लातूर हादरलं! UPमधून येऊन कांड केलं, सुटकेसमध्ये डेडबॉडी भरली अन्… पुरावा नसतानाही कसे पकडले 5 आरोपी?

महाराष्ट्रातील लातूर जिल्ह्यातून एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. एका महिलेचा मृतदेह तिरु नदीतून सूटकेसमध्ये सापडलेल्यानंतर खळबळ माजली होती. आता ही महिला कोण आहे? तिची हत्या कोणी केली हे सर्व समोर आले आहे.

लातूर हादरलं! UPमधून येऊन कांड केलं, सुटकेसमध्ये डेडबॉडी भरली अन्... पुरावा नसतानाही कसे पकडले 5 आरोपी?
Latur Police Station
Image Credit source: Tv9 Network
| Updated on: Sep 05, 2025 | 12:38 PM

देशभरतात सतत गुन्हेगारीच्या घटना घडताना दिसत आहेत. उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश या राज्यांमध्ये तर दिवसेंदिवस गुन्हे वाढतच चालले आहेत. या प्रांतातील गुन्हेगार इतर राज्यांमध्ये जाऊन देखील खळबळ माजवत आहेत. असेच काहीसे महाराष्ट्रातील लातूर जिल्ह्यात घडले आहे. लातूरमधील चाकुर-वाढवणा रस्त्यावर असलेल्या पुलाखाली सुटकेस 10 दिवसांपूर्वी एका महिलेचा सडलेला मृतदेह सापडला होता. त्यानंतर लातूरमध्ये खळबळ माजली होती. आता पोलिसांनी अखेर या प्रकरणातील मुख्य आरोपींना अटक केली आहे.

महिलेची ओळख आणि आरोपी

या हत्या प्रकरणाचा आता लातूर पोलिसांनी छडा लावला आहे. कसलाही सुगावा नसताना या हत्या प्रकरणातील आरोपीं पर्यंत पोहचणे अवघड होते मात्र लातूर पोलिसांच्या पाच पथकांनी सलग दहा दिवस रात्रं दिवस प्रयत्न करून पाच आरोपींना अटक केली आहे. हत्या करण्यात आलेली महिला आणि आरोपी ही उत्तर प्रदेशातील रहिवाशी आहेत. पत्नीच्या चारित्र्यावर संशय असल्याने पतीनेच आपल्या मित्रांच्या मदतीने ही हत्या करून पुलावरून नदीत मृतदेह सुटकेस मध्ये भरून फेकून दिला होता.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अमानुष हत्या करण्यात आलेल्या महिलेचे नाव फरीदा खातून (वय 23) असे आहे. तर तिच्या आरोपी 34 वर्षीय पतीचे नाव जिया अल हक असे आहे. तो उदगीर जवळच्या एका कारखान्यात कामाला होता. त्याची पत्नी मुलांना घेऊन काही दिवसापूर्वीच त्याच्याकडे राहायला आली होती. जियाने त्याच्या चार मित्रांच्या मदतीने, सज्जाद जरुल अन्सारी (19), अरबाज जमलू अन्सारी (19), साकीर इब्राहिम अन्सारी (24) आणि आजम अली उर्फ गुड्डू (19) पत्नीची हत्या केली. या 5 ही लोकांना आता अटक करण्यात आली आहे.

वाचा: भारताने डोनाल्ड ट्रम्प यांचे विमान मुंबईत तासभर का थांबवले? पुण्याला जाण्याची का हवी होती परवानगी?

लातूरचे पोलिस अधीक्षक अमोल तांबे यांनी सांगितले की, उदगीरला संशय होता की त्याच्या पत्नीचे शेजाऱ्यासोबत अवैध संबंध आहेत. याच रागातून त्याने आपल्या साथीदारांसह मिळून हत्येचा कट रचला. त्याने आपल्या पत्नीवर प्रथम आपल्या चार मित्रांसह बसून तिचा गळा दाबून खून केला. त्यानंतर मृतदेह सूटकेसमध्ये बंद करून नदीत फेकला, जेणेकरून पुरावे नष्ट होतील.

तपासाची आव्हाने आणि पाच पथके

यानंतर, अतिरिक्त पोलिस अधीक्षक मंगेश चव्हाण यांच्या देखरेखीखाली प्रकरण सोडवण्यासाठी 5 स्वतंत्र पथके तयार करण्यात आली. पहिल्या पथकाने ट्रॉली बॅगच्या पुरवठा साखळीचा तपास केला. त्यांनी कोणत्या दुकानातून आणि कोणी ट्रॉली बॅग खरेदी केली याचा शोध घेतला. दुसऱ्या पथकाने मृतदेहावर सापडलेले कपडे आणि दागिन्यांच्या आधारे उत्पादक आणि दुकानदारांकडे चौकशी केली. तिसऱ्या पथकाने महाराष्ट्र, कर्नाटक आणि गुजरातच्या सीमेलगतच्या जिल्ह्यांमध्ये दाखल झालेल्या सुमारे 300 बेपत्ता आणि 70 अपहरण प्रकरणांचा तपास केला. चौथ्या पथकाने सीसीटीव्ही फुटेज तपासले, मीडिया आणि सोशल मीडियाद्वारे माहिती सामायिक केली, AI तंत्रज्ञानाचा वापर करून मृतक महिलेचे स्केच तयार केले आणि स्थानिक पातळीवर चौकशी केली. पाचव्या पथकाने मानवी गुप्तचर यंत्रणेचा वापर करून माहिती गोळा केली.