Maharashtra Assembly Session 2026 LIVE : आमदार रोहित पवार DGCA विरोधात गुन्हा नोंदवणार

Maharashtra Assembly Budget Session 2026 LIVE Updates: अर्थसंकल्पीय अधिवेशाचा आज तिसरा दिवस आहे. अनेक मुद्द्यांवर आज चर्चा होण्याची शक्यता आहे. अधिवेशनात आज काय काय होणार, त्याचे अपडेट्स जाणून घ्या..

Maharashtra Assembly Session 2026 LIVE : आमदार रोहित पवार DGCA विरोधात गुन्हा नोंदवणार
maharashtra news
| Edited By: | Updated on: Feb 25, 2026 | 11:20 AM

LIVE NEWS & UPDATES

  • 25 Feb 2026 11:20 AM (IST)

    आमदार रोहित पवार DGCA विरोधात गुन्हा नोंदवणार

    आमदार रोहित पवार DGCA विरोधात गुन्हा नोंदवणार. VSR कंपनीवर कारवाईला उशीर केल्याने गुन्हा नोंदवणार. रोहित पवारांकडून VSR कंपनीवर अनेक प्रश्न उपस्थित.

  • 25 Feb 2026 11:10 AM (IST)

    सोलापूर तालुक्यातील मंद्रूप गावात शेतीपिकांचे मोठे नुकसान

    अवकाळी पावसामुळे दक्षिण सोलापूर तालुक्यातील मंद्रूप गावात शेतीपिकांचे मोठे नुकसान. अवकाळी पावसामुळे मंद्रूप मधील शेतकऱ्याची टोमॅटो बाग पूर्णपणे झोपली. हातातोंडाशी आलेली टोमॅटो बाग जमीनदोस्त झालीय. या बागेसाठी एकरी 40 हजार खर्च केला. त्यातून दीड लाख रुपये उत्पन्न अपेक्षित होतं. मात्र अवकाळी पावसामुळे काढणीला आलेली टोमॅटो बाग पूर्णपणे झोपली.

  • 25 Feb 2026 10:57 AM (IST)

    सोलापूर शहरातील कोनापुरे चाळीतील मनपा दवाखान्याची अज्ञातांकडून तोडफोड

    सोलापूर शहरातील कोनापुरे चाळीतील मनपा दवाखान्याची अज्ञातांकडून तोडफोड करण्यात आली आहे.  एकाच दवाखान्याची अज्ञातांकडून आतापर्यंत चार ते पाच वेळा तोडफोड करण्यात आली. तोडफोडीमध्ये मनपा दवाखान्यातील वस्तूंचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे.  कोनापुरे चाळीतील एका समाज मंदिरामध्ये सुरु करण्यात आलेल्या मनपा दवाखाना बंद पाडण्यासाठी वारंवार प्रयत्न होतोय.  महापालिका आरोग्य विभागाकडून सदर बझार पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

  • 25 Feb 2026 10:40 AM (IST)

    नाशिक : महापालिकेच्या स्थायी समिती सभापतीपदासाठी थोड्याच वेळात निवडणूक

    महापालिकेच्या स्थायी समिती सभापतीपदासाठी थोड्याच वेळात निवडणूक प्रक्रिया पार पडणार आहे.  भाजप आणि शिवसेनेचे सहलीला गेलेले सर्व सदस्य रामायण बंगल्यावर दाखल झाले आहेत.  थोड्याच वेळात सर्व नगरसेवक महापालिकेत जाणार आहेत. भाजपचे मच्छिंद्र सानप सभापती होणार हे जवळपास निश्चित आहे. तर अजित दादांच्या राष्ट्रवादीचे मुकेश शहाणे वेळेवर माघार घेण्याची शक्यता आहे.

  • 25 Feb 2026 10:30 AM (IST)

    राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांना रुबी हॉस्पिटल मधून डिस्चार्ज…

    राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांना रुबी हॉस्पिटल मधून डिस्चार्ज मिळाला आहे. गेल्या चार दिवसापासून शरद पवार हे रुबी हॉस्पिटलमध्ये उपचार घेत होते…. प्रकृती व्यवस्थित असल्याने शरद पवारांना डिस्चार्ज देण्यत आला आहे.

