कोरोना नियंत्रणाचं काम करणाऱ्या खासगी डॉक्टरांनाही विमा संरक्षण द्या : खासदार राहुल शेवाळे

कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर घरोघरी जाऊन काम करणाऱ्या खासगी डॉक्टरांना देखील विमा संरक्षण द्यावे, अशी लेखी मागणी शिवसेनेचे खासदार राहुल शेवाळे यांनी केली आहे (insurance protection to private doctors amid corona).

कोरोना नियंत्रणाचं काम करणाऱ्या खासगी डॉक्टरांनाही विमा संरक्षण द्या : खासदार राहुल शेवाळे

मुंबई : कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर, घरोघरी जाऊन चाचणी करणाऱ्या आणि ‘कम्युनिटी क्लिनिक’च्या माध्यमातून काम करणाऱ्या खासगी डॉक्टरांना देखील पीपीई किट, वैद्यकीय उपकरणांसह विमा संरक्षण द्यावे, अशी लेखी मागणी शिवसेनेचे खासदार राहुल शेवाळे यांनी केली आहे (Rahul Shewale on private doctors working for corona prevention). त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून याबाबतची मागणी केली आहे.

आपल्या पत्रात खासदार शेवाळे यांनी कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रभावी उपाययोजनांची त्वरित अंमलबजावणी केल्याबद्दल राज्य सरकारचे आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आभार मानले आहेत. खासदार शेवाळे यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे की, कोरोना संकटामुळे प्रशासकीय यंत्रणेवर मोठा ताण आहे. या परिस्थितीत राज्य सरकार आणि पालिका प्रशासनाच्या मोहिमेत सहभागी होण्याचे आवाहन मी माझ्या मतदारसंघातील खासगी डॉक्टरांना केले होते. या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देत, ‘इंडियन मेडिकल कौन्सिल’, ‘महाराष्ट्र मेडिकल कौन्सिल’ आणि अनेक स्थानिक डॉक्टर्स संघटनांनी ‘कम्युनिटी क्लिनिक’च्या माध्यमातून पालिका प्रशासनाच्या मोहिमेत सहभागी होण्याची तयारी दाखविली.”

अनेक खासगी डॉक्टर्स पालिकेच्या समन्वयातून घरोघरी जाऊन नागरिकांच्या चाचण्या करत आहेत. सामाजिक बांधिलकी जपत हे खासगी डॉक्टर्स पालिकेच्या समन्वयातून, धारावी, अँटॉप हिल्स, चिता कॅम्प, एम पूर्व-पश्चिम, एफ आणि जी प्रभागांमध्ये कार्यरत आहेत. कोरोनाबाबत कार्य करणाऱ्यांना विमा कवच देण्याची घोषणा केंद्र सरकारच्यावतीने करण्यात आली आहे. तसेच राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांनाही विमा संरक्षण आहे. त्याचसोबत, कोरोना युद्धाचा सामना करणाऱ्या खासगी डॉक्टरांनाही विमा संरक्षण द्यावे. विम्याबरोबरच खासगी डॉक्टरांना पीपीई किट आणि वैद्यकीय उपकरणे देण्याची मागणीही खासदार शेवाळे यांनी केली आहे.

संबंधित बातम्या :

घर खाली करणे, बांधकाम तोडणे या कारवायांना स्थगिती, मुंबई उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय

Corona : सोलापुरात कोरोनाबाधित महिलेच्या संपर्कातील 10 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह

मुंबईतील आठ वॉर्डमध्ये शंभरपेक्षा जास्त ‘कोरोना’ग्रस्त, तुमच्या वॉर्डमध्ये किती?

कोरोनाला रोखण्याठी केवळ लॉकडाऊन उपाय नाही, टेस्टिंग वाढवा : राहुल गांधी

Corona | उद्धव ठाकरे सरकार फेल, महाराष्ट्रात लष्कर बोलवा : नारायण राणे

Rahul Shewale on private doctors working for corona prevention

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *