AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

गावानं नाकारलं, देश स्वीकारणार, बारा मतदारांचे जाहीर आभार, लातूरच्या पठ्ठ्याचं बॅनर

लातूर जिल्ह्यातल्या डोंगर-कोनाळी गावाच्या भर चौकात लावलेलं बॅनर तमाम नेटिझन्सचं लक्ष वेधून घेत आहे. (Latur banner Gram Panchayat )

गावानं नाकारलं, देश स्वीकारणार, बारा मतदारांचे जाहीर आभार, लातूरच्या पठ्ठ्याचं बॅनर
| Updated on: Jan 22, 2021 | 10:21 AM
Share

लातूर : निवडणुकीत कमी मतं पडली, तर काही उमेदवारांना तोंड कुठे लपवू नि कुठे नको, असं होतं. मात्र लातूरचा पठ्ठ्या जिगरबाजच म्हणायला हवा, कारण अवघी 12 मतं पडूनही त्याने बॅनरबाजी केली. गावानं नाकारलं, समाजाने धिक्कारलं असेल, पण देश स्वीकारणार, असा जबरा कॉन्फिडन्सही त्याने व्यक्त केला. (Latur man puts banner to thank 12 voters in Gram Panchayat Election)

कोनाळी गावातील बॅनरची देशभर चर्चा

बारा मतं पडली, हे भर चौकात सांगायला हिंमत लागते. लातूर जिल्ह्यातल्या डोंगर-कोनाळी गावाच्या भर चौकात एक मंदिर आहे. या मंदिरावर लावलेलं बॅनर फक्त गावकऱ्यांचंच नाही, तर तमाम नेटिझन्सचं लक्ष वेधून घेत आहे. कारण हे बॅनर आहे बारा मतदारांचे जाहीर आभार मानणारं.

12 मतांची किंमत बाराशे मतांइतकी

लातूर जिल्ह्यातल्या डोंगर-कोनाळीतील ग्रामपंचायत निवडणुकीत विकास शिंदे कोनाळीकर रिंगणात उतरला होता. विकास एकटाच वॉर्डात अपक्ष उभा होता. त्याचं निवडणूक चिन्ह होतं शिट्टी. निवडणुकीत विकासला केवळ बारा मतं मिळाली. मात्र या 12 मतांची किंमत त्याच्या नजरेत बाराशे मतांइतकी आहे. म्हणूनच मतदारांचे आभार मानण्यासाठी त्याने बॅनर लावला.

विकास शिंदेने बॅनरवर काय लिहिलंय?

वाटलं होतं गड्या आपला गाव बरा… पण तुम्ही म्हणालो पसारा भरा, आम्ही जातो आमच्या गावा… आमचा राम राम घ्यावा समाजाने धिकारलं… गावानं नाकारलं.. पण आम्हाला देश स्वीकारणार… आमच्यावर जीवापाड प्रेम करणाऱ्या बारा मतदारांचे जाहीर आभार (Latur man puts banner to thank 12 voters in Gram Panchayat Election)

ना जातीसाठी… ना धर्मासाठी… आमचा लढा मातीसाठी… जगेन तर देशासाठी… मरेन तर देशासाठी… मला ज्यांनी बारा मते देऊन संघर्ष करण्याची ताकद दिली, त्यांचे सात जन्मही उपकार फिटणार नाहीत तुमच्या मताचं देशात नावच करीन

-खंडेराया नगरीचे पराभूत उमेदवार विकास शिंदे कोनाळीकर

दोन-चार मतांनी पडल्याने गावाला शिव्या घालत पाच वर्ष काढणारे शेकडो मिळतील, पण केवळ 12 मतं पडली म्हणून हिरमुसून न जाता गावाच्या चौकात बॅनर लावून 12 मतदारांचे आभार मानणारे विकासराव सध्या तरी एकटेच झळकत आहेत.

संबंधित बातम्या :

VIDEO | कुटुंबाच्या विरोधानंतरही ग्रामपंचायतीत बाजी, पठ्ठ्याचा शर्ट काढून दंड थोपटत जल्लोष

यशस्वी स्त्रीच्या मागे, खंबीर पुरुषाचाही हात असतो, महाराष्ट्रात व्हायरल होणाऱ्या फोटोमागची कहाणी!

(Latur man puts banner to thank 12 voters in Gram Panchayat Election)

नगरसेवक बनायचं असेल तर... इच्छुक उमेदवारांवर गडकरींचं खास शैलीत सल्ला
नगरसेवक बनायचं असेल तर... इच्छुक उमेदवारांवर गडकरींचं खास शैलीत सल्ला.
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत भाजपचाच महापौर... नरेंद्र पवाराचा दावा
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत भाजपचाच महापौर... नरेंद्र पवाराचा दावा.
कार ते एक गुंठा जमीन, पुण्यात उमेदवाराकडून मतदारांना भन्नाट ऑफर्स
कार ते एक गुंठा जमीन, पुण्यात उमेदवाराकडून मतदारांना भन्नाट ऑफर्स.
शेलारांना आठवले चावले, त्यांना पक्षात..संदीप देशपांडे यांची बोचरी टीका
शेलारांना आठवले चावले, त्यांना पक्षात..संदीप देशपांडे यांची बोचरी टीका.
...हे श्रीमंत भिकाऱ्यांचं लक्षण, संजय राऊत यांची भाजपवर जहरी टीका
...हे श्रीमंत भिकाऱ्यांचं लक्षण, संजय राऊत यांची भाजपवर जहरी टीका.
नाशकात भूंकप, युतीनंतर ठाकरे बंधूंना धक्का; मनसे-ठाकरे नेते भाजपवासी
नाशकात भूंकप, युतीनंतर ठाकरे बंधूंना धक्का; मनसे-ठाकरे नेते भाजपवासी.
देवयानी फरांदे भावूक; भाजप प्रवेश अन निष्ठावंतांच्या न्यायासाठी उद्रेक
देवयानी फरांदे भावूक; भाजप प्रवेश अन निष्ठावंतांच्या न्यायासाठी उद्रेक.
जागावाटपाचा तिढा फडणवीसांच्या दरबारात, भाजपकडून 115 जणांची नाव निश्चित
जागावाटपाचा तिढा फडणवीसांच्या दरबारात, भाजपकडून 115 जणांची नाव निश्चित.
पुण्यात ठाकरेंची सेना अन् मनसेची युती होणार? कोण किती जागांवर लढणार?
पुण्यात ठाकरेंची सेना अन् मनसेची युती होणार? कोण किती जागांवर लढणार?.
राज ठाकरेंवर माझी नाराजी नाही, पण... दिनकर पाटलांची पहिली प्रतिक्रिया
राज ठाकरेंवर माझी नाराजी नाही, पण... दिनकर पाटलांची पहिली प्रतिक्रिया.