  • 25 Feb 2026 10:27 AM (IST)

    रोहित पवारांच्या आरोपांमध्ये तथ्य असेल तर चौकशी व्हावी… – सुप्रिया सुळे

    रोहित पवारांच्या आरोपांमध्ये तथ्य असेल तर चौकशी व्हावी… सगळ्या गोष्टी गांभीर्याने घेण्याची गरज आहे. रोहितने अभ्यासपूर्वक पाठपुरावा केला आहे… दादांच्या विमान अपघाताचं सत्य समोर आलंच पाहिजे… ऑडिट प्रत्येक विमानांचं झालं पाहिजे… विमान अपघातप्रकरणी पारदर्शक चौकशी व्हावी… असं वक्तव्य देखील सुप्रिया सुळे यांनी केलं आहे.

  • 25 Feb 2026 10:18 AM (IST)

    आष्टी तालुक्यातील दौलावडगाव येथे विद्युत तारांचे शॉर्टसर्किट, दोन शेतकऱ्यांचे घरं जळून खाक

    बीडच्या दौलावडगाव येथे मध्यरात्री अचानक विद्युत तारांमध्ये शाॅटसर्किट झाल्याने दोन घराला आग लागली यामुळे शेतकरी संजय कोहोक यांच्यासह अनेकांच्या घरांचे मोठे नुकसान झाले आहे. कोहोक कुटुंब झोपेत आसतांनाच आग लागल्याने आगीने रौद्र रूप धारण केले होते. यावेळी बाहेर बांधलेल्या पाळीव कुत्र्याने मोठेमोठ्याने भुंकायला सुरुवात केली. कुत्र्याचा आवाज ऐकून घरात झोपलेले कोहोक कुटूंब जागे होऊन बाहेर पळाले. यामुळे मोठा अनर्थ टळला. संसारोपयोगी साहित्य जळून खाक झाले आहे यामुळे नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

  • 25 Feb 2026 09:56 AM (IST)

    नागपुरात काळजाचा थरकाप, 12 वीचा पेपर द्यायला जाणाऱ्या विद्यार्थ्याचा बसच्या धडकेत जागीच मृत्यू

    नागपूर जिल्ह्यातील खापा-पारशिवणी मार्गावरील खैरी परिसरात एक भीषण अपघात घडला आहे.  यामध्ये बारावीचा पेपर देण्यासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू झाला आहे. सिलेंडन परतेती असे मृत विद्यार्थ्याचे नाव आहे. तो आपल्या दुचाकीने रामटेक येथील जयसेवा आदिवासी कनिष्ठ महाविद्यालयातील परीक्षा केंद्राकडे जात होता. यावेळी विरुद्ध दिशेने येणाऱ्या भरधाव स्कूल बसने त्याच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या धडकेत गंभीर दुखापत झाल्याने सिलेंडनचा जागीच अंत झाला. या घटनेमुळे परिसरात आणि विद्यार्थ्यांच्या कुटुंबावर शोककळा पसरली आहे.

  • 25 Feb 2026 09:47 AM (IST)

    मुंबई विमानतळावर स्पाइसजेटच्या प्रवाशांचा राडा; ७ तास विमान रखडल्याने प्रवासी संतप्त

    मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ (T-1) वर स्पाइसजेट कंपनीच्या विमानाच्या विलंबावरून आज मोठा गदारोळ पाहायला मिळाला. मुंबईहून पश्चिम बंगालमधील सिलिगुरीला जाणारे विमान तब्बल सात तास उशिरा असल्याने प्रवाशांचा संयम सुटला. आम्हाला परतावा (रिंफंड) नको, तर तात्काळ विमानाची पर्यायी व्यवस्था करून द्या, अशी मागणी करत प्रवाशांनी विमानतळ प्रतिनिधींसोबत जोरदार बाचाबाची केली. सात तासांच्या प्रतीक्षेमुळे प्रवाशांमध्ये प्रचंड संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.

  • 25 Feb 2026 09:37 AM (IST)

    कोकणात आंबा उत्पादक शेतकरी संकटात; बदलत्या हवामानामुळे फवारणीचे संकट

    रत्नागिरी जिल्ह्यात गेल्या आठ दिवसांपासून सुरू असलेल्या बदलत्या हवामानामुळे आंबा बागायतदार हवालदिल झाले आहेत. अवकाळी पाऊस, ढगाळ वातावरण आणि अचानक वाढलेल्या धुक्यामुळे आंब्यावर बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव वाढला आहे. यामुळे मोहर काळा पडू लागला आहे. तसेच, दोन दिवसांपूर्वी झालेल्या पावसामुळे मोठ्या प्रमाणावर फळगळही झाली आहे. सध्याचे वातावरण थ्रीप्स आणि तुडतुड्यांसारख्या किटकांना पोषक असल्याने, आपला मोहर वाचवण्यासाठी शेतकऱ्यांना यंदाच्या हंगामातील सहावी फवारणी करावी लागत आहे. यामुळे उत्पादन खर्चात प्रचंड वाढ झाल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे.

