम इंडिया सूर्यकुमार यादव याच्या नेतृत्वात ही मालिका जिंकणार का? याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असणार आहे.
-
कल्याणमध्ये मद्यधुंद तरुण तरुणीचा मध्यरात्री भर रस्त्यात धिंगाणा
कल्याण पश्चिमेतील निक्कीनगर परिसरात मध्यरात्री मद्यधुंद तरुण तरुणींचा धिंगाणा पाहायला मिळाला. याचा व्हीडीआे सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे. काही नागरीकांनी पोलिसांना माहिती दिली. पोलिसांसमोरही देखील मद्यधुंद तरुणी शिव्या देत होती. भर रस्त्यात तरुण तरुणींच्या धिंगाण्यामुळे पाेलिस ठोस कारवाई का करीत नाही असा सवाल उपस्थित केला जात आहे.
-
भाजप शिवसेना जागा वाटप संदर्भात नेत्यांच्या उपस्थितीत आज होणार बैठक
भाजपचे मंत्री अतुल सावे आणि शिवसेना मंत्री संजय शिरसाठ यांच्यात युती संदर्भात बैठक. दुपारी 3 वाजता पार पडणार बैठक. अतुल सावे 50 टक्के वर ठाम तर शिवसेनेला काय मिळणार याकडे लक्ष. जागावाटपा संदर्भात अद्याप ठोस निर्णय झालेला नसून बैठकीत निर्णय होण्याची शक्यता
-
चाळीसगाव रेल्वे स्टेशन परिसरात मध्यरात्री गोळीबार; जुन्या वादातून एकावर दोन राऊंड फायर
चाळीसगाव शहरातील रेल्वे स्टेशनला लागून असलेल्या परिसरात मध्यरात्री जुन्या वादातून एकावर गोळीबार केल्याची घटना घडली. रोहिदास कोळी असे जखमी तरुणाचे नाव असून त्याच्यावर चाळीसगाव ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सलग दोन राउंड फायर झाल्याचा प्राथमिक अंदाज असून घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली.
-
छत्रपती संभाजी नगरच्या भाजप कार्यालयात आज इच्छुक उमेदवारांच्या मुलाखतीला तुफान गर्दी
छत्रपती संभाजी नगरच्या भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयात आज इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात येत असून तुफान गर्दी यावेळी पाहायला मिळत आहे स्वतः मंत्री अतुल सावे हे सर्वच इच्छुक उमेदवारांना विविध प्रश्नांच्या संदर्भात विचारणा करताना पाहायला मिळत आहे. वॉर्डातील समीकरण मतदानाची परिस्थिती आणि वार्डात काय गोष्टी केल्या पाहिजेत या सगळ्या गोष्टी अतुल सावे इच्छुक उमेदवारांना विचारत आहे.
Published On - Dec 19,2025 6:04 PM
