फ्रान्समध्ये पुन्हा हादरले; दहशतवाद्यांची पोलिस ठाण्यात घुसखोरी, महिला अधिकाऱ्याचा गळा चिरला

दहशतवादविरोधी पथकाने घटनेचा कसून तपास सुरू केला असून काही वेळातच एका दहशतवाद्याचा खात्मा करण्यात आला. (Terrorist attack in france once again, One terrorist was killed)

फ्रान्समध्ये पुन्हा हादरले; दहशतवाद्यांची पोलिस ठाण्यात घुसखोरी, महिला अधिकाऱ्याचा गळा चिरला
प्रातिनिधिक फोटो
Follow us
| Updated on: Apr 24, 2021 | 1:27 AM

पॅरिस : फ्रान्स आज दुपारी पुन्हा एकदा दहशतवादी हल्ल्याने हादरून गेले. दहशतवाद्यांनी थेट पोलिस ठाण्यात घुसखोरी करून महिला पोलिस अधिकारीचा गळा चिरला. या हल्ल्यानंतर पोलिसांनी पॅरिसच्या सर्व सीमा बंद केल्या आहेत. दहशतवादविरोधी पथकाने घटनेचा कसून तपास सुरू केला असून काही वेळातच एका दहशतवाद्याचा खात्मा करण्यात आला. या दहशतवाद्याचे आणखी काही साथीदार हल्ल्यात सहभागी असल्याचा संशय आहे. पोलिसांनी फरार असलेल्या दहशतवाद्यांच्या शोधासाठी विशेष मोहिम हाती घेतली आहे. (Terrorist attack in france once again, One terrorist was killed)

मागील दोन वर्षात 5 वेळा हल्ले

पॅरिसमध्ये मागील दोन वर्षांत 5 वेळा अशाप्रकारचे हल्ले झाले आहेत. सर्व हल्ल्यात निष्पाप नागरिकांच्या माना छाटण्याचा अतिरेक दहशतवाद्यांनी केला आहे. हल्ल्यांची मालिका सुरूच असल्याने फ्रान्सच्या सुरक्षा यंत्रणांची चिंता वाढली आहे. संभाव्य हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणावर सतर्कता बाळगूनही दहशतवादी घुसखोरी करीत आहेत. दोन वर्षात पोलिस अधिकाऱ्याला निशाणा बनवण्याची ही दुसरी वेळ आहे. फ्रान्सचे पंतप्रधान जीन कास्टेक्स यांनी हा हल्ला दहशतवादी हल्लाच असल्याचे म्हटले आहे.

आणखी कठोर पावले उचलणार

फ्रान्समध्ये कट्टरपंथी इस्लामी तत्वांना लगाम घालण्यासाठी कठोर पावले उचलली गेली आहे. त्याच पार्श्वभूमीवर देशात हल्ल्यांचे सत्र सुरू आहे. दहशतवाद्यांनी कितीही हल्ले केले तरी आम्ही मागे हटणार नाही. अशा प्रकारच्या घटनांमुळे आम्ही हार पत्करणार नाही. दहशत माजवणार्यांना जरब बसवण्यासाठी आणखी कठोर पावले उचलणार आहे, अशा शब्दांत पंतप्रधान जीन कास्टेक्स यांनी कट्टरपंथीयांना इशारा दिला आहे.

दहशतवादविरोधी प्रॉसीक्यूटर जीन फ्रेंकोइस यांनीही हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध नोंदवला आहे. ही अत्यंत निर्घृण घटना असल्याचे फ्रेंकोइस यांनी म्हटले आहे. हल्ल्यात सहभागी झालेले तसेच हल्ल्याचा कट रचणार्या सूञधारांना चांगलाच धडा शिकवला जाईल, असा इशारा त्यांनी दिला आहे. हल्लेखोरांनी महिला पोलिस अधिकाऱ्याची हत्या करण्यापूर्वी सरकारविरोधात नारे दिले होते.

दहशतवाद्यांना राष्ट्राध्यक्षांचा इशारा

फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इम्यॅनुएल मॅक्रों यांनीही हल्ल्याचा निषेध करताना दहशतवाद्यांना कठोर शब्दांत इशारा दिला आहे. आम्ही दहशतवाद्यांपुढे गुडघे टेकणार नाही. हा दहशतवाद कडवा प्रतिकार करुनच समूळ नष्ट करू, असे राष्ट्राध्यक्षांनी कट्टरपंथीयांना बजावले आहे.

