AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मतांच्या गणितात आम्ही कमी आहोत, त्यामुळे..ठाकरे गटाच्या नेत्याकडून प्रामाणिकपणे वास्तवाची कबुली

Vidhan Parishad Election : एकनाथ शिंदेंची शिवसेना आमची पहिली शत्रू आहे, त्यामुळे समोर भाजपचा उमेदवार असेल तर त्याला मदत करणार का? 'संजय राऊत आमचे नेते आहेत ते जे बोलले त्यावर मी बोलू इच्छित नाही' असं उत्तर त्यांनी दिलं.

मतांच्या गणितात आम्ही कमी आहोत, त्यामुळे..ठाकरे गटाच्या नेत्याकडून प्रामाणिकपणे वास्तवाची कबुली
Anil Kadam
| Updated on: Jun 03, 2026 | 12:26 PM
Share

कधीकाळी नाशिक हा शिवसेनेचा बालेकिल्ला समजला जायचा. पण आता या गडाला खिंडार पडलं आहे. 2022 साली शिवसेनेत दोन गट पडल्यानंतर नाशिकमध्ये मोठ्या प्रमाणात फाटाफूट झाली. आता नाशिकमध्ये शिवसेनेचा एक मोठा गट एकनाथ शिंदेंकडे आहे तर उद्धव ठाकरे यांच्यासोबतही शिवसैनिक आहेत. सध्या राज्यात स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. त्यावरुन राजकारण तापलं आहे. महायुती एकत्रित हा निवडणूक लढवत असून 17 पैकी 17 जागा ते जिंकतील अशी स्थिती आहे. त्यावेळी महाविकास आघाडी देखील निवडणूक लढवत आहे. उद्धव ठाकरे हे मविआचा भाग आहेत. नाशिकमध्ये उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने उमेदवार दिलेला नाही. नाशिकमधून माजी आमदार अनिल कदम विधान परिषदेची निवडणूक लढवण्यास इच्छुक होते, अशी चर्चा आहे.

त्यांच्याशी टीव्ही 9 मराठीने संवाद साधला आहे. “निवडणूक आणि वास्तव हे सर्वश्रुत आहे. मतांच्या गणितात आम्ही कमी आहोत. घोडेबाजार आणि निवडणुका हे एक समीकरण झालय” असं अनिल कदम म्हणाले. “कार्यकर्ता, व्हिजन, दृष्टी ती आता लोप पावत चालली आहे असं मला वाटतं” असं कदम म्हणाले. मातोश्रीवरुन तुम्हाला उमेदवारी घ्या असं सांगण्यात आलं होतं, पण तुम्ही माघार घेतली. त्यावर अनिल कदम बोलले की, “मातोश्री आणि माझं नातं वेगळं, अनोखं आहे. ते ऋणानुबंध कायम राहतील”

भाजपचा उमेदवार असेल तर त्याला मदत करणार का?

एकनाथ शिंदेंची शिवसेना आमची पहिली शत्रू आहे, त्यामुळे समोर भाजपचा उमेदवार असेल तर त्याला मदत करणार का? ‘संजय राऊत आमचे नेते आहेत ते जे बोलले त्यावर मी बोलू इच्छित नाही’ असं उत्तर त्यांनी दिलं. मग, नगरसेवकांनी मतदान कोणाला करायचं, ‘ते आम्ही सर्व मिळवून ठरवू’ असं उत्तर कदम यांनी दिलं. उमेदवारी दिली नाही, म्हणून अनिल कदम नाराज आहेत असं बोललं जात होतं. “आयुष्यात शिवसेनेने मला सर्वकाही दिलं. राजकारणात चढ-उतार हे नेहमी येत असतात. मला निफाड मतदारसंघ ग्रामीण भागातला कार्यकर्ता म्हणून उद्धवजींनी शिवसेनाप्रमुख असताना भरपूर प्रचंड प्रेम दिलं. ते प्रेम खूप काळ राहिलं. निवडणुका येतील, जातील, जय-पराजय हे माणसाच्या आयुष्यात हे चालू असतं” असं अनिल कदम म्हणाले.

