AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Latur Honey Trap : वृद्धाला प्रेमाच्या जाळ्यात खेचून लाखो रुपयांची खंडणी उकळली; ठग ‘लैला’ पोलिसांच्या ताब्यात

75 वर्षांच्या वृद्धाला विश्वासात घेऊन महिलेने त्याच्यासोबत प्रेमाचे नाटक केले आणि वेगवेगळ्या ठिकाणी पार्टी करण्यासाठी बोलावले. आपल्या दोन साथीदारांच्या मदतीने महिलेने वृद्धाचे अश्लील फोटो काढले. त्यानंतर ते फोटो व्हायरल करण्याची आणि पोलिसांत बलात्काराचा खोटा गुन्हा दाखल करण्याची धमकी देऊन वेळोवेळी लाखो रुपये उकळले.

Latur Honey Trap : वृद्धाला प्रेमाच्या जाळ्यात खेचून लाखो रुपयांची खंडणी उकळली; ठग 'लैला' पोलिसांच्या ताब्यात
वृद्धाला प्रेमाच्या जाळ्यात खेचून लाखो रुपयांची खंडणी उकळलीImage Credit source: TV9
| Edited By: वैजंता गोगावले | Updated on: Jun 17, 2022 | 5:10 PM
Share

लातूर : महिलांवर अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ होत आहेत. अशातच अनेकदा खोट्या तक्रारी दाखल करून नाहक त्रास देण्याचेही प्रकार सुरू असतात. लातूर जिल्ह्यात अशाच प्रकारची एक धक्कादायक घटना उजेडात आली. एका महिलेने चक्क एका वृद्ध नागरिकाला आपल्या जाळ्यात ओढले. त्या वृद्धाचे अश्लील फोटो (Pornographic Photos)ही तिने काढले आणि त्यानंतर त्याच फोटोंचा गैरफायदा (Misuse) उठवत वृद्धाकडून लाखो रुपयांची खंडणी (Ransom) उकळली. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर पोलिसही हादरून गेले असून महिलेच्या या प्रतापाने परिसरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणात आरोपी महिलेविरुद्व खंडणी उकळल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या महिलेने अन्य दोघा आरोपींच्या साथीने वृद्धाकडून लाखो रुपये उकळल्याचे समोर आले आहे. पोलीस या गुन्ह्याचा कसून तपास करीत आहेत.

वृद्ध दारुच्या नशेत असताना अश्लील फोटो काढले!

आरोपी महिलेने फिर्यादी वृद्धाला आपल्या जाळ्यात ओढले आणि त्याचे अश्लील फोटो काढत लाखो रुपयांची खंडणी उकळली. हा प्रकार लातूर जिल्ह्यातील अहमदपूर इथे घडला आहे. वृद्व नागरिक दारूच्या नशेत होता. त्यावेळी त्या वृद्ध व्यक्तीचे अश्लील फोटो काढण्यात आले आणि त्यानंतर बलात्कराचा खोटा गुन्हा दाखल करण्याची धमकी दिली. याच धमकीच्या साहाय्याने महिलेने 15 लाख रुपयांची खंडणी उकळली. वारंवार पैसे देऊन देऊन त्रासलेल्या पिडीत वृद्ध व्यक्तीने अखेर पोलिसांत धाव घेतली. त्या वृद्धाने स्वतःच्या छळवणुकीविरुद्ध तक्रार केल्यानंतर आरोपींचा भांडाफोड झाला.

वृद्धाला आधी विश्वासात घेतले आणि प्रेमाचे नाटक केले!

