AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मतदार यादीत नाव नोंदवण्याची शेवटची संधी! नाव नोंदणीसाठीची मुदत लवकरच संपणार; तारीख आली समोर

Voter Registration: मतदार यादीत नाव नोंदणीसाठी १२ ऑक्टोबरपर्यंत मुदत वाढवण्यात आली आहे. नवमतदारांसाठी १० आणि ११ ऑक्टोबरला राज्यभर विशेष शिबिरे राबवण्यात येणार आहेत.

मतदार यादीत नाव नोंदवण्याची शेवटची संधी! नाव नोंदणीसाठीची मुदत लवकरच संपणार; तारीख आली समोर
| Updated on: Oct 09, 2026 | 7:51 PM
Share

विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत प्रारूप मतदार यादीत नाव समाविष्ट करणे, नाव वगळणे किंवा नोंदींमध्ये दुरुस्ती करण्यासाठी अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत १२ ऑक्टोबर २०२६ आहे. नवमतदारांसह प्रारूप मतदार यादीत नाव नसलेल्या पात्र नागरिकांना आपले नाव मतदार यादीत नोंदविण्याची संधी उपलब्ध करून देण्यासाठी १० व ११ ऑक्टोबर रोजी राज्यातील सर्व मतदान केंद्रांवर विशेष शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. या संधीचा लाभ घेऊन मतदारांनी अंतिम मतदार यादीत आपले नाव सुनिश्चित करावे, असे आवाहन मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयामार्फत करण्यात आले आहे.

भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार राज्यात विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम सुरू आहे. ३१ ऑगस्ट २०२६ रोजी प्रसिद्ध झालेल्या प्रारूप मतदार यादीत नाव समाविष्ट करण्यासाठी ८ ऑक्टोबरपर्यंत ७ लाख १९ हजार ३८२ मतदारांनी नमुना-६ मध्ये अर्ज दाखल केले आहेत. मतदार यादीतील नोंदींमध्ये दुरुस्तीसाठी ३ लाख ९९ हजार ९२५ अर्ज नमुना-८ मध्ये, तर नावे वगळण्यासाठी १८ हजार ७४८ अर्ज नमुना-७ मध्ये प्राप्त झाले आहेत.

१ ऑक्टोबर २०२६ या अर्हता दिनांकास किंवा त्यापूर्वी वयाची १८ वर्षे पूर्ण करणारे नवमतदार तसेच अन्य पात्र असूनही प्रारूप मतदार यादीत नाव समाविष्ट न झालेल्या नागरिकांना नमुना-६ भरून नाव नोंदविता येईल. त्यासाठी आवश्यक घोषणापत्र व कागदपत्रे जोडणे आवश्यक आहे. हे अर्ज संबंधित मतदार नोंदणी अधिकारी, सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी किंवा मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) यांच्याकडे ऑफलाइन पद्धतीने सादर करता येतील. तसेच १० व ११ ऑक्टोबर रोजी आयोजित विशेष शिबिरांमध्येही अर्ज दाखल करता येतील. ऑनलाइन अर्ज करण्यासाठी भारत निवडणूक आयोगाच्या https://voters.eci.gov.in/ या संकेतस्थळाचा वापर करता येईल.

मागील विशेष सखोल पुनरीक्षणातील नोंदींशी जुळवणी न झाल्यामुळे (नो मॅपिंग) किंवा जुळवणी होऊनही तार्किक विसंगती (लॉजिकल डिस्क्रिपन्सी) आढळल्यामुळे नोटीस प्राप्त झालेल्या मतदारांनाही विशेष शिबिरांमध्ये संबंधित कागदपत्रे सादर करता येतील. भारत निवडणूक आयोगाने नोटिशीत नमूद केलेल्या १३ प्रकारच्या कागदपत्रांपैकी आवश्यक कागदपत्र उपलब्ध नसल्यास अन्य वैध कागदपत्रे किंवा दस्तऐवज सादर करता येतील. यासाठी ‘Any Other Documents’ हा पर्याय बीएलओ ॲपवर उपलब्ध करून देण्यात आला आहे. मतदारांनी १२ ऑक्टोबरची अंतिम मुदत लक्षात घेऊन आवश्यक अर्ज व कागदपत्रे वेळेत सादर करावीत आणि विशेष शिबिरांचा लाभ घ्यावा, असे आवाहन मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने केले आहे.

Follow Us
मोदीजी, बीपी चेक करत राहा; अभिजीत दीपकेंचा पंतप्रधानांना टोला
Abhijeet Dipke : मोदीजी, बीपी चेक करत राहा; अभिजीत दीपकेंचा पंतप्रधानांना टोला, मेट्रो-रेल्वे बंदीवरून सरकारवर निशाणा
रेल्वे, मेट्रो बंदच्या निर्णयाविरोधात कोर्टात सुनावणी; कोर्टाने....
CJP Protest : सीजेपीचं उद्या दिल्लीत आंदोलन, रेल्वे, मेट्रो बंदच्या निर्णयाविरोधात कोर्टात सुनावणी; कोर्टाने केंद्राला काय सांगितलं?
गजानन कीर्तिकर ठाकरेंच्या सेनेत घरवापसी करणार? स्वतःच केला मोठा खुलासा
Gajanan Kirtikar : Shivsena : गजानन कीर्तिकर ठाकरेंच्या सेनेत घरवापसी करणार? स्वतःच केला मोठा खुलासा, म्हणाले...
एवढीच भीती वाटते तर...; दिल्लीतील बंदोबस्तावर दीपकेंचा सरकारला टोला
Abhijeet Dipake : एवढीच भीती वाटते तर...; दिल्लीतील बंदोबस्तावर अभिजित दीपकेंचा सरकारला टोला
ठाकरे की शिंदे? शिवसेना पक्ष आणि चिन्हाचा फैसला लवकरच....
Shivsena : ठाकरे की शिंदे? शिवसेना पक्ष आणि चिन्हाचा फैसला लवकरच, सर्वोच्च न्यायालयाकडून तारीख जाहिर
गाढव म्हणताय? आता ऐका माझं उत्तर; विवेकानंद पाटलांचा बण यांच्यावर....
Vivekanand Patil : गाढव म्हणताय? आता ऐका माझं उत्तर; विवेकानंद पाटलांचा नवनाथ बण यांच्यावर पलटवार, फडणवीसांनाही केलं आवाहन
CJP आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत मोठे बदल, व्हिडिओ बघाच
CJP Delhi Andolan : CJP आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत मोठे बदल, व्हिडिओ बघाच
दिल्लीतील इंडिया आघाडीच्या आंदोलनाकडे ठाकरे सेनेची पाठ?
Thackeray Group On Delhi Andolan : दिल्लीतील इंडिया आघाडीच्या आंदोलनाकडे ठाकरे सेनेची पाठ? राष्ट्रपतींच्या भेटीवेळीही प्रतिनिधी....
सहन होत नाही आणि सांगता येत नाही... एमपीएससी आंदोलनावरून राऊतांनी...
Sanjay Raut : सहन होत नाही आणि सांगता येत नाही... एमपीएससी आंदोलनावरून संजय राऊतांनी सरकारला घेरलं
SIR मुद्द्यावरून फडणवीसांचा काँग्रेसवर पलटवार; सिब्बलांचा जुना व्हिडिओ
Devendra Fadnavis : SIR मुद्द्यावरून फडणवीसांचा काँग्रेसवर पलटवार; कपिल सिब्बलांचा जुना व्हिडिओ शेअर करत म्हणाले...