AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भाऊ विसरू शकतो, बहीण विसरत नाही; पंकजा मुंडे यांची टोलेबाजी

महायुतीचे उमेदवार महादेव जानकर यांनी आज परभणी लोकसभा मतदारसंघातून अर्ज भरला. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार आणि पंकजा मुंडे उपस्थित होता. अर्ज भरल्यानंतर एका सभेचं आयोजन करण्यात आलं होतं. या सभेतून चारही नेत्यांनी काँग्रेसवर जोरदार हल्ला चढवला. तसेच महादेव जानकर यांना निवडून देण्याचं आवाहनही मतदारांना केलं.

भाऊ विसरू शकतो, बहीण विसरत नाही; पंकजा मुंडे यांची टोलेबाजी
pankaja mundeImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Apr 01, 2024 | 5:40 PM
Share

राष्ट्रीय समाज पार्टीचे नेते महादेव जानकर हे परभणी लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत. महादेव जानकर यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार आणि पंकजा मुंडे यांच्या उपस्थितीत जानकर यांनी उमेदवारी अर्ज भरला. त्यानंतर एक सभाही पार पडली. यावेळी महादेव जानकर यांना निवडून देण्याचं आवाहन सर्वच नेत्यांनी केलं. पंकजा मुंडे यांनी तर यावेळी जोरदार फटकेबाजी केली. जानकर कोणत्याही चिन्हावर लढले असते तरी मी त्यांच्या प्रचारासाठी आले असते. शेवटी भाऊ विसरू शकतो, पण बहीण मात्र भावाला कधीच विसरत नाही, अशी टोलेबाजीच पंकजा मुंडे यांनी केली.

महादेव जानकर यांच्या प्रचारसभेला मी आज आले. मला काल जानकरांनी फोन केला. 1 एप्रिलला अर्ज भरणार असल्याचं त्यांनी सांगितलं. मला वाटलं एप्रिल फुल करत आहेत. पण ते खरंच अर्ज भरणार होते. त्यांचा फोन आला आणि भावासाठी मीही आले, असं पंकजा मुंडे म्हणाल्या. यावेळी त्यांनी चौंडी येथील एक किस्साही सांगितला. चौंडी येथे मी आणि मुंडे साहेब गेले होते. तेव्हा मुंडे साहेबांनी जानकर यांना मुलगा म्हणून संबोधले होते, अशी आठवणही त्यांनी सांगितली.

हापशीवर अंघोळ करायचे

महादेव जानकर यांनी बारामतीतून लोकसभा निवडणूक लढवली. जानकर अत्यंत साधे आहेत. बारामतीत ते लोकांमध्ये मिसळायचे. हापशीवर अंघोळ करायचे. शेतात झोपायचे. त्यावेळीही बहीण म्हणून मी त्यांना साथ दिली. सामान्य माणसांच्या विकासासाठी त्यांनी घर सोडले. म्हणूनच ते बाहेरून परभणीत आले असा विचार करणे योग्य नाही. बारामतीतून सुरू झालेला हा प्रवास भटकत भटकत परभणीत येऊन थांबला आहे, असं पंकजा म्हणाल्या.

तरीही गेले असते

महायुतीचा प्रचार करणे ही माझी जबाबदारी आहेच. पण जानकर कोणत्याही चिन्हावर लढले असते तरी मी त्यांच्या प्रचारासाठी गेले असते. शेवटी भाऊ विसरू शकतो, मात्र बहीण विसरत नाही, अशी टोलेबाजी त्यांनी केली.

परभणीत घर घ्या

तुम्ही या लोकांसाठी इथे परभणीत घर घ्या. तुम्ही एकटेच आहात. तुमच्या घरासमोर वंचित पीडितांची गर्दी असली पाहिजे. गरीबांची साथ देऊन संधीची सोनं करा. मी आता लोकसभेत जाईल असे मला वाटले न्हवते. मात्र पक्षाचा आदेश आहे. पाच वर्ष पदावर नसताना मी लोकांमध्ये जात आहे. तरी देखील लोक माझ्या विकासाची उदाहरणे देतात. तुम्हाबाबत देखील असेच लोक म्हणावेत एवढी अपेक्षा आहे, असंही त्या म्हणाल्या.

Follow Us
रायगडच्या दिवेआगार समुद्रकिनारी आठ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू: आळंदी
रायगडच्या दिवेआगार समुद्रकिनारी आठ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू: आळंदीतील खाजगी क्लासची सहल
प्रदीप पूर्णेकर प्रकरणाचा तपास वेगात; मुख्य सूत्रधाराच्या शोधासाठी SIT
प्रदीप पूर्णेकर प्रकरणाचा तपास वेगात; मुख्य सूत्रधाराच्या शोधासाठी SIT स्थापन, 23 अधिकारी...
प्रदीप पूर्णेकर प्रकरणानंतर मोठा निर्णय! शिंदे गटातील मीनाक्षी शिंदे
प्रदीप पूर्णेकर प्रकरणानंतर मोठा निर्णय! शिंदे गटातील मीनाक्षी शिंदे यांच्या घराबाहेर...
वाल्मिक कराड प्रकरण तापलं; धनंजय मुंडेंची मुख्यमंत्र्यांसोबत अचानक भेट
वाल्मिक कराड प्रकरण की... धनंजय मुंडेंची मुख्यमंत्र्यांसोबत अचानक भेट, चर्चेला उधाण
शेकडो जीव वाचवणाऱ्या कॅप्टन स्मित यांना फडणवीस म्हणाले ‘खरा हिरो’!
शेकडो जीव वाचवणाऱ्या कॅप्टन स्मित यांना फडणवीस म्हणाले ‘खरा हिरो’! भरभरून केलं कौतुक
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! कर्जमाफीचा तिसरा हप्ता खात्यात जमा, 3.27 लाख
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! कर्जमाफीचा तिसरा हप्ता खात्यात जमा, 3.27 लाख शेतकऱ्यांना दिलासा
पावसाअभावी सोयाबीनचे पीक उद्ध्वस्त; सिन्नरच्या शेतकऱ्यांसमोर मोठे संकट
पावसाअभावी सोयाबीनचे पीक उद्ध्वस्त; सिन्नरच्या शेतकऱ्यांसमोर मोठे संकट
उद्धव ठाकरे अचानक प्रदीप पुर्णेकरांच्या कार्यालयाजवळ गेले, अन्...
Udhhav Thackery : उद्धव ठाकरे अचानक प्रदीप पुर्णेकरांच्या कार्यालयाजवळ गेले, अन्...
प्रदीप पुर्णेकर प्रकरणी मोठी अपडेट समोर! ठाकरे गटातील नेत्याने शेअर...
प्रदीप पुर्णेकर प्रकरणी मोठी अपडेट समोर! ठाकरे गटातील नेत्याने शेअर केली धक्कादायक ऑडिओ क्लिप
महाराष्ट्रातील दुष्काळामुळे जनावरांच्या किमती घसरल्या, शेतकरी हवालदिल
महाराष्ट्रातील दुष्काळामुळे जनावरांच्या किमती घसरल्या, शेतकरी हवालदिल, नुकसानाचा करावा लागतोय सामना