पाथर्डी तालुक्यात बिबट्याच्या हल्ल्यामध्ये महिनाभरात 3 चिमुकल्यांचा मृत्यू, वनविभागाच्या कर्मचाऱ्यांवर दारु पार्टीचा आरोप

पाथर्डी तालुक्यात गेल्या महिनाभरापासून बिबट्याची दहशत पाहायला मिळत आहे. बिबट्याने केलेल्या हल्ल्यात एका महिन्यात 3 तीन चिमुकल्याचा जीव गेला आहे. महत्वाची बाब म्हणजे चिमुकल्याचा शोध घेण्याऐवजी वनविभागाचे कर्मचारी रात्री दारु पार्टीत दंग असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते मुकुंद गर्जे यांनी केला आहे.

पाथर्डी तालुक्यात बिबट्याच्या हल्ल्यामध्ये महिनाभरात 3 चिमुकल्यांचा मृत्यू, वनविभागाच्या कर्मचाऱ्यांवर दारु पार्टीचा आरोप
Follow us
| Updated on: Oct 30, 2020 | 11:22 AM

अहमदनगर: अहमदनगरच्या पाथर्डी तालुक्यात बिबट्याची दहशत पाहायला मिळत आहे. गेल्या महिनाभरात बिबट्याच्या हल्ल्यात 3 चिमुकल्यांचा मृत्यू झाला आहे. गुरुवारी रात्री बिबट्याने एका 4 वर्षाच्या चिमुकल्याला शिरपूर परिसरातील कराड वस्ती इथून उचलून नेलं आहे. सार्थक बुधवंत असं त्या चिमुकल्याचं नाव आहे. परिसरात चिमुकल्याचा शोध घेण्यात येत आहे, मात्र अद्याप त्याचा शोध लागलेला नाही. (Leopard kills 3 children in Pathardi taluka in 1 month)

पाथर्डी तालुक्यात गेल्या महिनाभरापासून बिबट्याची दहशत पाहायला मिळत आहे. बिबट्याने केलेल्या हल्ल्यात एका महिन्यात 3 तीन चिमुकल्याचा जीव गेला आहे. 15 ऑक्टोबरला उषा साळवे या साडे तीन वर्षाच्या चिमुकलीचा मृत्यू झाला होता. 22 ऑक्टोबरला 8 वर्षीय सक्षम आठरे तर 29 ऑक्टोबरला सार्थक बुधवंत या चिमुकल्याला बिबट्यानं पळवून नेले आहे. त्याचा शोध अद्याप सुरु आहे. बिबट्या लहान मुलांवर हल्ला चढवत असल्यानं परिसरात मोठी दहशत निर्माण झाली आहे. परिसरातील नागरिक वनविभागाच्या कारभारावर संताप व्यक्त करत आहेत. महत्वाची बाब म्हणजे चिमुकल्याचा शोध घेण्याऐवजी वनविभागाचे कर्मचारी रात्री दारु पार्टीत दंग असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते मुकुंद गर्जे यांनी केला आहे. तर या नरभक्षक बिबट्याचा लवकरात लवकर शोध घेऊन जेरबंद करण्याची मागणी नागरिक करत आहेत.

नातवावरचा वार आजीने झेलला, टोपलीने मारुन बिबट्याला पळवलं!

यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड तालुक्यातील चालगणी येथील धुरपताबाई सातलवाड ही महिला आपला नातू रितेश सोबत शेतातील सोयाबीन काढण्यासाठी जात होती. त्याच वेळी बाजूला असलेल्या ऊसाच्या शेतात दबा धरून बसलेल्या बिबट्याने अचानक लहानग्या रितेशवर हल्ला केला. त्यावेळी कोणतीही भीती न बाळगता धुरपताबाईंनी हातातील टोपले बिबट्यावर फेकले.आजींनी केलेल्या प्रतिहल्ल्यानंतर चवताळलेल्या बिबट्याने नातवाला सोडून आजींवर हल्ला केला. बिबट्याने आजींच्या मानेवर पंजाने वार केला. तसेच जबड्याने त्यांच्या हाताचा लचका तोडला. बिबट्याच्या हल्ल्यामुळे आजी विव्हळल्या. तिथे आरडाओरड सुरु झाली. त्यामुळे आजूबाजूच्या शेतशिवारातील लोक एकत्र आले. काहींनी लगेच आजींकडे धाव घेतली. लोकांची मोठी गर्दी झालेली पाहून बिबट्या घाबरला. लोक बिबट्यावर हल्ला करणार एवढ्यात बिबट्या तिथून पळून गेला. बिबट्याच्या या हल्ल्यामुळे आसपासच्या परिसरातील शेतकरी वर्गात दहशतीचे वातावरण आहे. पण आजींच्या साहसाचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.

संबंधित बातम्या:

अहमदनगरमध्ये बिबट्याच्या हल्ल्यात 8 वर्षाच्या मुलाचा मृत्यू, 10 दिवसातील दुसरी घटना

PHOTO : वन्यजीव प्रेमींसाठी आनंदाची बातमी, ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पात बिबट्याच्या जोडीचं दर्शन

घराजवळ खेळताना बिबट्याची झडप, नगरमध्ये चिमुकलीचा मृत्यू

Leopard kills 3 children in Pathardi taluka in 1 month

Non Stop LIVE Update
बारामतीत मतदानाच्या आदल्या रात्री..अमोल कोल्हेंचं निवडणूक आयोगाला पत्र
बारामतीत मतदानाच्या आदल्या रात्री..अमोल कोल्हेंचं निवडणूक आयोगाला पत्र.
तर धनुष्यबाणावर विरोधात निवडणूक लढवणार, किरण सामंत यांचा इशारा कुणाला?
तर धनुष्यबाणावर विरोधात निवडणूक लढवणार, किरण सामंत यांचा इशारा कुणाला?.
ठाकरेंवर मानसिक परिणाम, त्यांना.., भाजपच्या बड्या नेत्याचा हल्लाबोल
ठाकरेंवर मानसिक परिणाम, त्यांना.., भाजपच्या बड्या नेत्याचा हल्लाबोल.
लोकसभा निवडणुकीत केजरीवालांना दिलासा, तिहार तुरुंगातून येणार बाहेर
लोकसभा निवडणुकीत केजरीवालांना दिलासा, तिहार तुरुंगातून येणार बाहेर.
मोदींच्या ऑफरवर शरद पवारांचं उत्तर, म्हणाले, ... हे माझं स्पष्ट मत
मोदींच्या ऑफरवर शरद पवारांचं उत्तर, म्हणाले, ... हे माझं स्पष्ट मत.
सगळी स्वप्न पूर्ण होतील, फक्त... मोदींची ठाकरे-पवारांना भर सभेतून ऑफर
सगळी स्वप्न पूर्ण होतील, फक्त... मोदींची ठाकरे-पवारांना भर सभेतून ऑफर.
... तर तुम्हीच औरंगजेबाचे वंशज, संजय राऊतांची मोदींवर घणाघाती टीका
... तर तुम्हीच औरंगजेबाचे वंशज, संजय राऊतांची मोदींवर घणाघाती टीका.
प्रियंका चतुर्वेदींनी केलेल्या 'त्या' टीकेवर मुख्यमंत्री म्हणाले.....
प्रियंका चतुर्वेदींनी केलेल्या 'त्या' टीकेवर मुख्यमंत्री म्हणाले......
नकली संतान... मोदींच्या टीकेवर ठाकरे म्हणाले, बेअकली माणसा तेव्हा लाज
नकली संतान... मोदींच्या टीकेवर ठाकरे म्हणाले, बेअकली माणसा तेव्हा लाज.
ब्रेक घेतोय... कोल्हेंचा 5 वर्ष अभिनयातून संन्यास, का घेतला निर्णय?
ब्रेक घेतोय... कोल्हेंचा 5 वर्ष अभिनयातून संन्यास, का घेतला निर्णय?.