सौभाग्याचं लेणं यात्रेत चोरीला गेलं; 22 वर्षांनी मंगळसूत्र परत मिळालं

हे मंगळसूत्र पोलिसांच्या हाती लागल्यानंतरही शकुंतला यांना ते सहजासहजी हातात मिळाले नाही. त्यासाठी शकुंतला शिंदे यांना न्यायालयीन लढा द्यावा लागला. | stolen mangalsutra

सौभाग्याचं लेणं यात्रेत चोरीला गेलं; 22 वर्षांनी मंगळसूत्र परत मिळालं
हे मंगळसूत्र पोलिसांच्या हाती लागल्यानंतरही शकुंतला यांना ते सहजासहजी हातात मिळाले नाही. त्यासाठी शकुंतला शिंदे यांना न्यायालयीन लढा द्यावा लागला.
Follow us
| Updated on: Mar 08, 2021 | 2:19 PM

उस्मानाबाद: आपण आतापर्यंत चित्रपटात किंवा कथा-कादंबऱ्यांमध्ये अनेक वर्षांपूर्वी हरवलेली माणसं, नातेवाईक एकमेकांना भेटल्याचं ऐकलं असेल. मात्र, उस्मानाबादमध्ये एका महिलेला 22 वर्षांपूर्वी हरवलेलं तिचं मंगळसूत्र (Chain snatching) परत मिळालं. अगदी चित्रपटात शोभेल अशीच ही संपूर्ण घटना आहे. या घटनेची सध्या राज्यभरात प्रचंड चर्चा सुरु आहे. (Women get back her stolen mangalsutra after 20 years in Osmanabad Maharashtra )

शकुंतला शिंदे असे या भाग्यवान महिलेचे नाव आहे. हे मंगळसूत्र पोलिसांच्या हाती लागल्यानंतरही शकुंतला यांना ते सहजासहजी हातात मिळाले नाही. त्यासाठी शकुंतला शिंदे यांना न्यायालयीन लढा द्यावा लागला.

‘यात्रेच्या गर्दीत मंगळसूत्र गेले चोरीला’

उस्मानाबाद तालुक्यातील वाखरवाडी गावच्या शकुंतलाबाई शिंदे पती बरोबर उसतोड मजुरी करुन आपल्या कुटुंबाचा गाडा हाकतात. 1998 साली त्या पतीबरोंबर येरमाळा येथील येडश्वरी यात्रेला गेल्या यात्रेच्या गर्दीत त्यांचे गळयातील सोन्याचे मंगळसुत्र चोरट्यांनी चोरले. मोलमजुरी करून मोठया कष्टाने कमावलेल सौभाग्याचं लेणं चोरीला गेल्याने त्या भर यात्रेत ढसाढसा रडल्या. पतीने समजुत घालुन शांत केले त्यानंतर थेट पोलीस ठाणे गाठून तक्रार दाखल केली व गावाकडे निघुन गेले. तब्बल वर्षभराने पोलीसांनी मुद्देमालासह आरोपीला गजाआड केले. मात्र, त्यानंतर न्यायालयीन तारखा आणि सुनावण्यांमध्ये त्यांचे मंगळसूत्र अडकून पडले. तेव्हापासून शकुंतला शिंदे हे मंगळसूत्र परत मिळवण्यासाठी लढा देत होत्या.

अखेर 13 जुलै 2019 ला हे प्रकरण कोर्टात सुनावणीला आले. तेव्हा न्यायालयाने शकुंतला बाईंचे मंगळसूत्र परत देण्याचा आदेश पोलिसांना दिला. 2 मार्च 2021 रोजी पोलिसांनी हे सोने शकुंतला शिंदे यांना परत दिले. त्यामुळे यंदाचा महिलादिन शकुंतला शिंदे यांच्यासाठी खास ठरला आहे.

शकुंतला बाई चाळीशीच्या असताना मंगळसूत्र चोरीला, साठी गाठल्यानंतरही परत मिळाले

शकुंतला बाई चाळीस वर्षांच्या असताना त्यांचे मंगळसूत्र चोरीला गेले होते. आता त्यांनी वयाची साठी ओलांडली आहे. 22 वर्षांच्या या लढ्यात त्यांना साथ मिळाली ती त्यांच्या पतीची. आज हे सोने परत मिळाल्यामुळे पती-पत्नीच्या आनंदाला पारवराच उरला नाही.

संबंधित बातम्या:

खिडकी तोडून दरोडेखोर बँकेत, रात्री 11:53 ला सायरन वाजला, पहाटे 2:46 पर्यंत काय काय घडलं?

कार्यक्रमात ब्रँडेड कुंकू का वापरले नाही, क्षुल्लक कारणामुळे नवऱ्याकडून चक्क लग्नाला नकार

कल्याणमध्ये चप्पलचं दुकान जळून खाक, 6 दिवसानंतर साफसफाई करताना लहान मुलांचा मृतदेह सापडल्याने खळबळ

(Women get back her stolen mangalsutra after 20 years in Osmanabad Maharashtra )

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.