संरक्षणासाठी ठेवलेल्या रिव्हॉल्व्हरनेच केला घात, साफ करताना गोळी सुटली; सधन चांदी व्यापाऱ्याच्या मुलाचा मृत्यू

जिल्ह्यातील हुपरी येथे रिव्हॉल्व्हर सफ करताना अचानकपणे गोळी सुटून तरुणाचा मृत्यू झाला झाल्याची धक्कादायक घटना आज (24 एप्रिल) घडली. (kolhapur silver traders son dead)

संरक्षणासाठी ठेवलेल्या रिव्हॉल्व्हरनेच केला घात, साफ करताना गोळी सुटली; सधन चांदी व्यापाऱ्याच्या मुलाचा मृत्यू
SAGAR GAAT
Follow us
| Updated on: Apr 24, 2021 | 8:05 PM

कोल्हापूर : जिल्ह्यातील हुपरी येथे रिव्हॉल्व्हर साफ करताना अचानकपणे गोळी सुटून तरुणाचा मृत्यू झाला झाल्याची धक्कादायक घटना आज (24 एप्रिल) घडली. मृत तरुणाचे नाव सागर सुनिल गाट असून तो 27 वर्षांचा आहे. मिळालेल्या माहितीनुसार सागरचे वडील सुनिल गाट हे चांदी उद्योजक आहेत. अत्यंत सधन घरात वाढलेल्या सागर गाट यांचा असा अचानकपणे मृत्यू झाल्यामुळे हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. हुपरी येथील शांती नगरामध्ये ही घटना घडली. (Kolhapur silver traders son was cleaning revolver found dead)

सरंक्षणासाठी ठेवलेल्या रिव्हॉल्व्हरनेच घात केला

सागर गाट यांचे वडील सुनिल गाट हे चांदी उद्योजक आहेत. ते आपली दोन मुलं तसेच कुंटुंबासोबत हुपरी येथील शांती नगरात राहतात.  सुनिल गाट हे चांदीचे दागिने घेऊन नेहमीच परराज्यात जातात. त्यामुळे स्वसंरक्षणासाठी म्हणून त्यांनी एक रिव्हॉल्व्हर घेतली होती. याच रिव्हॉल्व्हरने घात केला. सुनिल गाट यांचा मुलगा म्हणजेच सागर गाट यांनी ही रिव्हॉल्व्हर साफ करण्यासाठी बाहेर काढली होती. यावेळी रिव्हॉल्वर साफ करताना अचानकपणे गोळी सुटली. तसेच ही गोळी थेट सागर यांना लागली. अगदी जवळून गोळी लागल्यामुळे यामध्ये सागर गाट हे गंभीर जखमी झाले.

रुग्णालयात दाखल, मात्र शेवटी मृत्यू

ही घटना घडल्यानंतर सागर गाट यांचे नातेवाईक तसेच इतरांनी त्यांना सोलापूरच्या रुग्णालयात तत्काळ दाखल केले. मात्र, गोळी अगदीच जवळून लागल्यामुळे या घटनेत सागर गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर उपचार करण्याचा डॉक्टरांनी प्रयत्न केला. मात्र, यश येऊ शकले नाही. त्यानंतर सागर गाट यांचा कोल्हापूरच्या रुग्णालयातच मृत्यू झाला.

मुलाच्या वाढदिवशीच मृत्यू

मृत सागर गाट यांचा मुलगा सिद्ध गाट याचा आज (24 एप्रिल) वाढदिवस होता. मात्र, या आनंदाच्या दिवशीच ही सुन्न करणारी घटना घडली आहे. एका सधन आणि संपन्न कुटुंबातील एका तरुणाच्या मृत्यूमुळे अनेकांकडून शोक व्यक्त करण्यात येतोय.

इतर बातम्या :

“इथं पाकिस्तानच्या मुशर्रफचं राज्य नाही, पाटीलकी संपली म्हणून मुश्रीफांना पुढे केलंय का ?”: जयश्री पाटील

हायवेच्या कडेला पीपीई किटमध्ये मृतदेह, महाराष्ट्रात नेमकं चाललंय काय?

प्रेमात यांच्या त्याग नाहीच? लिव्ह इन रिलेशनशिपनंतर वेगळं झाल्यावर तरुणाकडून किळसवाणं कृत्य

(Kolhapur silver traders son was cleaning revolver found dead)

Non Stop LIVE Update
ही धमकी समजा नाहीतर... , राज ठाकरेंच्या टीकेवरून मनसेचा राऊतांना इशारा
ही धमकी समजा नाहीतर... , राज ठाकरेंच्या टीकेवरून मनसेचा राऊतांना इशारा.
सांगलीत तिहेरी लढत, मविआतच बंड अन् ठाकरेंचं वाढलं टेन्शन
सांगलीत तिहेरी लढत, मविआतच बंड अन् ठाकरेंचं वाढलं टेन्शन.
अमरावतीत शरद पवारांचा माफीनामा, ... तेव्हा चूक झाली, यापुढं होणार नाही
अमरावतीत शरद पवारांचा माफीनामा, ... तेव्हा चूक झाली, यापुढं होणार नाही.
वंचित उमेदवाराची माघार, भाजपची डोकेदुखी तर काँग्रेसला मिळणार दिलासा
वंचित उमेदवाराची माघार, भाजपची डोकेदुखी तर काँग्रेसला मिळणार दिलासा.
शिंदेंच्या बंडाचा आणखी एक पत्ता उघडला, टपरीवरून शिंदेंचा ठाकरेंना फोन
शिंदेंच्या बंडाचा आणखी एक पत्ता उघडला, टपरीवरून शिंदेंचा ठाकरेंना फोन.
विशाल पाटलांची बंडखोरी कायम, माघार नाहीच; ‘या’ चिन्हावर लोकसभा लढणार
विशाल पाटलांची बंडखोरी कायम, माघार नाहीच; ‘या’ चिन्हावर लोकसभा लढणार.
माफी मागत शरद पवार म्हणाले, 'ती' चूक पुन्हा कधीच नाही; निशाणा कुणावर?
माफी मागत शरद पवार म्हणाले, 'ती' चूक पुन्हा कधीच नाही; निशाणा कुणावर?.
पत्रकार परिषदेत डुलकी,गोऱ्हेंनी जरा उठा...म्हणताच प्रवक्ते खजबडून जागे
पत्रकार परिषदेत डुलकी,गोऱ्हेंनी जरा उठा...म्हणताच प्रवक्ते खजबडून जागे.
आता उशीर झालाय, ठाकरेंना दिल्लीतून सांगितले; शिंदेंचा मोठा गौप्यस्फोट
आता उशीर झालाय, ठाकरेंना दिल्लीतून सांगितले; शिंदेंचा मोठा गौप्यस्फोट.
पैसे पाठवा अन्यथा,सलमानसारख प्रकरण करू, शरद पवार गटाच्या नेत्याला धमकी
पैसे पाठवा अन्यथा,सलमानसारख प्रकरण करू, शरद पवार गटाच्या नेत्याला धमकी.