Leopards attack : दोन विविध घटनात बिबट्यांचा चिमुकल्यांवर हल्ल्याचा प्रयत्न, परंतू, आई आणि आजीने हल्ला असा परतवून लावला
अवघ्या तीन दिवसात या भागात दुसऱ्यांदा चिमुकल्यांवर बिबट्याने हल्ला केल्याने परिसरात भीतीचे वातावरण आहे. मात्र दोन्ही वेळेसे आईने दाखवलेल्या धैर्याचं सर्वत्र कौतुक होत आहे.

राज्यातील ग्रामीण भागात बिबट्याचे मनुष्यवस्तीत घुसून हल्ले सुरुच आहेत. त्यामुळे ग्रामीण भागात दहशत पसरली आहे. बिबटे आणि मानव असा संघर्ष सुरु झाला आहे. पुण्याच्या खेड तालुक्यातील एका चिमुकल्यावर बिबट्याने हल्ला केला, परंतू धाडसी आईने वाघीणीचे रुप धारण करीत हा हल्ला परतवून लावत आपल्या चिमुकल्याला वाचवण्याची घटना घडली आहे.
अवघ्या तीन दिवसात या भागात दुसऱ्यांदा चिमुकल्यावर बिबट्याने हल्ला केल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. मात्र दोन्ही वेळेसे आईने दाखवलेले धैर्य सर्वत्र कौतुकास्पद ठरत आहे. ताज्या घटनेत पुण्यातील खेड तालुक्यातील निमगाव रेटवडी परिसरातील बिबट्याने एका चिमुकल्यावर अचानक हल्ला केला. परंतू आईने प्रसंगावधान दाखवत वाघीणीचे रुप धारण केले. आपल्या या लेकराने रक्षण करत आईने बिबट्यावर झेप घेतली आणि लेकराला या हिंस्र बिबट्याच्या तोंडातून वाचवले.
पालघरच्या मोखाडा तालुक्यातील खोच ग्रामपंचायतीच्या हद्दीतील पिपंळपाडा येथील संकेत सुनिल भोये ( वय ९ ) हा सकाळी सहा वाजता शेकोटी पेटवण्यासाठी घराच्या कोपऱ्यात बसला असताना त्याच्यावर बिबट्याने हल्ला करण्याचा प्रयत्न केला. परंतू दारात बसलेल्या त्याची आजी आणि कुटुंबियांनी आरडाओरडा केल्याने बिबट्याने पळ काढल्याची घटना घडली आहे.
बिबट्या घाबरुन पळाला…
संकेत सुनिल भोये हा नऊ वर्षांचा मुलगा अंगणात शेकोटी पेटवण्यासाठी घराच्या कोपऱ्यात बसला होता. त्यानंतर त्याची आजी आणि कुटुंबियांनी आरडा ओरडा केल्यानंतर हा बिबट्या घाबरुन पळून गेल्याची घटना घडली. पळताना संकेतच्या गुडघ्याला जखम झाली आहे. बिबट्याच्या या हल्ल्यामुळे संकेतचे कुटुंबिय भीतीच्या छायेत वावरत आहेत.
बिबट्यांना आवरायचं कसं ?
राज्यात नगर, पुणे जिह्यातील काही भागात बिबट्यांचे मनुष्यवस्तीत आक्रमण सुरु आहे. या बिबट्या आणि मनुष्य संघर्षावर काय तोडगा काढावा यावर शासन विचार करत आहेत. या बिबट्यांची नसबंदी करण्याचा प्रस्तावही पुढे आला आहे. परंतू हा प्रस्ताव कितपत यशस्वी होतो याकडे सांशकतेने पाहिले जात आहे. कारण तेवढी यंत्रणा वनविभागाकडे नसल्याचे म्हटले जात आहे. तसेच बिबट्या सारख्या प्राण्याचा एकच ठिकाणा नसतो. त्याला पकडून नसबंदी करणे वाटते तितके सोपे नसल्याचे म्हटले जात आहे.
