PHOTO : वन्यजीव प्रेमींसाठी आनंदाची बातमी, ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पात बिबट्याच्या जोडीचं दर्शन
मांजरवर्गीय वन्यजीव प्रकारातील सर्वात चपळ, वेगवान आणि घातक असलेला बिबट्या क्वचितच कॅमेराबद्ध होतो (Leopard pair spotted at Tadoba-Andhari Tiger Reserve).

मांजरवर्गीय वन्यजीव प्रकारातील सर्वात चपळ, वेगवान आणि घातक असलेला बिबट्या क्वचितच कॅमेराबद्ध होतो. त्यातही बिबट्याची जोडी कॅमेराबद्ध होणे म्हणजे अतिदुर्मिळ. मात्र, पट्टेदार वाघांसाठी प्रसिद्ध असलेल्या चंद्रपूरच्या ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पात बिबट्याच्या जोडीने दिलेले मनसोक्त दर्शन सध्या चर्चेचा विषय ठरला आहे.
- डॉक्टर दिलीप वर्मा देशातील अनेक वन्यजीव अभयारण्यात जाऊन छायाचित्रण करत असतात. मात्र त्यांच्यासाठी देखील बिबट्या कॅमेऱ्यात कैद होणे, दीर्घकाळपर्यंत दर्शन देणे दुर्मिळ गोष्ट होती. ताडोबातील या बिबट्याच्या जोडीच्या दर्शनाने पर्यटक, वन्यजीव प्रेमी आनंदले आहेत. सध्या ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पात पर्यटन हंगामाला सुरुवात झाली आहे.
- मांजरवर्गीय वन्यजीव प्रकारातील सर्वात चपळ, वेगवान आणि घातक असलेला बिबट्या क्वचितच कॅमेराबद्ध होतो. त्यातही बिबट्याची जोडी कॅमेराबद्ध होणे म्हणजे अतिदुर्मिळ. मात्र, पट्टेदार वाघांसाठी प्रसिद्ध असलेल्या चंद्रपूरच्या ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पात बिबट्याच्या जोडीने दिलेले मनसोक्त दर्शन सध्या चर्चेचा विषय ठरला आहे.
- छत्तीसगडच्या रायपूर येथील वन्यजीव प्रेमी डॉ. दिलीप वर्मा वाघांच्या दर्शनासाठी ताडोबात पोहोचले खरे मात्र त्यांना आपल्या सफारीदरम्यान ताडोबाचे दर्शन झाले नाही. निराश होऊन प्रकल्पातून परतत असताना त्यांना एका वळणावर बिबट्याची ही जोडी मनसोक्त विहार करताना दिसली.
- या काळात चार प्रसिद्ध वाघिणी आपल्या बछड्यांसह पर्यटकांना दर्शन देत आहेत. त्यातच आता बिबट्याच्या जोडीने दर्शन दिल्याने ताडोबातील सफारीचा आनंद मात्र द्विगुणीत झाला आहे.
- बिबट्या अत्यंत चपळ- वेगवान आणि लाजाळू असल्याने तो सहसा कॅमेराबद्ध करता येत नाही. माणसाची थोडीही चाहूल लागली तर हा झुडुपात, जंगलात पसार होतो. मात्र दिवसाढवळ्या बिबट्याच्या जोडीने दिलेले मनसोक्त दर्शन वन्यजीव प्रेमींसाठी आनंदाचा क्षण आहे. तब्बल अर्धा तास या बिबट्याच्या जोडीने वर्मा कुटुंबीयांना दर्शन दिले.
Non Stop LIVE Update