AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सोशल मीडियावर खोटी माहिती पसरवणाऱ्यांना झटका, सायबर विभागाकडून 218 गुन्हे दाखल, 45 आरोपींना अटक

कोरोनाच्या पार्श्र्वभूमीवर सुरु असलेल्या लॉकडाऊनच्या काळात सोशल मीडियावर काही लोक खोटी माहिती पसवत आहेत (Action against Fake News amid Corona).

सोशल मीडियावर खोटी माहिती पसरवणाऱ्यांना झटका, सायबर विभागाकडून 218 गुन्हे दाखल, 45 आरोपींना अटक
| Updated on: Apr 16, 2020 | 11:28 PM
Share

मुंबई : कोरोनाच्या पार्श्र्वभूमीवर सुरु असलेल्या लॉकडाऊनच्या काळात सोशल मीडियावर काही लोक खोटी माहिती पसवत आहेत (Action against Fake News amid Corona). यात अनेक पोस्टमध्ये दिशाभूल आहे, तर काही पोस्टमध्ये कोरोनाच्या या संकटाला धार्मिक वळण देण्याचाही प्रयत्न केला जात आहे. काही गुन्हेगार व समाजकंटक या परिस्थितीचा गैरफायदा घेण्याचा प्रयत्न करत आहेत. यावर महाराष्ट्र सायबर विभागाने कठोर पाऊले उचलली आहेत. आत्तापर्यंत राज्यात या प्रकरणी 218 गुन्हे दाखल झाले आहेत, तर 45 आरोपींना अटक करण्यात आली आहे, अशी माहिती महाराष्ट्र सायबर विभागाने दिली.

टिकटॉक, फेसबुक, ट्विटर आणि अन्य सोशल मीडियावर चालणाऱ्या गैरप्रकारांसंदर्भात राज्यातील विविध पोलिस स्टेशनमध्ये 218 गुन्ह्यांची नोंद झाली आहे. त्यापैकी 8 गुन्हे अदखलपात्र (N.C) आहेत. त्यामध्ये बीड 26, कोल्हापूर 15, पुणे ग्रामीण 15, जळगाव 13, मुंबई 12, सांगली 10, जालना 9, नाशिक ग्रामीण 9, सातारा 8, नांदेड 7, परभणी 7, नाशिक शहर 7, ठाणे शहर 6, नागपूर शहर 5, सिंधुदुर्ग 5, नवी मुंबई 5, सोलापूर ग्रामीण 5, बुलढाणा 4, पुणे शहर 4, लातूर 4, गोंदिया 4, सोलापूर शहर 3, रायगड 2, उस्मानाबाद 2, ठाणे ग्रामीण 1, धुळे 1 यांचा प्रामुख्याने समावेश आहे.

कोणत्या गुन्ह्यात किती गुन्हे दाखल?

यात आक्षेपार्ह व्हॉट्सअॅप मेसेजेस फॉरवर्ड केल्याप्रकरणी 102 गुन्हे, आक्षेपार्ह फेसबुक पोस्ट्स शेअर केल्याप्रकरणी 71 गुन्हे, टिकटॉक व्हिडीओ शेअर प्रकरणी 2 गुन्हे आणि ट्विटरद्वारे आक्षेपार्ह ट्विटकेल्या प्रकरणी 3 गुन्हे दाखल झाले आहेत. अन्य सोशल मीडियाचा (ऑडिओ क्लिप्स, युट्युब) गैरवापर केल्याप्रकरणी 38 गुन्हे दाखल झाले आहेत.

नाशिक ग्रामीण

नाशिक ग्रामीण अंतर्गत सटाणा पोलिस स्टेशनमध्ये एका गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. आरोपीने एका लिंकवरील खोट्या बातमीद्वारे “कोरोनाच्या भीतीमुळे मालेगावमधील लोकांचे लोंढे सटाण्यात येणार” अशा मजकुराची बातमी व्हॉट्सअॅपवर आणि अन्य समाज माध्यमांवर पसरवून शांतता बिघडवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे.

ठाणे शहर-भिवंडी

ठाणे शहर व भिवंडीमध्येही अन्य एका गुन्ह्यांची नोंद करण्यात आली. आरोपीने व्हॉट्सअॅप व समाजमाध्यमांचा वापर करून कोरोना महामारीबद्दल चुकीची माहिती पसरवली. त्याद्वारे कोरोना महामारीचा प्रसार रोखणासाठी सुरु असलेल्या कामात अडथळा निर्माण केल्याचा त्याच्यावर आरोप आहे.

नागिरकांना आवाहन

महाराष्ट्र सायबर विभागाने सोशल मीडियावापराबाबत नागरिकांना आवाहन केलं आहे.

“सोशल मीडियाचा (facebook, Twitter, Instagram etc) वापर जपून व तारतम्य बाळगून करावा. एखादी बातमी किंवा माहिती तुमच्या वाचनात किंवा पाहण्यात आली तरी त्या बातमीची व माहितीची खात्री व सत्यता पडताळूनच त्यावर आपली प्रतिक्रिया द्यावी. तसेच अशा पोस्ट्सवर आपल्या प्रतिक्रिया चिथावणीखोर नाहीत याची खात्री करावी. आपल्या प्रतिक्रियेचा विपर्यास व चुकीचा अर्थ निघून कोणत्याही कायद्याचे किंवा सरकारी आदेशाचे उल्लंघन होणार नाही याची दक्षता घ्यावी.”

कोणीही अफवा व खोट्या बातम्या व्हॉट्सअॅप किंवा अन्य समाज माध्यमांवर (social media)पसरवू नयेत. अशा बातम्यांवर विश्वास ठेवू नये. तसेच काही मदत लागल्यास जवळच्या पोलिस स्टेशनला संपर्क साधावा. केंद्र सरकार व राज्य सरकार वेळोवेळी ज्या नियमावली प्रसारित करत असतात त्याचे पालन करावे. कृपया घरीच थांबावे व कारण नसल्यास घराच्या बाहेर पडू नये, असंही या आवाहनात नमूद करण्यात आलं आहे.

संबंधित बातम्या :

चिमुकल्यापासून आजीबाईंपर्यंत कोरोनाशी यशस्वी लढा, राज्यात कोठे किती रुग्ण बरे?

Corona : पुणे विभागात 518 कोरोनाबाधित, आतापर्यंत 47 जणांचा बळी

20 जिल्ह्यांमध्ये कोरोनाचा संसर्ग नाही, काही अटींसह उद्योग सुरु करण्यासाठी उद्योग मंत्र्यांचे प्रयत्न

कोरोना नियंत्रणाचं काम करणाऱ्या खासगी डॉक्टरांनाही विमा संरक्षण द्या : खासदार राहुल शेवाळे

‘झूम’ व्हिडिओ कॉन्फरन्सिंग अॅप सुरक्षित नाही, केंद्रीय गृह मंत्रालयाकडून धोक्याचा इशारा

घर खाली करणे, बांधकाम तोडणे या कारवायांना स्थगिती, मुंबई उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय

Maharashtra Cyber cell action against Fake News amdi Corona

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.