AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

लाडकी बहीण योजनेसाठी भाजपकडून बॅनरच नाही तर शिवसेना, राष्ट्रवादीपेक्षा एक पाऊल पुढे, देवेंद्र फडणवीस यांच्यावर बनवले गाणे

devendra fadnavis song: भाजपच्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराची सूत्र देवेंद्र फडणवीसच सांभाळणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. यामुळे भाजपने देवेंद्र फडणवीस यांच्यावर गाणे तयार केले आहे. 'देवा देवा, देवा भाऊ' असे बोल या गाण्याचे आहेत.

लाडकी बहीण योजनेसाठी भाजपकडून बॅनरच नाही तर शिवसेना, राष्ट्रवादीपेक्षा एक पाऊल पुढे, देवेंद्र फडणवीस यांच्यावर बनवले गाणे
devendra fadnavis song
| Updated on: Sep 21, 2024 | 2:38 PM
Share

लाडकी बहीण योजनेचे श्रेय महायुतीमधील तिन्ही पक्षांच्या नेत्यांना त्यांचे कार्यकर्ते देत आहे. शिवसेनेचे कार्यकर्ते एकनाथ शिंदे यांना श्रेय देतात, तर राष्ट्रवादी काँग्रेसकडून अजित पवार यांना श्रेय दिले जाते. यामध्ये भाजप कार्यकर्ते देखील मागे नाही. भाजपकडून लाडकी बहीण योजनेचे श्रेय देवेंद्र फडणवीस यांना दिले जात आहे. त्यासाठी ‘बहिणींचा भाऊ देवा भाऊ’ अशी जाहिरात भाजपकडून मोठ्या प्रमाणत करण्यात आली. महिलांना १५०० हजार रुपये देणाऱ्या देवा भाऊला धन्यवाद असे बॅनर मुंबई नव्हे तर राज्यभर लावण्यात आले होते. आता देवेंद्र फडणवीस समर्थकांनी पुढचे पाऊल टाकले आहे. थेट देवा भाऊ नावाने देवेंद्र फडणवीस यांच्या समर्थकांकडून गाणे तयार करण्यात आले आहे.

‘देवा देवा, देवा भाऊ’ गाणे

विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने रणशिंग फुंकले आहे. भाजपच्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराची सूत्र देवेंद्र फडणवीसच सांभाळणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. यामुळे भाजपने देवेंद्र फडणवीस यांच्यावर गाणे तयार केले आहे. ‘देवा देवा, देवा भाऊ’ असे बोल या गाण्याचे आहेत. त्यात रामभक्त आणि शिवभक्त म्हणून देवेंद्र फडणवीस यांचा उल्लेख केला गेला आहे. या गाण्याच्या माध्यमातून देवेंद्र फडणवीस यांनी राज्याच्या जनतेसाठी काय काय योजना राबविल्या आहेत? यासंदर्भातील माहिती गाण्याच्या माध्यमातून दाखवली आहे.

devendra fadnavis song

लाडकी बहीणनंतर ‘देवा भाऊ’ नाव प्रसिद्ध

देवेंद्र फडणवीस यांची विशेष मुलाखत काही दिवसांपूर्वी ‘टीव्ही ९ मराठी’ने घेतली होती. त्यावेळी त्यांना ‘देवा भाऊ’ लाडकी बहीण योजनेमुळे म्हणाले लागले का? असा प्रश्न विचारला होता. त्यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी ‘देवा भाऊ’ या नावाने मला आधीपासून काही जण बोलवतात. परंतु लाडकी बहीण योजनेनंतर ते जास्त प्रसिद्ध झाले. त्यामुळे आता भाजपच्या प्रचाराच्या टीमने देवेंद्र फडणवीस यांच्यावर हेच बोल घेत गाणे बनवले आहे.

आता देवेंद्र फडणवीस यांच्यानंतर लाडकी बहीण योजनेचा संदर्भ घेऊन शिवसेना आणि राष्ट्रवादीकडूनही प्रचार कसा केला जाणार? हे विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत दिसून येणार आहे.

गुंडांनी खाकी वर्दीवर उचलला हात, रोहित पवार चांगलेच भडकले, म्हणाले...
गुंडांनी खाकी वर्दीवर उचलला हात, रोहित पवार चांगलेच भडकले, म्हणाले....
क्लासमध्ये वाद अन विद्यार्थ्याच्या मृत्यू, वडिलांची संतप्त प्रतिक्रिया
क्लासमध्ये वाद अन विद्यार्थ्याच्या मृत्यू, वडिलांची संतप्त प्रतिक्रिया.
मोठी बातमी.. दोन ते तीन दिवसांत ठाकरे बंधू एकत्र? काँग्रेसशिवाय युती..
मोठी बातमी.. दोन ते तीन दिवसांत ठाकरे बंधू एकत्र? काँग्रेसशिवाय युती...
फडणवीसांनी निवडणुकीची घोषणा होताच महायुतीची रणनीती सांगितली; म्हणाले..
फडणवीसांनी निवडणुकीची घोषणा होताच महायुतीची रणनीती सांगितली; म्हणाले...
'धुरंधर'वरून शिंदे-ठाकरेंमध्ये जुंपली, रहमान डकैतवरून तुफान टोलेबाजी
'धुरंधर'वरून शिंदे-ठाकरेंमध्ये जुंपली, रहमान डकैतवरून तुफान टोलेबाजी.
फेकनाथ मिंधे...आदित्य ठाकरे यांची टोलेबाजी, एकनाथ शिंदे यांना डिवचलं!
फेकनाथ मिंधे...आदित्य ठाकरे यांची टोलेबाजी, एकनाथ शिंदे यांना डिवचलं!.
राज्यात 29 महापालिका निवडणुकांचं बिगुलं वाजलं,आजपासून आचारसंहिता लागू
राज्यात 29 महापालिका निवडणुकांचं बिगुलं वाजलं,आजपासून आचारसंहिता लागू.
मुंबई, ठाणे ते पुणे... महापालिकेची निवडणूक अन् निकाल कधी? तारखा जाहीर
मुंबई, ठाणे ते पुणे... महापालिकेची निवडणूक अन् निकाल कधी? तारखा जाहीर.
मनसेचा निवडणूक आयोगाच्या कार्यालयात राडा, कम्प्युटर तोडले अन्... नेमकं
मनसेचा निवडणूक आयोगाच्या कार्यालयात राडा, कम्प्युटर तोडले अन्... नेमकं.
कोचिंग क्लासमध्ये भोसकला चाकू अन्... 10वीच्या मुलाकडून मित्राची हत्या
कोचिंग क्लासमध्ये भोसकला चाकू अन्... 10वीच्या मुलाकडून मित्राची हत्या.