दर महिन्याच्या अमावस्येला लासलगाव बाजार समिती असते बंद, कारण….!

लासलगाव बाजार समितीत एक प्रचलित काळापासून परंपरा अवलंबली जात आहे ती म्हणजे दर महिन्याला येणाऱ्या अमावस्येला कांदा व धान्यची लिलाव बंद (Auction closed) ठेवण्याची.

दर महिन्याच्या अमावस्येला लासलगाव बाजार समिती असते बंद, कारण....!
Follow us
| Updated on: Dec 14, 2020 | 6:48 AM

नाशिक : कांदा म्हटले की चटकण तोंडात येते ते लासलगावचे नाव. मग ते गल्लीपासून दिल्लीपर्यंत असो. लासलगाव बाजार समिती (Lasalgaon market committee) ही कांद्याची देशांतर्गत नव्हे तर आशिया खंडातील कांद्याची अग्रेसर बाजार पेठे म्हणून ओळखली जाते. या लासलगाव बाजार समितीत एक प्रचलित काळापासून परंपरा अवलंबली जात आहे ती म्हणजे दर महिन्याला येणाऱ्या अमावस्येला कांदा व धान्यची लिलाव बंद (Auction closed) ठेवण्याची. ही परंपरा का आणि कशासाठी याबाबत उत्तर कोणाकडे ही नाही हे मात्र विशेष आहे. पण परंपरेचे काटेकोरपणे पालन केले जाते यात तिळमात्र शंका नाही. (Lasalgaon market committee is closed on the new moon of every month know the reason)

शेतकऱ्यांच्या हितासाठी केंद्र सरकारच्यावतीने प्रत्येक राज्यांमध्ये बाजार समितीची राज्य सरकारच्या नियंत्रणाखाली स्थापना करण्यात आली 1 एप्रिल 1947 मध्ये लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीची स्थापना झाली तेव्हापासून ते आजपर्यंत कांद्याच्या बाबतीत बाजार समितीने नावलौकिक कमवले आहे. नाशिक जिल्ह्यातील निफाड आणि चांदवड तालुक्यातील गावांमधील शेतकऱ्यांची शेतीमाल विक्रीसाठी उपबाजार आवाराच्या माध्यमातून शेतकऱ्यांना शेतीमाल विक्री करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती.

मात्र, आधुनिक वाहनांची उपलब्धता नसल्याने बैलगाड्यांमधून कांदा व धान्य विक्रीसाठी येत असे. महिन्याच्या दर अमावस्येला आपल्यावर काही विपदा येऊ नये म्हणून व्यापारी, शेतकरी आणि हमाल मापारी हे बाजार समितीच्या आवारातील कांदा व धान्य लिलावाच्या कामकाजात सहभागी होत नसल्याने कांद्याचे व धान्य लिलाव बंद ठेवले जात होती.

आज एकविसाव्या शतकात शेती पीके वाहतुकीसाठी आधुनिक वाहनांची उपलब्धता झाली आहे. मानवाने चंद्रावर पाऊल ठेवले असून मंगळ ग्रहासह अनेक ग्रहांवर वेगवेगळे प्रयोग करत जीवसृष्टीचा शोध घेतला जात असताना दर अमावस्येला लासलगाव बाजार समितीत कांदा व धान्य लिलावात घटक कामकाजात सहभागी होत नसल्याने बंद ठेवण्याची परंपरा आजही अवलंबिली जाते ही विशेष आहे.

लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीतून बांगलादेश, मलेशिया, श्रीलंका, संयुक्त अरब, अमिराती, नेपाळ, सिंगापूर, इंडोनेशिया, कतार, कुवेत, मोरिशस, सौदी अरेबिया, बेहरीन, ओमान, व्हियेतनाम, सोशल रिपब्लिक, मालदीव, युनायटेड किंगडम, रियुनियन, थायलंड, ब्रुनेई, रशिया, ग्रीस, हाँगकाँग, पाकिस्तान, इटली, नेदरलँड्स, सेशल्स, कोमोरेझ, फ्रान्स ,केनिया, कॅनडा, स्पेन, युनायटेड स्टेटस् आदी देशांसह एकूण 76 देशांना कांदा निर्यात केली जाते. दर महिन्याच्या अमावस्येला कांद्याचे लिलाव बंद ठेवले जात असल्यामुळे कोट्यावधी रुपयांचे व्यवहार ठप्प होतात.  (Lasalgaon market committee is closed on the new moon of every month know the reason)

इतर बातम्या –

हॉटेलवर अवैधरित्या दारुसाठा, राज्य उत्पादन शुल्क विभागातर्फे धडक कारवाई, 65 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त

नाशिकमधल्या विमानसेवेला प्रोत्साहन देण्यासाठी उद्योजक आणि पर्यटनप्रेमी मैदानात

(Lasalgaon market committee is closed on the new moon of every month know the reason)

Non Stop LIVE Update
मोदींवरील त्या वक्तव्यावर नवनीत राणांचं स्पष्टीकरण, विरोधकांवर घणाघात
मोदींवरील त्या वक्तव्यावर नवनीत राणांचं स्पष्टीकरण, विरोधकांवर घणाघात.
मशाल आहे की आईस्क्रीमचा..., भाजपच्या बड्या नेत्याची ठाकरे गटाला टोला
मशाल आहे की आईस्क्रीमचा..., भाजपच्या बड्या नेत्याची ठाकरे गटाला टोला.
सासूचे 4 दिवस संपले, आता सूनेचे दिवस...,दादांचा शरद पवारांना खोचक टोला
सासूचे 4 दिवस संपले, आता सूनेचे दिवस...,दादांचा शरद पवारांना खोचक टोला.
गद्दारी करणाऱ्यांना... ओमराजे निंबाळकरांची शिंदेंच्या खासदारावर टीका
गद्दारी करणाऱ्यांना... ओमराजे निंबाळकरांची शिंदेंच्या खासदारावर टीका.
खासदाराच्या प्रचारसभेत आमदाराला आली चक्कर, रुग्णालयात उपचार सुरु
खासदाराच्या प्रचारसभेत आमदाराला आली चक्कर, रुग्णालयात उपचार सुरु.
काँग्रेसचा जाहीरनामा मुस्लिमांना प्राधान्य देणारा? भाजपच्या टीकेवर....
काँग्रेसचा जाहीरनामा मुस्लिमांना प्राधान्य देणारा? भाजपच्या टीकेवर.....
राणेंच्या उमेदवारीवरून धाकधूक, नितेश राणेंचं वक्तव्य; एक दिवस थांबा...
राणेंच्या उमेदवारीवरून धाकधूक, नितेश राणेंचं वक्तव्य; एक दिवस थांबा....
नरेंद्र मोदी खोटारडे... त्यांच्या घोषणा भपंक, राऊतांचा मोदींवर घणाघात
नरेंद्र मोदी खोटारडे... त्यांच्या घोषणा भपंक, राऊतांचा मोदींवर घणाघात.
घड्याळ चिन्हाचं प्रकरण न्यायप्रविष्ट, दादांच्या जाहिरातीत काय म्हटलंय?
घड्याळ चिन्हाचं प्रकरण न्यायप्रविष्ट, दादांच्या जाहिरातीत काय म्हटलंय?.
उन्हाचा तडाखा वाढलाय, मुंबईसह 'या' शहरात उष्णतेची लाट, उन्हाची काहिली
उन्हाचा तडाखा वाढलाय, मुंबईसह 'या' शहरात उष्णतेची लाट, उन्हाची काहिली.