
दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसनी एकत्र येणं न येणं हा त्यांच्या पक्षाचा अंतर्गत प्रश्न आहे. पण दोन्ही राष्ट्रवादींनी एकत्र यावं असं मला वाटतं – असं विजय वडेट्टीवार म्हणाले.
गडचिरोली शेवटच्या भाग छत्तीसगड सीमारती भागात माओवाद्यांचं स्मारक पोलिसांनी नष्ट केलं . लाहेरी पासून 18 किलोमीटर अंतरावर माओवादी संघटनेने एक मोठं स्मारक उभारला होतं. हे स्मारक छत्तीसगड राज्यातून महाराष्ट्रात प्रवेश करणाऱ्या माओवाद्यांचं प्रवेशद्वार होतं. नक्षलविरोधी पोलीस पथक व गडचिरोली पोलिसांनी आग लावून ते नष्ट केलं.
अजित पवारांबाबत राजकीय बोलणं आता योग्य नाही. सगळं स्थिरस्थावर झाल्यावर यावर चर्चा होऊ शकते. या विमान अपघातबाबात चौकशी करा अशी माझी मागणी आहे – संजय राऊत
दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताची सीआयडी चौकशी सुरू आहे. सीआयडी चौकशी करण्याचे राज्य सरकारचे आदेश आहेत. राज्य गुन्हे अन्वेषण विभागाने या प्रकरणाच्या तपासाला चौकशी सुरूवात केली आहे. प्राथमिक चौकशी होईल, या अपघाताचा तपशील नीट तपासला जाईल.
चाकरमानी वर्गांचे मोठे हाल. रेल्वे स्थानकावर मोठी गर्दी. कर्जत खोपोली ठाण्याहून सीएसटीकडे जाणाऱ्या लोकल उशिराने धावत आहेत.
छत्रपती संभाजीनगर शहरात अमली पदार्थांचे सेवन वाढत असतानाच, गुजरात व मुंबईहून कुख्यात गुन्हेगार सर्रास एमडी पावडर सारख्या महागड्या ड्रग्सची तस्करी करत आहेत. याच एमडी पावडर तस्करीवर गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत पाच दिवसांत शहरातील २० पेडलरांचे जाळे उघडकीस आले आहे. एका प्लंबरने ड्रग्ज विक्रीतून लाखोंची कमाई केल्याचे समोर येताच पोलिसांची चक्रे फिरली.
अनुसूचित जमाती आरक्षणामुळे राजकीय समीकरणं बदलली. शिवसेनेकडून किरण भांगले व हर्षाली चौधरी रेसमध्ये. मनसेकडून शीतल मंडारी यांचे नाव चर्चेत. मात्र मनसे ने शिवसेनेला पाठिंबा दिल्याने संख्याबळाच्या जोरावर शिवसेनेचा महापौर निश्चित मानला जातो
नरहरी झिरवाळ आणि हिरामण खोसकर अजित पवार यांच्या आठवणीत भावूक झाले असून हिरामण खोसकर यांना अश्रू अनावर झाले आहेत. लोकांनी व्यक्त केलेली इच्छा मी सांगितले असेही नरहरी झिरवाळ यांनी म्हटले.
असा अहवाल राज्य शासनाच्या महिला व बालकल्याण विभागाने यवतमाळला आज पाठविला. या अहवालानुसार गृह चौकशी करण्याचे आदेश अंगणवाडीताईंना देण्यात आले आहेत. पुढील 4 दिवसांत याचा अहवाल महिला व बालकल्याण विभागाकडे द्यावा लागणार आहे.
अजित पवार यांच्या निधनानंतर सुनेत्रा पवार यांना उपमुख्यमंत्री करावे, अशी मागणी सातत्याने केली जात आहे. यावर बोलताना नरहरी झिरवाळ म्हणाले की, सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री व्हाव्यात ही लोकांची इच्छा आहे..
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार चंद्रशेखर शेट्टी यांची भाजपच्या गटनेते पदी निवड होण्याची शक्यता, चंद्रशेखर शेट्टी पहिल्यांदाच नगरसेवक झाले असून तरुण नेतृत्वाकडे पक्ष संधी देण्याची शक्यता,तर दुसरीकडे विभागीय आयुक्त रविवार पर्यंत सुट्टीवर असल्याने वडेट्टीवार गटाकडून धानोरकर समर्थक असलेल्या 13 नगरसेवकांनी नोंदवलेल्या गटावर नोंदवलेल्या आक्षेपावर देखील आता सोमवारीच सुनावणी होण्याची शक्यता.
जळगाव महापालिका निवडणुक रिंगणातील ३२१ पैकी १६७ उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झाले. निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या एकूण ३२१ उमेदवारांपैकी निम्म्याहून अधिक, म्हणजेच १६७ उमेदवारांना आपली अनामत रक्कम वाचवण्यात अपयश आले. महापालिका निवडणुकीत उभ्या बहुतांश अपक्ष उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झाले आहे. डिपॉझिट जप्त झालेल्या उमेदवारांमध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या उमेदवारांचा देखील समावेश आहे. अपक्षांची संख्या मोठी असली तरी, प्रमुख राजकीय पक्षांमध्ये राष्ट्रवादी (शरद पवार), काँग्रेसला सर्वाधिक फटका बसल्याचे चित्र आहे.
लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत लाल कांद्याच्या हंगामातील विक्रमी आवक आली आहे. 2 हजार 10 वाहनातून लाल कांद्याची आवक आली. 32 हजार 172 क्विंटल लाल कांदा दाखल झाला. लाल कांद्याला जास्तीतजास्त 1640 रुपये, कमीतकमी 400 रुपये तर सरासरी 1280 रुपये इतका प्रति क्विंटलला दर मिळाला.
गोंदिया शहरात चोरांची टोळी फिरत असताना सीसीटीव्ही मध्ये कैद झाली आहे, तर या टोळीने एका घराची दाराची कडी कोंडा तोडून घरातून दागिने, रोख व साहित्य असा एकूण एक लाख 86 हजार 500 रुपये किमतीचा ऐवज लंपास केला. गोंदिया शहरातील फुलचूर येथील आशीर्वाद कॉलनीत ही घटना घडली आहे, या प्रकरणी ग्रामीण पोलिस ठाण्यात फिर्यादी देण्यात आली आहे.
जळगाव जिल्ह्यात दोन दिवसांपूर्वी गारपीट व वादळासह झालेल्या अवकाळी पावसामुळे 8 तालुक्यांना फटका बसला. चोपडा, रावेर, चाळीसगाव , मुक्ताईनगर ,एरंडोल, पारोळा , जळगाव आणि धरणगाव तालुक्यातील पिकांचे मोठे नुकसान झाले. चोपड्यात गारपिटीमुळे ५७ गावातील पिकांचे नुकसान झाले आहे. चाळीसगावच्या ९ गावांमधील पिकांची हानी झाली आहे. जळगावच्या १७, मुक्ताईनगरच्या ६५, एरंडोलच्या १६, पारोळ्यातील २५ व धरणगावच्या ५४ गावांमधील रब्बी हंगामाला अवकाळीचा फटका बसला आहे.
जळगाव शहरातील मानराज पार्क येथील मैदानावर 1 फेब्रुवारीला हिंदू जनजागृती समितीच्या वतीने हिंदू राष्ट्र जागृती सभेचे आयोजन करण्यात आले आहे. वंदे मातरम या राष्ट्रीय गीताला दीडशे वर्ष पूर्ण झाल्याने सभेत दहा हजारांहून अधिक हिंदू समाज बांधव एकत्रितपणे वंदे मातरमचे गायन करणार आहे. सभेत सनातन संस्थेच्या वतीने राष्ट्रधर्म अध्यात्म देवता सन उत्सव बाल संस्कार यासह विविध विषयांवर ग्रंथ तसेच फलक यांचं प्रदर्शन भरविण्यात येणार आहे. सभेच्या प्रचार प्रसार तसेच जनजागृतीसाठी 31 जानेवारी रोजी शहरात दुचाकी रॅली काढण्यात येणार आहे.
सांगलीच्या मिरजेमध्ये मुख्यमंत्री स्वर्गीय अजित पवार यांना मदरशातील विद्यार्थ्यांकडून श्रद्धांजली वाहण्यात आली आहे.मिरजेच्या मंगळवार पेठेतील ईसापुर गल्लीतील मदरशामध्ये विशेष प्रार्थनेचे आयोजन करण्यात आलं होतं,यावेळी लहान विद्यार्थ्यांनी कुराण पठण करत अजित पवारांच्या आत्म्यास शांती लाभावी,यासाठी मुस्लिम धर्मगुरूच्या उपस्थितीत प्रार्थना केली.
विजय वडेट्टीवार गटाच्या नगरसेवकांना समृद्धी महामार्गावर अडवून शिवीगाळ आणि जीवे मारण्याची धमकी देण्याच्या प्रकरणात मुख्य आरोपी असलेल्या सौरभ ठोंबरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आमचे ५ नगरसेवक वडेट्टीवारांनी पळवून नेले होते, त्यातील ३ नगरसेवक त्या गाडीत असल्याची माहिती आम्हाला मिळाली होती, आम्ही ती गाडी थांबवली पण मी कोणालाही शिवीगाळ केली नाही किंवा मारण्याची धमकी दिली नाही, अशी माहिती त्यांनी दिली.
राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे प्रमुख अजित पवार यांच्या निधनानंतर आता उपमुख्यमंत्री पदी त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांचे नाव उपमुख्यमंत्री पदासाठी आघाडीवर असल्याचे समोर आले आहे. दरम्यान सध्या राष्ट्रावादीत याविषयावर खलबतं सुरू आहेत. राज्यभरात अजितदादांना श्रद्धांजली वाहण्यात येत आहे. राज्यात तीन दिवसांचा दुखवटा आहे. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचा प्रचार या अचानक धक्क्यामुळे थंडावला आहे. सध्या अजितदादांच्या विमान अपघाताचीच चर्चा सुरू आहे. तर या अपघाताची चौकशी करण्याचे पत्र मुख्यमंत्र्यांनी पाठवले होते. त्यानुसार चौकशीला सुरूवात झाली आहे. लवकरच याविषयीचा अहवाल समोर येईल.