75 वर्षांच्या वृद्धाला विश्वासात घेऊन महिलेने त्याच्यासोबत प्रेमाचे नाटक केले आणि वेगवेगळ्या ठिकाणी पार्टी करण्यासाठी बोलावले. आपल्या दोन साथीदारांच्या मदतीने महिलेने वृद्धाचे अश्लील फोटो काढले. त्यानंतर ते फोटो व्हायरल करण्याची आणि पोलिसांत बलात्काराचा खोटा गुन्हा दाखल करण्याची धमकी देऊन वेळोवेळी लाखो रुपये उकळले. या त्रासाला कंटाळून वृद्धाने पोलिसांत तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी आरोपी महिलेसह तिघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली असून एक आरोपी सध्या फरार आहे. पोलिस त्याचा शोध घेत आहेत. (A ransom of lakhs of rupees was looted by dragging the old woman into the trap of love in latur)

Follow Us
बिकानेरच्या रसमलाईत चक्क बुरशी! कामोठ्यात धक्कादायक प्रकार समोर
Navi Mumbai | बिकानेरच्या रसमलाईत चक्क बुरशी! कामोठ्यात धक्कादायक प्रकार समोर; दुकान मालकाने चूक मान्य करत...
मध्य रेल्वेची लोकल सेवा ठप्प! कल्याण स्थानकवरून प्रवाशांवर भर पावसात..
Mumbai Local | मध्य रेल्वेची लोकल सेवा ठप्प! कल्याण स्थानकवरून प्रवाशांवर भर पावसात रुळावरून पायी चालण्याची आली वेळ
अमित शाहांनी मुंबईतून दिली दोन मोठी अपडेट! सेवा संकल्प अभियानची घोषणा
Amit Shah | अमित शाहांनी मुंबईतून दिली दोन मोठी अपडेट! सेवा संकल्प अभियानची घोषणा, पुढे म्हणाले...
नांदेडमध्ये दुष्काळग्रस्तांची दहीहंडी! दीड महिन्यापासून पाऊस गायब...
Nanded | नांदेडमध्ये दुष्काळग्रस्तांची दहीहंडी! दीड महिन्यापासून पाऊस गायब; शेतकऱ्यांनी चौकात मांडली करपलेल्या पिकांची व्यथा
जरांगेंना विखे पाटलांची कळकळीची विनंती! चर्चेतून मार्ग काढू...
Radhakrishna Vikhepatil | जरांगेंना विखे पाटलांची कळकळीची विनंती! चर्चेतून मार्ग काढू... मराठा आरक्षणावर मोठी अपडेट समोर
तोंडाला पाने पुसण्यापेक्षा कोर्टात टिकणारं आरक्षण हवं!
Shivendraraje Bhonsle | तोंडाला पाने पुसण्यापेक्षा कोर्टात टिकणारं आरक्षण हवं! शिवेंद्रराजे भोसले स्पष्टच बोलले, पुढे म्हणाले...
संजय राऊतांचा अमित शाहांवर फंड कलेक्शनचा आरोप; बन यांचा सडेतोड पलटवार
Sanjay Raut Vs Navnath Ban | संजय राऊतांचा अमित शाहांवर फंड कलेक्शनचा आरोप; नवनाथ बन यांचा सडेतोड पलटवार, मुंबई दौऱ्यावरून वार- पलटवार सुरूच
मोठी बातमी! नवनीत राणांच्या वक्तव्यानंतर... भाजपमधील दिग्गज नेते...
मोठी बातमी! नवनीत राणांच्या वक्तव्यानंतर... भाजपमधील दिग्गज नेत्यांमध्ये गैरसमज?
जरांगे पाटलांना मुंबईत धडकण्याआधीच मोठा धक्का!
Manoj Jarange Patil | जरांगे पाटलांना मुंबईत धडकण्याआधीच मोठा धक्का! 19 सप्टेंबरच्या आझाद मैदानावरील आंदोलनाला परवानगी नाकारली
मुंबईत आंदोलनाची परवानगी नाकारताच मनोज जरांगेंचा मोठा निर्णय, आता...
मुंबईत आंदोलनाची परवानगी नाकारताच मनोज जरांगेंचा मोठा निर्णय, आता सलाईन आणि पाणीही...