Voter ID Card नाही, चिंता नको बिनधास्त करा मतदान, यापैकी एक कागदपत्र देखील पुरेसे

18 व्या लोकसभेसाठी मतदान सुरु आहे. उद्या सोमवारी मतदानाचा पाचवा टप्पा आहे. तुमच्याकडे जर निवडणूक ओळखपत्र नसेल तरी तुम्हाला मतदानाचा हक्क बजावता येऊ शकतो. मतदार ओळखपत्राशिवाय इतरही अनेक सरकारी कागदपत्रे आहेत जी मतदानाची परवानगी मिळवण्यासाठी दाखविली जाऊ शकतात...

Voter ID Card नाही, चिंता नको बिनधास्त करा मतदान, यापैकी एक कागदपत्र देखील पुरेसे
Lok Sabha Election 2024Image Credit source: TV9MARATHI
Follow us
| Updated on: May 19, 2024 | 5:11 PM

18 व्या लोकसभेसाठी देशात मतदान सुरु आहे. देशात लोकसभा ( 2024 ) निवडणूकीसाठी एकूण आठ टप्प्यात मतदान होत आहे. मतदानाची प्रक्रिया 19 एप्रिलपासून सुरू झाली आहे. पाचव्या टप्प्याचे मतदान उद्या सोमवार 20 मे रोजी आहे. देशातील प्रत्येक नागरिकाने मतदानाचा अधिकार बजावला पाहीजे. तुमचे वय 18 वर्षे किंवा 18 वर्षांपेक्षा जास्त असेल आणि तुम्ही मतदानासाठी सज्ज असाल तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे. मतदान करण्यासाठी मतदारांकडे ( Voter ID Card ) मतदार ओळखपत्र असणे आवश्यक आहे, कारण मतदान केंद्रावर जाऊन मतदान करण्यापूर्वी मतदार ओळखपत्र दाखवावे लागते. मतदार ओळखपत्राद्वारे मतदारांची ओळख होते. त्यांच्या जागी दुसरा कोणीही व्यक्ती मतदान करु नये यासाठी ओळखपत्र गरजेचे असते. परंतू तुमचे ओळखपत्र आलेले नाही किंवा गहाळ झाले आहे तरीही तुम्ही मतदानाचा घटनादत्त अधिकार बजावू शकता. पाहा कसे ?

जर तुम्ही नवीन मतदान ओळखपत्रासाठी अर्ज केला आहे. ( मतदार कार्ड ऑनलाइन 2024 लागू करा ), परंतु मतदार ओळखपत्र (नवीन मतदार ओळखपत्र लागू करा) तुमच्याकडे आलेले नाही, तर तुम्ही काय करावे ? मतदानाच्या वेळी मतदार ओळखपत्र हरवले किंवा तुम्ही मतदान केंद्रावर तुमचे मतदार ओळखपत्र घेऊन जायला विसरलात तर तुम्हाला मतदान करता येणार की नाही ? तरीही मतदान करता येईल का?

 सरकारी ओळखपत्रांद्वारे मतदान करा

मतदार ओळखपत्रा व्यतिरिक्त काही सरकारी कागदपत्रे दाखवून मतदान करण्याची परवानगी आहे का ? याचे उत्तर आहे… होय. जर तुम्ही नोंदणीकृत मतदार असाल तर तुम्ही मतदान ओळखपत्र जवळ बाळगले नसतानाही तुमचे मत देऊ शकता. निवडणूक आयोगाच्या म्हणण्यानुसार, व्होटर आयडी व्यतिरिक्त इतरही अनेक सरकारी ओळखपत्रांद्वारे तुम्ही मतदान करु शकता. मतदानाची परवानगी मिळवण्यासाठी ही सरकारी कागद पत्र दाखवून देखील मतदान केले जाऊ शकते. यासाठी निवडणूक आयोगाच्या माहीतीनूसार एकूण 12 सरकारी कागदपत्रे मतदानासाठी अधिकृत केलेली आहेत. यापैकी कोणतेही एक कागदपत्र जरी तुमच्याकडे असेल तर तुम्हाला निर्धास्तपणे मतदान करता येईल. तुमच्याकडे जर ‘मतदान कार्ड’ नसेल तर मतदान करण्यासाठी कोणती सरकारी कागदपत्रे लागतात ते जाणून घेऊयात…

