AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जरांगेंना दसरा मेळाव्यासाठी शुभेच्छा, पण त्यांनी व्यासपीठावरून…, ललिता तारख यांची मोठी मागणी

काही दिवसांपूर्वी ललिता तारख यांनी मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्यावर जोरदार टीका केली होती. दरम्यान त्यांनी आता जरांगे पाटील यांना दसरा मेळाव्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. मात्र सोबतच मोठं आवाहान देखील केलं आहे.

जरांगेंना दसरा मेळाव्यासाठी शुभेच्छा, पण त्यांनी व्यासपीठावरून..., ललिता तारख यांची मोठी मागणी
ललिता तारख यांच्या दसरा मेळाव्यासाठी शुभेच्छाImage Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Oct 16, 2026 | 5:57 PM
Share

काही दिवसांपूर्वी अंतरवाली सराटी येथील आंदोलनावरून ललिता तारख यांनी मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्यावर जोरदार टीका केली होती. त्यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावर आरोप देखील केले होते. दरम्यान त्यानंतर आता ललिता तारख यांनी मनोज जरांगे पाटील यांना दसरा मेळाव्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.  जरांगे पाटलांच्या दसरा मेळाव्याला शुभेच्छा, पण त्यांनी त्या ठिकाणावरून एक आवाहन करावं, तुमच्या आंदोलनात लाखोंच्या संख्येने महिला होत्या, त्यांचा सिंहाचा वाटा होता, पण तुमच्यासोबतची जी टोळी आहे ती महिलांना खूप गलिच्छ भाषेत ट्रोलिंग करते त्यांना थांबवा, अशी मागणी यावेळी ललिता तारख यांनी केली आहे.

नेमकं काय म्हणाल्या तारख? 

जरांगे पाटलांच्या दसरा मेळाव्याला शुभेच्छा, पण त्यांनी त्या ठिकाणावरून एक आवाहन करावं, तुमच्या आंदोलनात लाखोंच्या संख्येने महिला होत्या, त्यांचा सिंहाचा वाटा होता, पण तुमच्यासोबतची जी टोळी आहे ती महिलांना खूप गलिच्छ भाषेत ट्रोलिंग करते त्यांना थांबवा. आता तुम्ही पण थांबा कारण तुम्ही सरकारला ज्या भाषेत बोललात तेच शब्द तुमच्या लाभार्थी टोळीने झेलले आहेत. त्याचाच वापर ते करत आहेत, असं यावेळी तारख यांनी म्हटलं आहे. दरम्यान दसरा मेळाव्याबद्दल काहीही अडचण नाहीये, दसरा मेळावे करा एकत्र या पण तुमची भाषा आधी बदला आणि तुमच्या लोकांना पण बदलायला सांगा, कारण तसं वातावरण आता राहिलेलं नाहीये, आतापर्यंत सहन केलं यापुढे सहन करणार नाही, असा इशारा देखील यावेळी ललिता तारख यांनी जरांगे पाटील यांना दिला आहे.

ललिता तारख यांनी आज जालन्याच्या पालकमंत्री पंकजा मुंडे यांची भेट घेतली आहे. सोशल मीडियावर होणाऱ्या ट्रोलिंग संदर्भात मी सविस्तर चर्चा केली.  मला आणि माझ्या कुटुंबाच्या जीविताला धोका असून, संरक्षण देण्याची निवेदनाद्वारे मागणी केल्याचं यावेळी ललिता तारख यांनी म्हटलं आहे. ट्रोलिंग थांबलं तर ठीक आहे, अन्यथा पुन्हा एकदा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची  भेट घेणार आहे, असंही त्या यावेळी म्हणाल्या.

Follow Us
दिल्लीत वातावरण तापलं! अभिजीत दीपकेंना पुन्हा ताब्यात घेतलं; दिल्ली...
दिल्लीत वातावरण तापलं! अभिजीत दीपकेंना पुन्हा ताब्यात घेतलं; दिल्ली पोलिसांनी CJP चं आंदोलन सुरु होण्याआधीच...
ठाकरे गटाला पुन्हा मोठा धक्का! एकच कारण अन् बड्या नेत्यानं सोडला पक्ष,
ठाकरे गटाला पुन्हा मोठा धक्का! एकच कारण अन् बड्या नेत्यानं सोडला पक्ष, उपमुख्यमंत्री शिंदेंच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश
प्रभादेवीच्या भवानीमाता मंदिरात नवरात्रोत्सवाचा उत्साह; 58 वर्षांची...
प्रभादेवीच्या भवानीमाता मंदिरात नवरात्रोत्सवाचा उत्साह; 58 वर्षांची परंपरा आजही कायम!
गोपीचंद पडळकर यांना मोठा दिलासा, मध्यवर्ती बँकेचा निवडणूक अर्ज वैध...
गोपीचंद पडळकर यांना मोठा दिलासा, मध्यवर्ती बँकेचा निवडणूक अर्ज वैध, न्यायालयाचा मोठा निर्णय
अभिजीत दीपकेंना नोटीस; दिल्लीतील करोल बाग परिसरात आर्ध्या तासापासून...
अभिजीत दीपकेंना नोटीस; दिल्लीतील करोल बाग परिसरात आर्ध्या तासापासून...
मोठी खळबळ! अभिजीत दीपके थांबलेल्या ठिकाणी दिल्ली पोलीस दाखल; दिल्लीत..
मोठी खळबळ! अभिजीत दीपके थांबलेल्या ठिकाणी दिल्ली पोलीस दाखल; दिल्लीत तातडीने...
महायुतीत मिठाचा खडा कुणामुळे? संजय शिरसाटांनी थेट बड्या नेत्याकडे...
महायुतीत मिठाचा खडा कुणामुळे? संजय शिरसाटांनी थेट बड्या नेत्याकडे इशारा, नेमकं कारण काय?
दिल्लीत TV9 फेस्टिव्हल ऑफ इंडियाचा भव्य शुभारंभ; दुर्गापूजा, संगीत अन्
TV9 Festival of India 2026 : दिल्लीत TV9 फेस्टिव्हल ऑफ इंडियाचा भव्य शुभारंभ; दुर्गापूजा, संगीत अन् भारतीय संस्कृतीचा अनोखा संगम
टेस्लाचा आविष्कार! हवेत झेप घेणाऱ्या कारची पहिली झलक समोर, जगभरात...
Tesla Car Video: टेस्लाचा आविष्कार! हवेत झेप घेणाऱ्या कारची पहिली झलक समोर, जगभरात होतेय चर्चा
शेतकऱ्यांना 5 हजारांची मदत तुटपुंजी; सुनील तटकरे नाराज, सरकारच्या....
Sunil Tatkare : शेतकऱ्यांना 5 हजारांची मदत तुटपुंजी; सुनील तटकरे नाराज, सरकारच्या निर्णयावर काय म्हणाले?