AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Latur Crime : लातूरमध्ये डॉक्टर आणि ट्रॅफिक पोलिसांमध्ये हाणामारी, सिग्नलवरुन झाला वाद

लातूर शहरातले कान-नाक-घसा तज्ज्ञ डॉ. आनंद गोरे हे शिवाजी महाराज चौकातून अंबाजोगाई रस्त्याकडे जात होते. त्या दरम्यान पोलिसांनी ट्रॅफिक सोडले. गाडीसमोर वृद्ध व्यक्ती आल्याने डॉक्टरांनी गाडी तिथेच थांबवली. डॉक्टरांच्या गाडीमुळे ट्राफिक जॅम होत असल्याने पोलिसांनी डॉक्टरांना रागात गाडी काढायला सांगितले. त्यावरून सुरु झालेला वाद, हाणामारीपर्यंत गेला.

Latur Crime : लातूरमध्ये डॉक्टर आणि ट्रॅफिक पोलिसांमध्ये हाणामारी, सिग्नलवरुन झाला वाद
लातूरमध्ये डॉक्टर आणि ट्रॅफिक पोलिसांमध्ये हाणामारी
| Edited By: | Updated on: Mar 01, 2022 | 8:45 PM
Share

लातूर : डॉक्टर (Doctor) आणि ट्रॅफिक पोलीस (Traffic Police) यांच्यामध्ये हाणामारी झाल्याची घटना लातूर शहरातल्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात घडली आहे. या घटनेत डॉक्टरांनी पोलिसांवर मारहाण केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. तर ट्रॅफिक पोलिसांनी डॉक्टर आणि त्यांच्या एका सहकाऱ्यावर शासकीय कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल केला आहे. ट्रॅफिक सिग्नलवरून डॉक्टर आणि दोन पोलीस कर्मचाऱ्यांमध्ये हाणामारी झाली आहे. डॉ. आनंद गोरे असे मारहाण करण्यात आलेल्या डॉक्टरचे नाव आहे. (Clashes between doctors and traffic police in Latur over signal)

ट्रॅफिकवरुन सुरु झालेल्या वादाचे हाणामारीत रुपांतर

लातूर शहरातले कान-नाक-घसा तज्ज्ञ डॉ. आनंद गोरे हे शिवाजी महाराज चौकातून अंबाजोगाई रस्त्याकडे जात होते. त्या दरम्यान पोलिसांनी ट्रॅफिक सोडले. गाडीसमोर वृद्ध व्यक्ती आल्याने डॉक्टरांनी गाडी तिथेच थांबवली. डॉक्टरांच्या गाडीमुळे ट्राफिक जॅम होत असल्याने पोलिसांनी डॉक्टरांना रागात गाडी काढायला सांगितले. त्यावरून सुरु झालेला वाद, हाणामारीपर्यंत गेला. डॉक्टरांनी पोलिसांवर हाणामारीचा आरोप केला आहे. तर दोन ट्रॅफिक पोलिसांनी डॉक्टर आणि त्यांच्या एका सहकाऱ्यांवर शिवीगाळ करीत शासकीय कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल केला आहे. या घटनेनंतर डॉक्टर मोठ्या संख्येने एकत्र आले आणि त्यांनी आज दैनंदिन उपचार बंद ठेवले.

नांदेडमधील सरकारी हॉस्टेलमधील राड्याप्रकरणी 9 विद्यार्थ्यांविरोधात गुन्हे

नांदेड जिल्ह्यातील इस्लापूर इथल्या सरकारी हॉस्टेलमध्ये राडा घालणाऱ्या नऊ विद्यार्थ्यांविरोधात पोलिसांनी गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल केले आहेत. किरकोळ वादातून हॉस्टेलमधील विद्यार्थ्यांच्या दोन गटात परवा जोरदार हाणामारी झाली होती. या दरम्यान अकरावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांनी हॉस्टेलमधील फर्निचर आणि पाच मोटारसायकलची तोडफोड आणि जाळपोळ केली होती. या प्रकरणी आदिवासी हॉस्टेलच्या प्राचार्य यांनी दिलेल्या तक्रारीवरून इस्लापूर पोलीस ठाण्यात गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पोलिस आरोपी विद्यार्थ्यांचा शोध घेत आहेत. (Clashes between doctors and traffic police in Latur over signal)

इतर बातम्या

Nagpur : नागपूरकरांसाठी दिलासा देणारी बातमी, हत्याकांडासाठी कुप्रसिद्ध असलेल्या उपराजधानीत महिनाभरात एकही हत्या नाही

Pune crime| पुण्यात पोलिसांचे कोम्बिंग ऑपरेशन ; 924 गुन्हेगारांची झाडाझडती

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.