लातूरच्या नगरसेवकाचा प्रामाणिकपणा, रस्त्यात मिळालेले पैसै मालकाचा शोध घेऊन केले परत

लातूर शहरातल्या भाजी मंडईमध्ये रस्त्यावर सापडलेले पैसे नगरसेवक इम्रान सय्यद यांनी (Latur Corporator Imran Sayyad) संबंधित व्यक्तीचा शोध घेऊन परत केले आहेत.

लातूरच्या नगरसेवकाचा प्रामाणिकपणा, रस्त्यात मिळालेले पैसै मालकाचा शोध घेऊन केले परत
Latur Money Return
Follow us
| Updated on: Mar 12, 2021 | 12:10 PM

लातूर : लातूर शहरातल्या भाजी मंडईमध्ये रस्त्यावर सापडलेले पैसे नगरसेवक इम्रान सय्यद यांनी (Latur Corporator Imran Sayyad) संबंधित व्यक्तीचा शोध घेऊन परत केले आहेत. या सामाजिक बांधिलकी बद्दल पोलिसांनी इम्रान सय्यद यांचा सन्मान केला आहे (Latur Corporator Imran Sayyad Return Money To The Respected Family Which He Found On Road).

नेमकं काय घडलं?

नगरसेवक इम्रान सय्यद आणि शकील वलांडीकर हे दयानंद भाजी मंडई भागातून जात असताना त्यांना रस्त्यावर पडलेले पॉकेट सापडले होते. त्यामध्ये ओळखपत्र आणि 20 हजार रुपये होते. ओळखपत्राच्या आधारे संबंधीत व्यक्तीच्या घरी जाऊन इम्रान सय्यद यांनी ते पैसे परत केले आहेत. या सामाजिक बांधिलकी बद्दल पोलिसांनीही त्यांचा सन्मान केला आहे. मुलीच्या लग्न खरेदीच्या घाईत ही रक्कम गहाळ झाली होती.

मुलीच्या लग्न खरेदीच्या घाईत

नगरसेवक इम्रान सय्यद आणि शकील वलांडीकर हे दयानंद भाजी मंडई भागातून जात असताना त्यांना रस्त्यावर पडलेले पॉकेट सापडले होते. त्यामध्ये ओळखपत्र आणि विस हजार रुपये होते. ओळखपत्राच्या आधारे संबंधीत व्यक्तीच्या घरी जाऊन इम्रान सय्यद यांनी ते पैसे परत केले. मुलीच्या लग्न खरेदीच्या घाईत हr रक्कम गहाळ झाली असल्याचे त्या कुटुंबाने सांगितले आहे.

दयानंद कॉलेजजवळ असलेल्या या भाजी मंडईमध्ये नेहमीच गर्दी असते. या गर्दीत नेमकं हे पॉकेट इम्रान सय्यद यांच्या नजरेस पडले. यामध्ये आधार कार्ड आणि इतर कागदपत्रे होती. याशिवाय पाचशेच्या वीस हजार रुपयांच्या नोटा होत्या. आधारकार्ड आणि इतर कागदा पत्रावरुन संबंधित व्यक्तीचा मोबाईल नंबर शोधून संपर्क करण्यात आला. त्या व्यक्तीच्या घरी जाऊन त्यांना त्यांचे पैसे आणि पॉकेट देण्यात आले आहे.

या कुटुंबाने आभार मानले आहेत. हरवलेली वस्तू कोणाला आढळल्यास पोलीस किंवा सबंधितांना आणून द्यावी असा सामान्य नियम असूनही बरेच लोक टाळत असतात. मात्र, नगरसेवक असलेल्या इम्रान सय्यद आणि त्यांचे मित्र शकील वलंडीकर यांनी आपल कर्तव्य केले आहे. याबाबत लातुरच्या एमआयडीसी पोलीस स्टेशनच्या वतीने इम्रान यांचा सन्मान करण्यात आला.

सामाजिक क्षेत्रात कार्यरत असलेले मान्यवर यावेळी उपस्थित होते. समाजात अशा घटनांबाबत जागृती यावी, आपल्या वस्तू संभाळाव्यात आणि कोणाची वस्तू सापडलीच तर ती त्या त्या व्यक्तीला परत करावी या हेतूने डॉ. पवन लड्डा यांनी ही माहिती प्रसिद्धीस दिलेली आहे.

Latur Corporator Imran Sayyad Return Money To The Respected Family Which He Found On Road

संबंधित बातम्या :

नशिबाची ‘कम्माल’… ५३ वर्षांनी सापडले हरवलेले पाकिट

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.