  • 25 Feb 2026 09:27 AM (IST)

    एकनाथ शिंदे यांचा सलमान खानला फोन; सलीम खान यांच्या प्रकृतीची केली विचारणा

    ज्येष्ठ लेखक सलीम खान यांच्या प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांना मुंबईतील लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर, एकनाथ शिंदे यांनी अभिनेता सलमान खान याच्याशी फोनवरून संवाद साधला आणि सलीम खान यांच्या तब्येतीची आस्थेने विचारपूस केली. यावेळी सलमान खानने मुख्यमंत्र्यांना माहिती दिली की, सलीम खान यांची प्रकृती स्थिर असून येत्या दोन दिवसांत त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळण्याची शक्यता आहे.

  • 25 Feb 2026 09:17 AM (IST)

    डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा महाविद्यालयांना दणका; पदव्युत्तर प्रवेशावर येणार गदा

    छत्रपती संभाजीनगर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने आपल्या कार्यक्षेत्रातील महाविद्यालयांना कडक अल्टिमेटम दिला असून, शैक्षणिक वर्ष २०२५-२६ मध्ये ज्या महाविद्यालयांना पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी नकारात्मक शिफारस मिळाली आहे, त्यांना त्रुटी दूर करण्यासाठी २ मार्चपर्यंतची मुदत दिली आहे. शिक्षक भरती, प्रयोगशाळा आणि पायाभूत सुविधांचा अभाव असलेल्या महाविद्यालयांनी या मुदतीत आवश्यक कागदपत्रांसह प्रस्ताव सादर न केल्यास, शैक्षणिक वर्ष २०२६-२७ पासून त्यांच्या प्रथम वर्ष प्रवेश क्षमतेवर स्थगिती आणली जाईल, असा इशारा विद्यापीठ प्रशासनाने दिला आहे.

  • 25 Feb 2026 09:06 AM (IST)

    अकोल्यातून लाल वादळ संगमनेरच्या दिशेने, लाँगमार्चचा आज दुसरा दिवस, सरकारकडून चर्चेचे निमंत्रण

    मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, किसान सभा आणि कामगार संघटनांच्या लॉंगमार्चचा आज दुसरा दिवस असून, आंदोलकांचा उत्साह कायम आहे. काल राजूरहून निघालेला हा मोर्चा रात्री अकोले येथे मुक्कामी होता, जिथून आता हे ‘लाल वादळ’ संगमनेरच्या दिशेने कूच करणार आहे. कडक ऊन आणि पायपिटीचे आव्हान पेलत आंदोलक अकोले तहसील कार्यालयासमोर जमायला सुरुवात झाली आहे. दरम्यान, राज्य सरकारने या आंदोलनाची दखल घेतली असून आज दुपारी ४ वाजता मुंबईत पाच मंत्र्यांच्या उपस्थितीत शिष्टमंडळाला चर्चेसाठी पाचारण केले आहे. एकीकडे शिष्टमंडळ चर्चेसाठी रवाना होणार असले, तरी दुसरीकडे मागण्या मान्य होईपर्यंत मोर्चाचा प्रवास थांबणार नसल्याचा निर्धार आंदोलकांनी व्यक्त केला आहे.

  • 25 Feb 2026 08:55 AM (IST)

    AQI 170 ते 220 पार, ‘स्वच्छ हवा’ मोहिम अंतर्गत हजारो बांधकामांना कामबंद कारवाईनंतरही प्रदूषणात वाढ

    दादर चौपाटी धुकटली! AQI 170 ते 220 पार, ‘स्वच्छ हवा’ मोहिम अंतर्गत हजारो बांधकामांना कामबंद कारवाईनंतरही प्रदूषणात वाढ; आरोग्य धोक्यात? मुंबईसह उपनगरांमध्ये प्रदूषणात लक्षणीय वाढ नोंद. दादर चौपाटी परिसरात पहाटेपासून धूळ आणि धुरक्याची चादर. हवामान खात्याच्या अंदाजानुसार AQI 170 ते 220 दरम्यान. हवेत PM2.5 कणांचे प्रमाण वाढल्याने नागरिकांमध्ये आरोग्याची चिंता.तज्ज्ञांच्या मते दमा, हृदयविकार व श्वसनाच्या त्रासाचा धोका वाढू शकतो. हवामानातील बदलांमुळे AQI मध्ये चढ-उतार होणार असल्याची माहिती.

