AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सातबारा बंद होणार… सरकारने घेतला मोठा निर्णय, आता थेट मिळणार… गावगावाड्याची महत्त्वाची बातमी काय?

7/12 Document News : शेतीचे महत्त्वाचे कागदपत्र असणाऱ्या सातबारा उताऱ्याबाबत मोठी बातमी समोर आली आहे. काही गावांमधील सातबारा बंद करण्याचा निर्णय महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी घेतला आहे.

सातबारा बंद होणार... सरकारने घेतला मोठा निर्णय, आता थेट मिळणार... गावगावाड्याची महत्त्वाची बातमी काय?
SatbaraImage Credit source: Google
बापू गायकवाड
बापू गायकवाड | Updated on: May 06, 2026 | 9:01 PM
Share

राज्यातील ग्रामीण भागातील अर्थकारण हे शेतीवर अवलंबून आहे. गावाखेड्यात मोठ्या प्रमाणावर शेती केली जाते. त्यामुळे सरकार शेतकऱ्यांसाठी आणि शेतीसाठी महत्त्वाचे निर्णय घेत असते. अशातच आता शेतीचे महत्त्वाचे कागदपत्र असणाऱ्या सातबारा उताऱ्याबाबत मोठी बातमी समोर आली आहे. काही गावांमधील सातबारा बंद करण्याचा निर्णय महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी घेतला आहे. याऐवजी नवीन कागदपत्र शेतकऱ्यांना दिले जाणार आहे. याचे फायदे काय असतील याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

सातबारा बंद होणार

राज्यातील ज्या नगरपालिका आणि महानगरपालिकांमध्ये हद्दवाढीमुळे नवीन गावांचा समावेश झाला आहे, अशा भागातील जमिनींचे 7/12 (सातबारा) उतारे आता बंद करण्यात येणार असून, या क्षेत्रातील रहिवाशांना त्यांच्या जमिनीचे ‘प्रॉपर्टी कार्ड’ (मालमत्ता पत्रक) तयार करून देण्याचे निर्देश महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले आहेत. या निर्णयामुळे शहरी भागात समाविष्ट झालेल्या नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. तसेच कागदपत्रांमध्ये सुसुत्रता येणार आहे.य

लवकरच सरकारी आदेश

मंत्रालयात महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. जेव्हा एखादे गाव किंवा ग्रामीण भाग महापालिका किंवा नगरपालिकेच्या हद्दीत येतो, तेव्हा त्या जागेचे स्वरूप शेतीकडून अकृषक (एनए) किंवा नागरी वस्तीकडे वळते. अशा वेळी 7/12 उतारा बंद करून त्याऐवजी ‘प्रॉपर्टी कार्ड’ असणे कायदेशीरदृष्ट्या अधिक सुलभ असते, असे ते म्हणाले. या निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी राज्य सरकारकडून आदेश काढण्यात येणार आहे. याचा फायदा राज्यातील हजारो शेतकऱ्यांना होणार आहे.

शेतकऱ्यांना काय फायदे होणार?

नगरपालिका आणि महानगरपालिकांच्या हद्दीत समावेश झालेल्या गावांना प्रॉपर्टी कार्ड दिले जाणार आहे. यामुळे शेतकऱ्यांना खास फायदे होणार आहेत. यामुळे मालमत्तेचे हस्तांतरण करणे सोपे होणार आहे. तसेत बँकांकडून कर्ज मिळवताना येणाऱ्या अडचणी दूर होणार आहे. तसेच जमिनीच्या नोंदींमध्ये सुसूत्रता येणार आहे. आगामी काळात प्रॉपर्टी कार्डबाबत सरकारी आदेश जारी केला जाणार आहे. त्यानंतर हे कार्ड शेतकऱ्यांना दिले जाणार आहे.

Follow Us
हे अत्यंत संवेदनशील प्रकरण आहे, रोज बोलणं... दिशा सालियन प्रकरणावर...
Nitesh rane | हे अत्यंत संवेदनशील प्रकरण आहे, रोज बोलणं... दिशा सालियन प्रकरणावर नितेश राणेंचं ट्विट चर्चेत
PM मोदींची मिमिक्री करणाऱ्या पुलकित मणींचा नोएडा शो रद्द; आता...
PM मोदींची मिमिक्री करणाऱ्या पुलकित मणींचा नोएडा शो रद्द; आता अंडरग्राऊंड... म्हणत सोशल मीडियावर पोस्ट
7 एकर शेती करपली, पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवून... पावसाने दगा दिल्याने
Sangali : 7 एकर शेती करपली, पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवून... पावसाने दगा दिल्याने शेतकऱ्याच्या डोळ्यात अश्रू
राहुल गांधींनी आता... मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा हल्लाबोल
Devendra Fadnavis : राहुल गांधींनी आता कॉमेडियन बनलं पाहिजे, मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा जोरदार हल्लाबोल
तोफेचा गोळीबार अन् लक्ष्याचा क्षणार्धात खात्मा! भारत-अमेरिका...
US India War Practice : तोफेचा गोळीबार अन् लक्ष्याचा क्षणार्धात खात्मा! भारत-अमेरिका संयुक्त युद्धाभ्यासात भारतीय लष्कराची दमदार कामगिरी
विशेष अधिवेशनाची गरज काय? राऊत-रोहित पवारांच्या मागणीवर बन यांचं...
Navnath Ban : विशेष अधिवेशनाची गरज काय? राऊत-रोहित पवारांच्या मागणीवर नवनाथ बन यांचं प्रत्युत्तर, पुढे म्हणाले...
गंगापूर रोडवरील 50 झाडांची कत्तल भोवली; भुजबळांनी दिले महत्वाचे आदेश
Chhagan Bhujbal : गंगापूर रोडवरील 50 झाडांची कत्तल भोवली; भुजबळांनी दिले महत्वाचे आदेश
गणेशोत्सवात महागणपती मंडपात काळीज पिळवटून टाकणारी घटना
Kalachowki : गणेशोत्सवात महागणपती मंडपात काळीज पिळवटून टाकणारी घटना
हार चढवला, पण फुलांचा नाही; मुंबईच्या राजाला चक्क 101..VIDEO व्हायरल
Mumbai Cha Raja : हार चढवला, पण फुलांचा नाही; मुंबईच्या राजाला चक्क 101..VIDEO व्हायरल
दिशा सालियन प्रकरणावर संजय राऊतांची प्रतिक्रीया, म्हणाले...
Sanjay Raut | मातोश्रीवर येऊन प्रसिद्धी मिळवण्याचा प्रयत्न घाणेरडा; दिशा सालियन प्रकरणावर संजय राऊतांची प्रतिक्रीया, पुढे म्हणाले...