AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना सरकारचा मोठा झटका, या महिलांचे पैसे कायमचे बंद, यादीत तुमचंही नाव आहे का? करा चेक

गरीब कुटुंबातील महिलांना आर्थिक आधार मिळावा, यासाठी राज्य सरकारने लाडकी बहीण योजना सुरू केली आहे. मात्र आता या योजनेबाबत मोठी बातमी समोर आली आहे. सरकारने या योजनेतील लाभार्थी महिलांना मोठा धक्का दिला आहे.

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना सरकारचा मोठा झटका, या महिलांचे पैसे कायमचे बंद, यादीत तुमचंही नाव आहे का? करा चेक
Ladki Bahin YojanaImage Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: May 02, 2026 | 3:44 PM
Share

राज्यातील ज्या कुटुंबांचं उत्पन्न हे अडीच लाखांपेक्षा कमी आहे. अशा कुटुंबातील महिलांसाठी राज्य सरकारने लाडकी बहीण योजना सुरू केली आहे. या योजेनेंतर्गत लाभार्थी महिलांच्या बँक खात्यामध्ये सरकार दीड हजार रुपये जमा करतं. गेल्या दोन वर्षांपासून ही योजना सुरू आहे. परंतु ज्या महिला या योजनेसाठी पात्र नाहीत त्या देखील या योजनेचा लाभ घेत असल्याचं सरकारच्या लक्षात आलं, काही ठिकाणी तर सरकारी नोकरीला असलेल्या महिलांनी देखील या योजनेचा लाभ घेतल्याच्या घटना समोर आल्या होत्या, या महिलांना तेव्हाच या योजनेतून वगळण्यात आलं होतं. ही योजना सुरू करताना सरकारने काही अटी घातल्या होत्या, या अटींची पूर्तता न करणाऱ्या अनेक महिलांनी या योजनेचा लाभ घेतल्याचं समोर आलं.

दरम्यान त्यानंतर या योजनेचा लाभ फक्त पात्र असलेल्या महिलांनाच मिळाला पाहिजे, यासाठी सरकारने या योजनेसाठी केवासी सुरू केली होती. गेल्या दीड वर्षांमध्ये केवायसीच्या माध्यमातून  या योजनेची पडताळणी करण्यात आली. आता 30 एप्रिल रोजी सरकारने या योजनेच्या केवायसीसाठी तिसऱ्यांदा मुदतवाढ दिली होती, ती देखील संपली आहे. त्यानंतर आता सरकारने राज्यातील तब्बल 54 लाख महिलांना या योजनेसाठी अपात्र ठरवलं आहे. ज्या महिला या योजेनेसाठी अपात्र ठरल्या आहेत, त्यांना आता लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळण्याची शक्यता कमी आहे.  तर या योजनेसाठी एक कोटी 89 लाख महिला पात्र ठरल्या आहेत. ज्या महिला या योजनेसाठी पात्र ठरल्या आहेत, त्यांच्या बँक खात्यात दर महिन्याला नियमीतपणे दीड हजार रुपये जमा होणार आहेत.

सरकारने या योजनेसाठी केवायसी करण्यासाठी अनेकदा मुदतवाढ दिली होती, मात्र काही महिलांनी तरी देखील केवायसी न केल्यानं  त्या या योजेनेसाठी अपात्र ठरल्या आहेत, तर काही महिलांनी केवायसी केली, मात्र त्या या योजनेच्या अटींमध्ये बसत नसल्यानं त्यांना अपात्र करण्यात आलं आहे. अशा सर्व महिलांना आता या योजनेतून वगळण्यात आलं आहे. तब्बल 54 महिलांना या योजनेतून वगळण्यात आलं आहे.

Follow Us
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट, व्हिडीओ आले समोर
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले...
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले, शुगर असलेल्यांनीच...
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ व्हायरल
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा..
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा मोठा दावा
ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त
Disha Salian Case : ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त
मातोश्री निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावरच आदित्य ठाकरेंच्या वकिलांनी...
मातोश्री निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावरच आदित्य ठाकरे यांच्या वकिलांनी... सतीश सालियान यांनी दिला 7 दिवसांचा अल्टिमेटम
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील बड्या नेत्याची प्रतिक्रिया, नेमकं...
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील बड्या नेत्याची प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
पाऊस गायब, पाण्याची चिंता वाढली; विक्रम पाचपुतेंनी सुचवला कृत्रिम...
पाऊस गायब, पाण्याची चिंता वाढली; विक्रम पाचपुतेंनी सुचवला कृत्रिम पावसाचा पर्याय
UPI शुल्कावर राज ठाकरेंचा संताप; म्हणाले, ‘डिजिटल सापळ्यात...
UPI शुल्कावर राज ठाकरेंचा संताप; म्हणाले, 'डिजिटल सापळ्यात’ नागरिकांना अडकवले
नांदेडमध्ये कृषिमंत्र्यांच्या ताफ्यासमोर शेतकऱ्यांची घोषणाबाजी
Nanded | नांदेडमध्ये कृषिमंत्र्यांच्या ताफ्यासमोर शेतकऱ्यांची घोषणाबाजी