     

  • 25 Feb 2026 08:50 AM (IST)

    राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवारांना आज डिस्चार्ज मिळण्याची शक्यता

    प्रकृती अस्वस्थामुळे शरद पवार हे गेली चार दिवसापासून पुण्यातील रुबी हॉल क्लिनिक मध्ये उपचार घेत आहेत. शरद पवारांची प्रकृती व्यवस्थित असल्याने आज डिस्चार्ज मिळणार….

  • 25 Feb 2026 08:40 AM (IST)

    किरणोत्सवाच्या दिवशी वेरूळ लेणी खुली ठेवण्याची मागणी

    छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील जगप्रसिद्ध वेरूळ लेणी येथे दरवर्षी मार्च महिन्यात होणारा किरणोत्सव पाहण्यासाठी देश-विदेशातून इतिहासप्रेमी आणि अभ्यासक मोठ्या संख्येने उपस्थित राहतात. वेरूळ लेणी क्रमांक १० मधील भगवान गौतम बुद्ध यांच्या मूर्तीवर सूर्यकिरणे अचूक पडण्याचा हा अद्भुत सोहळा यंदा १० मार्च रोजी होणार आहे. मात्र दर मंगळवारी लेणी पर्यटकांसाठी बंद ठेवली जातात आणि यंदा किरणोत्सवाचा मुख्य दिवस मंगळवारीच आल्याने इतिहासप्रेमींची निराशा होण्याची शक्यता आहे.

  • 25 Feb 2026 08:30 AM (IST)

    राष्ट्रपती द्रौपदी मूर्मु आज शेगाव दौऱ्यावर..

    आज देशाच्या महामहीम राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू या शेगावच्या दौऱ्यावर आहे . शेगाव येथील श्री संत गजानन महाराज समाधी च्या त्या दर्शन घेणार आहेत.. राष्ट्रपतींच्या हस्ते मंदिरात विशेष आरतीही करण्यात येणार आहे.. इतिहासात प्रथमच राष्ट्रपती शेगावात येणार असल्याने भाविकांसह परिसरातील नागरिकांमध्येही उत्साह आहे..

  • 25 Feb 2026 08:20 AM (IST)

    कल्याण-डोंबिवली महानगरपालिकामध्ये कर वसुलीत ढिलाई

    आयुक्त अभिनव गोयल यांचा कारवाईचा बडगा; हलगर्जीपणा खपवून घेणार नाही इशारा. ५१ कोटी उद्दिष्टापैकी फक्त १६.७३ कोटी वसुली; मोठी तूट उघड. अरविंद काळण आणि राजेंद्र पाटील यांचे निलंबन. कमी वसुलीवर थेट कारवाईचे संकेत; सर्व प्रभागांचा आढावा सुरू

  • 25 Feb 2026 08:10 AM (IST)

    मंत्री नरहरी झिरवळांच्या मतदार संघात एसीबीची मोठी कारवाई

    रासेगावच्या सरपंच मंदा बेडकुळे आणि पती विठ्ठल बेडकुळे लाच घेतांना एसीबीच्या जाळ्यात. उपसरपंचावर आणलेला अविश्वास ठराव ना मंजूर करण्यासाठी मागितली होती ५० हजारांची लाच. तडजोडीत २५ हजार मान्य करत १५ हजार स्वीकारताना सरपंच पत्नीसह पती अटकेत. नाशिकच्या एसीबीच्या पथकाने दिंडोरी तालुक्यात केलेल्या कारवाईने खळबळ

राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरूवात झाली. आज या अधिवेशनाचा तिसरा दिवस आहे. अजित पवार यांच्याकडून या अर्थसंकल्पीय अधिवेशनाची तयारी सुरू होती. मात्र, त्यांच्या अपघाती निधनानंतर देवेंद्र फडणवीस राज्याचा अर्थसंकल्प मांडणार आहेत. अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी अजित पवार यांच्य निधनानंतर शोकप्रस्ताव देवेंद्र फडणवीस यांनी मांडला. आज अधिवेशनात काही मुद्दे गाजण्याची शक्यता आहे. नरहरी झिरवाळ यांच्या कार्यालयातील लाच प्रकरणावरून विरोधक आज गोंधळ घालण्याची शक्यता आहे. यासोबतच अजित पवार यांच्या विमान अपघाताचा अहवाल पुढे आला. त्यावरूनही विरोधक काही प्रश्न अधिवेशनात करू शकतात. यासह राज्य, देश-विदेशातील अपडेट्स जाणून घेण्यासाठी हा ब्लॉग फॉलो करा.