यापैकी एक कागदपत्र देखील चालेल

1 ) आधार कार्ड

2 ) पॅन कार्ड

3 ) पेन्शन कार्ड

4 ) यूनिक डिसअॅबिलिटी आयडी UDID आयडी

5 ) सर्व्हीस आयडी कार्ड

6 ) पोस्ट ऑफीस किंवा बॅंकेचे पासबुक

7 ) श्रम मंत्रालयाचे हेल्थ इंश्योरेंस स्मार्ट कार्ड

8 ) ड्रायव्हींग लायसन्स

9 ) पासपोर्ट

10 ) नॅशनल पॉप्युलेशन रजिस्टर ( NPR ) चे RGI स्मार्ट कार्ड

11) MP-MLA आणि MLC साठीचे ऑफिशियल आयडी कार्ड

12 ) मनरेगा कार्ड

यादीत नाव आवश्यक आहे

मतदान करण्यासाठी तुमच्याकडे ओळखपत्र आवश्यक असणे गरजेचे नाही. मात्र तुमचे नाव तुम्ही मतदान यादीत समाविष्ठ केलेले असणे गरजेचे आहे. त्यासाठी मतदार याद्या जेव्हा नुतनीकरण करतात तेव्हा तुम्ही अठरा वर्षे पूर्ण झाल्यानंतर तुमचे नाव नोंदण्याची आवश्यकता आहे. अन्यथा तुम्हाला मतदान करता येत नाही. व्होटर लीस्ट ( Search your name in voters list ) ज्यावेळी अद्ययावत करीत असताना तेव्हा नव्या नावाची नोंद करणे किंवा हयात नसलेल्या व्यक्तीची नावे हटविण्यासाठी स्वतंत्र फॉर्म भरावा लागतो.

Non Stop LIVE Update
नवा पक्ष स्थापन करणार, निवडणूकही लढवणार, संजय पांडे यांचा कुणाशी सामना
नवा पक्ष स्थापन करणार, निवडणूकही लढवणार, संजय पांडे यांचा कुणाशी सामना.
इतक्या हिऱ्यांनी साकरले बाळासाहेब, ठाकरेंना वाढदिवसानिमित्त अनोखी भेट
इतक्या हिऱ्यांनी साकरले बाळासाहेब, ठाकरेंना वाढदिवसानिमित्त अनोखी भेट.
... तर तुम्हाला तोंड दाखवता येणार नाही, मनोज जरांगेंचा शेलारांना इशारा
... तर तुम्हाला तोंड दाखवता येणार नाही, मनोज जरांगेंचा शेलारांना इशारा.
एक माणूस आला नाही..., मुरलीधर मोहोळ यांच्यासमोर युवकानं फोडला टाहो
एक माणूस आला नाही..., मुरलीधर मोहोळ यांच्यासमोर युवकानं फोडला टाहो.
उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंचे पाय धुवायला हवे, कुणी लगावला खोचक टोला?
उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंचे पाय धुवायला हवे, कुणी लगावला खोचक टोला?.
विठुरायाची थकवा जाण्यासाठी गरम पाण्यानं स्नान अन् आयुर्वेदिक काढा
विठुरायाची थकवा जाण्यासाठी गरम पाण्यानं स्नान अन् आयुर्वेदिक काढा.
भाजपने बेवकूफ बनवल यार... घरवापसी होताच माजी आमदाराची मातोश्रीतून टीका
भाजपने बेवकूफ बनवल यार... घरवापसी होताच माजी आमदाराची मातोश्रीतून टीका.
'ते परदेशात होते...',राज ठाकरेंच्या स्वबळाच्या घोषणेवरून राऊतांची टीका
'ते परदेशात होते...',राज ठाकरेंच्या स्वबळाच्या घोषणेवरून राऊतांची टीका.
पावसाचा रेल्वे वाहतुकीला फटका, ट्रॅकवर मातीचा गाळ अन् मालगाडी थांबली
पावसाचा रेल्वे वाहतुकीला फटका, ट्रॅकवर मातीचा गाळ अन् मालगाडी थांबली.
पावसाचा जोर कमी, पूरही ओसरला, पुणे जिल्ह्यातील बंद असलेले मार्ग कोणते?
पावसाचा जोर कमी, पूरही ओसरला, पुणे जिल्ह्यातील बंद असलेले मार्ग कोणते?.