गीते मित्र आहे पण

“सारासार विचार करून अर्ज दाखल केला नाही. प्रामाणिक शिवसेनेचा कार्यकर्ता आहे. शहरी करणाचे राजकारण आत्ताच आमच्याकडे येत आहे. गीते मित्र आहे पण त्याचा तुम्हाला काय अर्थ काढायचा तो काढा” असं अनिल कदम म्हणाले. “उद्धव ठाकरे यांच्यासोबत काय बोलणं झालं हे सांगू शकत नाही. व्ही चे दोन अर्थ असतात, आकडे कोणते जुळले नाही हे तुम्हाला माहित आहे. घोडेबाजार होतो हे सर्वश्रुत आहे. केशव पोरजेही मित्र आहेत. मी नाराज नाही. पक्षाने मला खूप काही दिले. चार वेळेला आमदारकीची उमेदवारी दिली.जिल्हा परिषदेची जबाबदारी दिली होती” असं त्यांनी सांगितलं.

Follow Us
मातोश्रीवर या आणि पश्चाताप व्यक्त करा; राऊतांनी कुणाला दिल निमंत्रण?
मातोश्रीवर या आणि पश्चाताप व्यक्त करा; राऊतांनी कुणाला दिल निमंत्रण?.
सिद्धिवनायक मंदिरात भाविकांची गर्दी! अधिक महिन्यातील संकष्टी चतुर्थीला
सिद्धिवनायक मंदिरात भाविकांची गर्दी! अधिक महिन्यातील संकष्टी चतुर्थीला.
शिंदे गटच आमचा पहिल्या क्रमांकाचा शत्रू, संजय राऊत कडाडले
शिंदे गटच आमचा पहिल्या क्रमांकाचा शत्रू, संजय राऊत कडाडले.
अखेर प्रकरण पेटलंच! नवी मुंबईत विरोधकांचं तीव्र आंदोलन, रोहित पवारांसह
अखेर प्रकरण पेटलंच! नवी मुंबईत विरोधकांचं तीव्र आंदोलन, रोहित पवारांसह.
सावधान! अशुद्ध खाद्यपदार्थांवर ब्रँडेड टॅग? छापा टाकताच फॅक्टरीत भयंकर
सावधान! अशुद्ध खाद्यपदार्थांवर ब्रँडेड टॅग? छापा टाकताच फॅक्टरीत भयंकर.
महागाईविरोधात पवारांच्या राष्ट्रवादीचा एल्गार! नवी मुंबईत रस्त्यावर...
महागाईविरोधात पवारांच्या राष्ट्रवादीचा एल्गार! नवी मुंबईत रस्त्यावर....
नागरिकांनो पुढील 48 तास महत्त्वाचे! पावसामुळे अंधेरीसह उपनगरीय भागात..
नागरिकांनो पुढील 48 तास महत्त्वाचे! पावसामुळे अंधेरीसह उपनगरीय भागात...
अखिल भारतीय महापौर परिषदेच्या अध्यक्षपदी रितू तावडेंची वर्णी
अखिल भारतीय महापौर परिषदेच्या अध्यक्षपदी रितू तावडेंची वर्णी.
कोल्हापूर हादरलं! बॉयफ्रेंडसह 4 जणांचं तरुणीसोबत भयंकर कृत्य,
कोल्हापूर हादरलं! बॉयफ्रेंडसह 4 जणांचं तरुणीसोबत भयंकर कृत्य,.
एका क्षणात होत्याचं नव्हतं!; एसटीच्या भीषण अपघाताने महाराष्ट्र हादरला
एका क्षणात होत्याचं नव्हतं!; एसटीच्या भीषण अपघाताने महाराष्ट्र हादरला.