वादग्रस्त वक्तव्य अंगाशी, महिला आयपीएसची औरंगाबादला बदली

बीड : जातीय तेढ निर्माण करणारं वक्तव्य केल्याप्रकरणी बीड जिल्ह्यातील महिला आयपीएस भाग्यश्री नवटक्के यांची औरंगाबादला बदली करण्यात आलीय. नवटक्के यांनी जातीय तेढ निर्माण होईल असं वक्तव्य केल्याची व्हिडीओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाली होती. त्यानंतर विविध संघटनांनी नवटक्के यांना बडतर्फ करण्याची मागणी केली. भाग्यश्री नवटक्के यांच्याकडे माजलगावच्या पोलीस उपअधीक्षक होत्या. कधी दबंग, तर कधी …

, वादग्रस्त वक्तव्य अंगाशी, महिला आयपीएसची औरंगाबादला बदली

बीड : जातीय तेढ निर्माण करणारं वक्तव्य केल्याप्रकरणी बीड जिल्ह्यातील महिला आयपीएस भाग्यश्री नवटक्के यांची औरंगाबादला बदली करण्यात आलीय. नवटक्के यांनी जातीय तेढ निर्माण होईल असं वक्तव्य केल्याची व्हिडीओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाली होती. त्यानंतर विविध संघटनांनी नवटक्के यांना बडतर्फ करण्याची मागणी केली. भाग्यश्री नवटक्के यांच्याकडे माजलगावच्या पोलीस उपअधीक्षक होत्या.

कधी दबंग, तर कधी लेडी सिंघम अशी ओळख निर्माण करून पोलिसांचा खाक्या दाखवत गुन्हेगारासाठी कर्दनकाळ ठरलेल्या आयपीएस भाग्यश्री नवटक्के. सध्या त्यांच्याकडे माजलगावचे पोलीस उपअधीक्षक म्हणून कार्यभार आहे. माजलगाव परिसरात या महिला पोलीस अधिकाऱ्याचा मोठा दबदबा आहे. वाळू तस्करांना तर या पोलीस अधिकाऱ्याने सळो की पळो करून सोडलंय. या महिला अधिकाऱ्याचे किस्से परिसरात मोठ्या हर्षाने ऐकायला मिळतात. मात्र या अधिकाऱ्याच्या एका वादग्रस्त वक्तव्याने राज्यातील लोकांच्या भुवया उंचावल्या आहेत. हे असंवेदनशील वक्तव्य उभ्या महाराष्ट्राच्या जातीय द्वेषात संघर्ष पेटविणारं आणि पुरोगामी महाराष्ट्रात दोन समाजात तेढ निर्माण करणारं हे वक्तव्य आहे. या सर्व प्रकारावर बोलण्यास भाग्यश्री सोनटक्के यांनी नकार दिलाय.

टीव्ही 9 मराठी या व्हिडीओची पुष्टी करत नाही. मात्र सोशल मीडियातून मोठ्या प्रमाणात हा व्हिडीओ व्हायरल केला जातोय. जीन्स पॅन्ट आणि टीशर्ट परिधान करून एका सभागृहात खुर्चीवर बसून भाग्यश्री नवटक्के यांनी ही चर्चा केल्याचं व्हिडीओत दिसत आहे. त्यांच्या समोर बसलेले आरोपी आहेत, तर काही आरोपींचे सहकारी मित्र. मागील एका प्रकरणात अट्रोसिटीनुसार गुन्हा दाखल होता. आरोपी सवर्ण होता. त्याला अटक करण्याऐवजी मदत कशी केली आणि दलितांना धडा कसा शिकवला हे सांगताना त्यांचं मोबाईलमध्ये चित्रीकरण होत होतं ते त्यांच्या लक्षात आलं नाही. महत्त्वाची सामाजिक जबाबदारी असलेल्या या आयपीएस महिला अधिकाऱ्याच्या या वक्तव्याचे दलित समाजाकडून निषेध व्यक्त करण्यात येतोय. भाग्यश्री नवटक्के यांच्यावर अॅट्रोसिटी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करून त्यांना पोलीस सेवेतून बडतर्फ करण्याची मागणी दलित नेते बाबुराव पोटभरे यांनी पोलीस महासंचालकांकडे केली आहे.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *