Latur Election Results 2026 LIVE: लातूरमधील शक्तिप्रदर्शनाचा फायदा कुणाला? उमेदवारांनी फुंकले रणशिंग, मतदारांचा कौल कुणाला?

Latur Municipal Corporation Election Results 2026 LIVE Updates in Marathi: लातूर महापालिकेत राजकीय भूकंप येण्याची शक्यता आहे. भाजप आणि राष्ट्रवादीतून बाहेर पडलेल्या निष्ठावंतांची आघाडी अनेकांसाठी डोईजड होणार की हे पक्ष निष्ठावंतांवर भारी पडतात हे आता समोर येईल. एका क्लिकवर त्याचे उत्तर समोर येईल.

Latur Election Results 2026 LIVE: लातूरमधील शक्तिप्रदर्शनाचा फायदा कुणाला? उमेदवारांनी फुंकले रणशिंग, मतदारांचा कौल कुणाला?
लातूर महानगरपालिका निवडणूक निकाल
Image Credit source: टीव्ही ९ मराठी
| Edited By: | Updated on: Jan 16, 2026 | 12:27 AM

लातूर महानगरपालिकेत राजकीय भूकंपाची शक्यता वर्तवली जात आहे. सर्वच प्रमुख राजकीय पक्ष आणि अपक्षाांनी आपापल्या प्रभागांत शक्तिप्रदर्शन केले. लातूरमध्ये निवडणूक ज्वर दिसून आला. या निवडणुकीत भाजप आणि राष्ट्रवादीला बंडखोरांनी खरं निवडणुकीचं गणित शिकवलं असं म्हटलं तर वावगं ठरू नये. पालिकेचे निकाल राजकीय भूकंप ठरणार का, याची लातूरमध्ये मोठी चर्चा सुरू आहे. भाजप आणि राष्ट्रवादीतून बाहेर पडलेल्या निष्ठावंतांची आघाडी अनेकांसाठी डोईजड होणार की हे पक्ष निष्ठावंतांवर भारी पडतात हे थोड्याच वेळात समोर येईल. काल मतदानाचा जोष दिसून आला, आता कौल कुणाला मिळाला हे समोर येईल.

2017 मध्ये लातूर महापालिकेत 32 ठिकाणी काँग्रेसचे उमेदवार निवडून आले होते. तर 36 जागांवर भाजपचे कमळ फुलले होते. तर राष्ट्रवादीने एका जागेवर विजय मिळवला होता.यंदा कुणाच्या पारड्यात मतदार कौल देणार? हे आज समोर येईल.लातूर महानगरपालिकेत चार सदस्य असलेल्या प्रभागांची संख्या 16 इतकी आहे. तर तीन सदस्यांची संख्या 02 इतकी आहे. लातूर शहरासाठी एकूण 18 प्रभाग आहेत. या प्रभागात एकूण 70 उमेदवार निवडून द्यायचे आहेत. 70 जागांसाठी 359 उमेदवार रिंगणात उतरलेले होते. प्रमुख राजकीय पक्षांसह अपक्षांनी या निवडणुकीत जोर बैठका लावल्या. त्यामुळे ही निवडणूक चांगलीच चुरशीची झाली होती. या दहा दिवसात प्रचाराला चांगलीच धार आली होती. एकमेकांवर दोन्ही बाजूंनी तुफान शा‍ब्दिक हल्ले झाले होते. तर दुसरीकडे निष्ठावंत आघाडीची या प्रचारात मोठी चर्चा सुरू होती

Live

Municipal Election 2026

10:58 PM

सोलापूरात निकालापूर्वीच किरण देशमुखांच्या विजयाचे बॅनर

09:12 PM

जळगाव : दोन महिलांना यादीत नाव असूनही मतदान करता आले नाही

08:00 PM

BMC Election 2026 Exit Poll Prediction : जेव्हीसीच्या एक्झिट पोलनुसार मुंबईत कोणाला किती जागा?

06:58 PM

एक्झिट पोलनुसार मुंबईत शिवसेना ठाकरे गट, मनसेला धक्का

11:39 PM

ठाणे मानपाडात मतमोजणी केंद्रावर राडा

11:00 PM

राज ठाकरेंच्या जागा कमी येणार, एक्झिट पोलचा अंदाज

प्रभाग क्रमांक 16

गेल्यावेळी प्रभाग क्रमांक 16 मध्ये 4 उमेदवार होते. याप्रभागात गेल्यावेळी भाजपचे वर्चस्व दिसून आले. 2017 मध्ये हनुमान जकाटे, शकुंतला गाडेकर, शितल मालू, अजय कोकाटे हे भाजपचे उमेदवार विजयी झाले होते. या प्रभागात आता कोण धोबीपछाड देणार याची चर्चा सुरू आहे.

प्रभाग 16 मध्ये एकूण 20,288 इतकी लोकसंख्या आहे. या प्रभागात राजस्थान विद्यालय परिसर, सुतगिरणी, बोधे नगर, मोरे नगर, मंत्री नगर, मोती नगर, कडबा मार्केट, कन्हेरी रोड, नाईक चौक, श्रीजी अपार्टमेंट, लमान तांडा, तुळशिधाम, सुतमील नगर, मिनी मार्केटसह इतर परिसराचा यामध्ये समावेश होतो.

प्रभाग क्रमांक 17

प्रभाग क्रमांक 17 मध्ये गेल्यावेळी 2017 मध्ये भाजपचा वरचष्मा होता. या प्रभागात भाजपचे तीन उमेदवार निवडून आले होते. या प्रभागात इतर उमेदवारांना खातं उघडता आलं नाही. सुनील मालवड, शोभा पाटील, चंद्रकांत बिरादार हे भाजपचे उमेदवार निवडून आले होते.

प्रभाग क्रमांक 17 ची एकूण लोकसंख्या 17,970 इतकी आहे. या प्रभागात एलआयसी कॉलनी, कन्हेरी गाव, ज्ञानेश्वर नगर, गुरु हॉटेल, बांधकाम भवन, विराट हनुमान, परिवार सोसायटी, लक्ष्मण नगर, तुळजाभवानी नगर, सुशीलादेवी नगर, खाडगाव ते रिंग रोड, साईरत्न रेसिडेन्सी, सुशीलादेवी नगर, जुना औसा रोड, राजीव गांधी चौक, नांदेड रोडने नाईक चौकपर्यंत, कन्हेरी गावठाण, वासनगाव रोड असा परिसर यामध्ये येतो.

प्रभाग क्रमांकविजयी उमेदवारपक्ष

प्रभाग क्रमांक 18

प्रभाग क्रमांक 18 मध्ये गेल्यावेळी, 2017 मध्ये भाजपने मुसंडी मारली होती. भाजपचेच उमेदवार निवडून आले. या प्रभागात काँग्रेस वा इतर पक्षांना खातं उघडता आलं नाही. या प्रभागात भाजपचे सरिता राजगिरे, भाग्यश्री शेळके, अजित पाटील हे विजयी झाले होते.

प्रभाग क्रमांक 18 ची एकूण लोकसंख्या 15,831 इतकी आहे. या प्रभागात पटेल नगर, माताजी नगर, कातपूर रोड, बसवेश्वर चौक, पोस्ट कॉलनी, शनी मंदिर परिसर, पिनाटे नगर, नंदनवन कॉलनी, मजगे नगर, खंदाडे नगर, टॉवर लाईन, सुजानगिर नगर, शंकरपूरम नगर, कडबा मार्केट, कातपूर रोड, बुरुड समाज वसाहत, कन्हेरी गावाच्या पूर्व बाजूचा परिसर या प्रभागात येतो.

महत्त्वाच्या लिंक्स

महाराष्ट्र निवडणूक निकाल 2026

महाराष्ट्र महापालिका निवडणूक निकाल 2026 मतमोजणीचे लाईव्ह अपडेट्स

बीएमसी महाराष्ट्र निवडणूक निकाल LIVE TV

महाराष्ट्र महानगरपालिकेचा सर्वात वेगवान निकाल पाहा फक्त टीव्ही 9 मराठीवर LIVE

लातूर महापालिका निवडणूक निकाल 2026 LIVE