दहशतवाद्यांची ओळख पटलेली नाही

हल्ल्यात एक दहशतवाद मारला गेला आहे, मात्र हा दहशतवादी वा त्याच्या फरार साथीदारांची ओळख पटलेली नाही. ठार केलेल्या दहशतवाद्याची ओळख पटवण्याचे काम फ्रान्समधील सुरक्षा यंत्रणांकडून केले जात आहे. सध्या पाकिस्तानमध्ये फ्रान्सविरोधात प्रचंड असंतोष आहे. मागील दहा दिवसांत पाकिस्तानात फ्रान्सविरुद्ध हिंसाचार उसळला आहे. या हिंसाचारात जवळपास 12 लोकांचा मृत्यू तर 800 हून अधिक जण जखमी झाले आहेत. तहरीक-ए-लब्बैक ही पाकिस्तानातील कट्टरपंथीय संघटना फ्रान्सच्या राजदूतांना माघारी पाठवण्याची मागणी करीत आहे. (Terrorist attack in france once again, One terrorist was killed)

इतर बातम्या

महाराष्ट्रासाठी गुडन्यूज, ‘ऑक्सिजन एक्सप्रेस’ नागपुरात दाखल, उद्या नाशिकला पोहोचणार

सॉवरेन गोल्ड बाँड की गोल्ड ईटीएफ? कशात गुंतवणूक कराल?; कशात मिळेल अधिक रिटर्न?, जाणून घ्या पटापट!

Non Stop LIVE Update
अजित पवार नालायक माणूस, वयस्कर माणसाची....सख्खा भाऊ दादांच्या विरोधात
अजित पवार नालायक माणूस, वयस्कर माणसाची....सख्खा भाऊ दादांच्या विरोधात.
भाजपला पक्षचिन्ह कमळ नाहीतर हातोडा द्या, ठाकरेंचा फडणवीसांवर हल्लाबोल
भाजपला पक्षचिन्ह कमळ नाहीतर हातोडा द्या, ठाकरेंचा फडणवीसांवर हल्लाबोल.
चिंता करु नका...महायुतीच्या जागावाटपाबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठ वक्तव्य
चिंता करु नका...महायुतीच्या जागावाटपाबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठ वक्तव्य.
इंडिया आघाडीची सभा म्हणजे फॅमिली गॅदरिंग अन्... शिंदेंचा घणाघात
इंडिया आघाडीची सभा म्हणजे फॅमिली गॅदरिंग अन्... शिंदेंचा घणाघात.
मग घाबरता कशाला? अजितदादांच्या 2019 च्या वक्तव्यावर शिवतारेंचं उत्तर
मग घाबरता कशाला? अजितदादांच्या 2019 च्या वक्तव्यावर शिवतारेंचं उत्तर.
लोकसभा लढवणार की नाही? शिवतारेंनी शिंदेंच्या भेटीनंतर केलं स्पष्ट
लोकसभा लढवणार की नाही? शिवतारेंनी शिंदेंच्या भेटीनंतर केलं स्पष्ट.
एवढी मोठी हस्ती, जीवाला धोका;कडूंनी उडवली राणांच्या वक्तव्याची खिल्ली
एवढी मोठी हस्ती, जीवाला धोका;कडूंनी उडवली राणांच्या वक्तव्याची खिल्ली.
टाईमपास,फुलस्टॉप, केहना क्या चाहते हो; गांधींच्या सभेवर सामंतांची टीका
टाईमपास,फुलस्टॉप, केहना क्या चाहते हो; गांधींच्या सभेवर सामंतांची टीका.
शरद पवार गटाकडून कोण लढणार लोकसभा? संभाव्य उमेदवारांची यादी tv9 कडे
शरद पवार गटाकडून कोण लढणार लोकसभा? संभाव्य उमेदवारांची यादी tv9 कडे.
भाजपला स्वतःची पोरं नाही, ते दुसऱ्यांच्या... राऊतांचा भाजपवर निशाणा
भाजपला स्वतःची पोरं नाही, ते दुसऱ्यांच्या... राऊतांचा भाजपवर निशाणा.