AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Latur: आता ‘लालपरी’ धावणार, प्रशासनाच्या एका निर्णयामुळे 5 आगारातील प्रवाशांची होणार वाहतूक

गेल्या 95 दिवसांपासून एसटी कर्मचाऱ्यांचा विविध मागण्यांसाठी संप सुरु आहे. त्यामुळे वाहतूक सेवा ही कोलमडली असून प्रवाशांचे हाल होत आहेत. लातूर विभागातील 5 ही आगारासमोर एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन हे सुरु आहे. मात्र, आता यावर पर्याय काढण्यास सुरवात झाली आहे.

Latur: आता 'लालपरी' धावणार, प्रशासनाच्या एका निर्णयामुळे 5 आगारातील प्रवाशांची होणार वाहतूक
लातूर विभागातील औसा आगारातील लालपरीचे छायाचित्र
| Edited By: राजेंद्र खराडे | Updated on: Jan 31, 2022 | 10:56 AM
Share

लातूर : गेल्या 95 दिवसांपासून एसटी कर्मचाऱ्यांचा विविध मागण्यांसाठी संप सुरु आहे. त्यामुळे वाहतूक सेवा ही कोलमडली असून प्रवाशांचे हाल होत आहेत. लातूर विभागातील 5 ही आगारासमोर  (ST employees ) एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन हे सुरु आहे. मात्र, आता यावर पर्याय काढण्यास सुरवात झाली आहे. (Latur Division) लातूर विभागातील पाचही आगारामध्ये सोमवारपासून लालपरीचे स्टेअरिंग हे (Contractual Employee) कंत्राटी कर्मचाऱ्यांकडे असणार आहे. त्यामुळे काही प्रमाणात का होईना प्रवाशांचा प्रश्न मार्गी लागणार आहे. 33 कंत्राटी कर्मचारी हे सोमवारपासून सेवा बजावणार असले तरी 50 कर्मचाऱ्यांची आता पर्यंत नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे काही दिवसांमध्ये उर्वरीत सेवाही मार्गी लागणार आहे. त्यामुळे गेल्या 95 दिवसांपासून रखडलेला प्रश्न काहीअंशी मार्गी लागणार आहे.

लातूर विभागाला 50 कंत्राटी कर्मचारी

प्रवासी सेवा पुर्ववद करण्यासाठी प्रशासनाचे प्रयत्न सुरु झाले आहेत. त्याच अनुशंगाने लातूर विभागामध्ये 50 कंत्राटी चालकांची नेमणूक केली जाणार आहे. यासंबंधीची भरती प्रक्रिया ही पूर्ण झाली असून 33 कर्मचारी सोमवारपासून सेवा बजवणार आहेत. उर्वरीत 17 जणांचीही लवकरच निवड होणार असल्याचे सांगण्यात आले आहे. कंत्राटी कर्मचाऱ्यांची ज्याप्रमाणात भरती होईल त्यानुसार रस्त्यावर बस धावण्याची संख्या ही वाढणार आहे.

नाशिकच्या खासगी एजन्सीकडून भरती

एसटी कर्मचाऱ्यांचा संप लांबत असला तरी आता वेगळ्या पर्यायांचा विचार केला जात आहे. गेल्या 95 दिवासांपासून प्रवाशी सेवा ही कोलमडलेली आहे. त्यामुळे आता नाशिकच्या एका खासगी एजन्सीकडून चालक भरती करुन घेतले जात आहेत. पहिल्या टप्प्यात 50 कंत्राटी कर्मचाऱ्यांची भरती करण्यात आली आहे. सेवा सुरळीत झाल्यावर यामध्ये अणखीन वाढ होणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

संपकरी कर्मचारी काय भूमिका घेणार?

कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या हाती एसटी स्टेअरिंग गेल्यावर पुन्हा हे संपावर असलेले कर्मचारी काय भूमिका घेणार हे महत्वाचे आहे. मध्यंतरी कर्नाटक आगाराची एसटी ही उदगीर बसस्थानकात दाखल झाली असताना आमचा संप सुरु असताना ही सेवा म्हणजे संपाला काही अर्थ नसल्याची भूमिका कर्मचाऱ्यांनी घेऊन पुन्हा कर्नाटक आगाराची एसटी येण्यास विरोध केला होता. आता प्रशासनाने कंत्राटी कर्मचाऱ्यांचा पर्याय खुला केला आहे पण त्यानंतर या कर्मचाऱ्यांकडून त्याकडे कसे पाहिले जाते हे महत्वाचे आहे.

संबंधित बातम्या :

Damage to Sugarcane: टेम्भापुरी शिवारातील ऊसाला आग, 10 एकरातील ऊस जळून खाक

दुष्काळात तेरावा : 60 एकरातील ऊस जळून खाक, 20 शेतकऱ्यांचे स्वप्न भंगले

Video : काळ्या रंगाच्या फॉर्च्युनर सोबत रेसिंग? गाडीत गाणी वाजवत जल्लोष,वर्धा अपघातापूर्वीचा आणखी एक व्हिडीओ व्हायरल

Follow Us
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया सुळे असं का म्हणाल्या?
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती...
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती होताच उत्तर प्रदेशमध्ये....
दिल्ली सत्यनिकेतनमध्ये पाच मजली इमारत अचानक कोसळली, अनेकजण अडकल्याची..
दिल्ली अचानक कोसळली मोठी इमारत; अनेकजण अडकल्याची भीती, काय घडलं?
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल,
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल, काय घडलं?
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट...
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट... अडचणी वाढणार?
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने..
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने खळबळ
गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक
Vishva Hindu Parishad | गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक; आणखी नियम कोणते?
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत..
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत सुविधांसाठी मागणी
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी...
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी वाहिली आदरांजली